यशया
१७ दिमिष्कविरुद्ध न्यायाचा संदेश:+
“पाहा! दिमिष्क शहराचा नाश होईल,
आणि ते दगड-मातीचा ढिगारा बनेल.+
३ एफ्राईममधून तटबंदीची शहरं नाहीशी होतील,+
दिमिष्कच्या राज्याचाही नाश होईल;+
इस्राएली लोकांचं वैभव जसं नाहीसं झालं, तसंच सीरियामध्ये उरलेल्या लोकांचं वैभव नाहीसं होईल,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
४ “त्या दिवशी याकोबचं वैभव कमी होईल,
आणि त्याचं धडधाकट शरीर अशक्त होईल.
५ रेफाईमच्या खोऱ्यातल्या+ शेतांत कापणीनंतर वेचण्यासाठी जसं थोडंसंच धान्य उरतं,
तशी त्याची अवस्था होईल.
६ जैतुनाचं झाड हालवल्यानंतर,
जशी काही फळं शिल्लक राहतात तशी त्याची अवस्था होईल;
सगळ्यात वरच्या फांदीला जशी दोन-तीन फळं उरतात,
आणि फळांनी भरलेल्या फांदीवर फक्त चार-पाच फळं उरतात,+
तशी त्याची अवस्था होईल,” असं इस्राएलचा देव यहोवा म्हणतो.
७ त्या दिवशी माणूस आपल्या निर्माणकर्त्याकडे दृष्टी लावेल; तो इस्राएलच्या पवित्र देवाकडे आपले डोळे लावेल. ८ तो आपल्या हातांनी बनवलेल्या+ वेदींकडे पाहणार नाही.+ आपल्या बोटांनी घडवलेल्या गोष्टींकडे, म्हणजे पूजेच्या खांबांकडे* किंवा धूपस्तंभांकडे तो आपले डोळे लावणार नाही.
९ त्या दिवशी त्याची मजबूत शहरं जंगलातल्या ओसाड ठिकाणांसारखी,+
इस्राएली लोकांसमोर टाकून दिलेल्या फांदीसारखी होतील.
ती शहरं पडीक जमिनीसारखी होतील.
१० तू* आपलं तारण करणाऱ्या देवाला विसरली आहेस;+
तुझ्या खडकाची, तुझ्या मजबूत किल्ल्याची तू आठवण केली नाहीस.+
तू सुंदर-सुंदर बागा लावत असलीस,
तरी त्यांत परक्यांच्या* फांद्या लावतेस.
११ दिवसा तू तुझ्या बागांना काळजीपूर्वक कुंपण जरी घातलंस,
आणि सकाळपर्यंत बियांना अंकुर जरी फुटले,
तरी रोगराईच्या दिवशी आणि भयंकर वेदनेच्या दिवशी सगळ्या पिकाचा नाश होईल.+
१२ पाहा! राष्ट्रांचे लोक गलबला करत आहेत.
त्यांचा आवाज खवळलेल्या समुद्रांसारखा आहे!
राष्ट्रं गर्जना करत आहेत,
त्यांचा आवाज उसळणाऱ्या मोठ्या लाटांसारखा आहे!
१३ राष्ट्रं अनेक जलाशयांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज करतील.
तो त्यांना दटावेल, आणि ती दूर पळून जातील;
डोंगरांवरचा भुसा जसा वाऱ्याने उडून जातो,
वावटळीत काटेरी झुडूप जसं उडून जातं,
तशी ती राष्ट्रं दूर पळून जातील.
१४ संध्याकाळी संकट कोसळेल.
सकाळ होण्याआधी ती राष्ट्रं नाहीशी होतील.
आम्हाला लुबाडणाऱ्यांच्या वाट्याला हेच येईल,
आम्हाला लुटणाऱ्यांची हीच अवस्था होईल.