२५ स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण* सर्व गोष्टींच्या बाबतीत आत्मसंयम बाळगतो. अर्थात, ते नाश होणारा मुकुट मिळवण्यासाठी असं करतात;+ पण आपण कधीही नाश न होणारा मुकुट मिळवण्यासाठी करतो.+
२४ प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने* वागणारा,+ शिकवण्याची योग्यता असलेला, तसंच इतरांनी त्याचं वाईट केलं, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असावा.+