यशया
४८ हे याकोबच्या घराण्या, ऐक!
तू स्वतःला इस्राएलचं नाव लावतोस,+
तू यहूदाच्या जलाशयांतून* आला आहेस,
तू यहोवाच्या नावाने शपथ घेतोस,+
आणि इस्राएलच्या देवाला प्रार्थना करतोस,
पण, खरेपणाने आणि नीतीने नाही.+
२ तू स्वतःला पवित्र शहराचा+ रहिवासी म्हणवतोस,
आणि ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे,
त्या इस्राएलच्या देवाकडे मदतीसाठी वळतोस.+
३ “मी फार पूर्वीच सुरुवातीच्या गोष्टी सांगितल्या.
त्या माझ्या तोंडून निघाल्या,
आणि मी त्या जाहीर केल्या.+
मी अचानक पाऊल उचललं आणि त्या घडून आल्या.+
४ तू किती हट्टी आहेस, हे मला माहीत होतं.
तुझी मान लोखंडाची आणि तुझं कपाळ तांब्याचं आहे;+
५ म्हणून फार पूर्वीच मी तुला या गोष्टी सांगितल्या.
त्या घडून येण्याआधीच मी त्या तुला कळवल्या,
म्हणजे तू असं म्हणू शकणार नाहीस, की
‘माझ्या दैवताच्या मूर्तीनेच हे केलंय;
आणि माझ्या कोरीव मूर्तीच्या व ओतीव* मूर्तीच्या आज्ञेवरूनच हे घडून आलंय.’
६ तू स्वतः या सगळ्या गोष्टी पाहिल्यास आणि ऐकल्यास.
मग, तू त्या जाहीर करणार नाहीस का?+
आतापासून मी तुला नवीन गोष्टी सांगतो,+
तुला माहीत नाहीत अशा गुप्त गोष्टी मी तुला ऐकवतो.
७ ज्या गोष्टी मी घडवून आणतोय त्या नवीन आहेत, जुन्या नाहीत;
त्यांबद्दल तू यापूर्वी कधीच ऐकलं नाहीस.
नाहीतर तू म्हणशील, ‘मला तर त्या आधीपासूनच माहीत होत्या.’
८ नाही, तू या गोष्टी ऐकल्या नाहीस.+ त्यांबद्दल तुला काहीच माहीत नाही.
पूर्वी तुझे कान बंद होते.
९ पण माझ्या नावासाठी मी माझ्या रागावर ताबा ठेवीन,+
माझ्या गौरवासाठी मी स्वतःला आवरीन.
मी तुझा नाश करणार नाही.+
१० बघ! मी तुला शुद्ध केलंय, पण चांदीसारखं नाही.+
तुला दुःखाच्या धगधगत्या भट्टीत टाकून मी तुझी पारख केली आहे.*+
११ माझ्या नावासाठी, हो, माझ्या स्वतःच्या नावासाठी मी असं करीन.+
कारण माझं नाव मी अपवित्र कसं होऊ देऊ?+
मी माझा गौरव दुसऱ्या कोणालाही मिळू देत नाही.*
१२ हे याकोब, माझं ऐक! हे इस्राएल, मी तुला निवडलंय!
मी तोच आहे.+ मीच पहिला आणि मीच शेवटचा आहे.+
मी हाक मारताच ते उठून उभे राहतात.
१४ तुम्ही सगळे एकत्र जमा आणि ऐका.
तुमच्या दैवतांपैकी असा कोण आहे ज्याने या गोष्टी जाहीर केल्या?
मी, यहोवाने ज्याच्यावर प्रेम केलं,+
तो माझ्या इच्छेप्रमाणे बाबेलच्या विरोधात जाईल;+
तो खास्दी लोकांवर आपला हात उगारेल.+
१५ मी स्वतः हे बोललोय, आणि मीच त्याला बोलावलंय.+
मीच त्याला आणलंय, आणि तो आपल्या कामात नक्की यशस्वी होईल.+
१६ माझ्या जवळ या आणि हे ऐका.
सुरुवातीपासूनच मी उघडपणे बोललो; गुप्तपणे बोललो नाही.+
सांगितलेली गोष्ट घडू लागली, तेव्हापासून मी तिथे आहे.”
आणि आता, सर्वोच्च प्रभू यहोवा याने मला आणि त्याच्या पवित्र शक्तीला* पाठवलं आहे.*
१७ तुला सोडवणारा, इस्राएलचा पवित्र देव यहोवा म्हणतो:+
“मी यहोवा तुझा देव आहे.
१८ तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+
माझ्यासमोरून त्यांचं नाव कधीही मिटवलं किंवा नाहीसं केलं जाणार नाही.”
२० बाबेलमधून निघा!+
खास्दी लोकांपासून पळून जा!
आनंदाने जयघोष करा! मोठ्याने घोषणा करा!+
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जाहीर करा!+
असं म्हणा: “यहोवाने आपला सेवक याकोब याला किंमत देऊन सोडवलंय.+
२१ तो त्यांना ओसाड ठिकाणांतून घेऊन गेला, तेव्हा ते तहानेने व्याकूळ झाले नाहीत.+
त्याने त्यांच्यासाठी खडकातून पाणी वाहायला लावलं;
त्याने खडक फोडला आणि पाणी खळखळ वाहू लागलं.”+
२२ यहोवा म्हणतो, “दुष्टाला कधी शांती नसते.”+