८ चार जिवंत प्राण्यांपैकी प्रत्येकाला सहा पंख होते. त्या पंखांवर सगळीकडे आणि आतल्या बाजूलाही डोळेच डोळे होते.+ ते प्राणी रात्रंदिवस सतत अशी घोषणा करत राहतात: “यहोवा* देव, सर्वशक्तिमान, जो होता, जो आहे आणि जो येत आहे,+ तोच पवित्र, पवित्र, पवित्र!”+
१७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+