-
अनुवाद ७:१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० पण जे त्याचा द्वेष करतात त्यांची परतफेड करायला तो मागेपुढे पाहणार नाही, तर त्यांचा नाश करेल.+ त्याचा द्वेष करणाऱ्यांना शिक्षा द्यायला तो उशीर लावणार नाही; त्यांची परतफेड करायला तो मागेपुढे पाहणार नाही.
-
-
२ थेस्सलनीकाकर १:७-९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ सध्या तुम्हाला संकटं सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्तिशाली स्वर्गदूतांसोबत+ अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल,+ तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल. ८ त्या वेळी, जे देवाला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूबद्दलचा आनंदाचा संदेश मानत नाहीत त्यांचा तो सूड घेईल.+ ९ या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा ठोठावण्याद्वारे+ प्रभूच्या समोरून आणि त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर केलं जाईल.
-