वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नहेम्या २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नहेम्या रूपरेषा

      • नहेम्याला यरुशलेमला पाठवलं जातं (१-१०)

      • नहेम्या शहराच्या भिंतींची पाहणी करतो (११-२०)

नहेम्या २:१

तळटीपा

  • *

    अति. ख१५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +एज ७:१; नहे १३:६
  • +नहे १:१
  • +नहे १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. ८-९

नहेम्या २:३

समासातील संदर्भ

  • +नहे १:२, ३

नहेम्या २:४

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९८९, पृ. १२

नहेम्या २:५

समासातील संदर्भ

  • +दान ९:२५

नहेम्या २:६

समासातील संदर्भ

  • +नहे १:११
  • +नहे ५:१४; १३:६

नहेम्या २:७

तळटीपा

  • *

    किंवा “फरात नदीपलीकडच्या.”

समासातील संदर्भ

  • +यहो १:४; एज ५:३

नहेम्या २:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या देवाचा चांगला हात माझ्यावर होता.”

समासातील संदर्भ

  • +नहे ७:२
  • +नहे १:३
  • +एज ७:२१
  • +एज ७:६

नहेम्या २:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “सेवक.”

समासातील संदर्भ

  • +नहे ४:१; ६:२
  • +नहे १३:१
  • +नहे २:१९; ४:३; ६:१४; १३:७

नहेम्या २:१३

समासातील संदर्भ

  • +२इत २६:९
  • +नहे ३:१३
  • +नहे १:३; विल १:४; २:९

नहेम्या २:१४

समासातील संदर्भ

  • +नहे ३:१५; १२:३७

नहेम्या २:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:२३; योह १८:१

नहेम्या २:१६

समासातील संदर्भ

  • +नहे ४:१४

नहेम्या २:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांनी आपल्या हातांना बळ दिलं.”

समासातील संदर्भ

  • +एज ७:६, २८; नहे २:७, ८
  • +दान ९:२५
  • +हाग १:१४

नहेम्या २:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “सेवक.”

समासातील संदर्भ

  • +नहे १३:१, २
  • +नहे ६:१४
  • +नहे ४:७; ६:१, २
  • +स्तो ७९:४
  • +नहे ६:६

नहेम्या २:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो १२७:१
  • +एज ४:१-३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नहे. २:१एज ७:१; नहे १३:६
नहे. २:१नहे १:१
नहे. २:१नहे १:११
नहे. २:३नहे १:२, ३
नहे. २:४१शमु १:१३
नहे. २:५दान ९:२५
नहे. २:६नहे १:११
नहे. २:६नहे ५:१४; १३:६
नहे. २:७यहो १:४; एज ५:३
नहे. २:८नहे ७:२
नहे. २:८नहे १:३
नहे. २:८एज ७:२१
नहे. २:८एज ७:६
नहे. २:१०नहे ४:१; ६:२
नहे. २:१०नहे १३:१
नहे. २:१०नहे २:१९; ४:३; ६:१४; १३:७
नहे. २:१३२इत २६:९
नहे. २:१३नहे ३:१३
नहे. २:१३नहे १:३; विल १:४; २:९
नहे. २:१४नहे ३:१५; १२:३७
नहे. २:१५२शमु १५:२३; योह १८:१
नहे. २:१६नहे ४:१४
नहे. २:१८एज ७:६, २८; नहे २:७, ८
नहे. २:१८दान ९:२५
नहे. २:१८हाग १:१४
नहे. २:१९नहे १३:१, २
नहे. २:१९नहे ६:१४
नहे. २:१९नहे ४:७; ६:१, २
नहे. २:१९स्तो ७९:४
नहे. २:१९नहे ६:६
नहे. २:२०स्तो १२७:१
नहे. २:२०एज ४:१-३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नहेम्या २:१-२०

नहेम्या

२ अर्तहशश्‍त राजाच्या+ शासनकाळाच्या २० व्या वर्षी+ निसान* महिन्यात, राजापुढे मद्य ठेवलेलं होतं. मी नेहमीप्रमाणे मद्याचा प्याला राजाच्या हातात दिला.+ यापूर्वी मी राजासमोर कधीही उदास दिसलो नव्हतो. २ तेव्हा राजा मला म्हणाला: “तू आजारी नाहीस, मग इतका उदास का दिसतोस? तुला काहीतरी काळजी असल्याशिवाय असं होणार नाही.” हे ऐकल्यावर मी खूप घाबरलो.

३ तेव्हा मी म्हणालो: “महाराजांना मोठं आयुष्य लाभो! माझ्या वाडवडिलांना ज्या शहरात पुरलं आहे, ते शहर उजाड पडलं आहे आणि त्याची फाटकं जळून खाक झाली आहेत.+ मग, माझं मन उदास होणार नाही का?” ४ तेव्हा राजा मला म्हणाला: “तुझी काय इच्छा आहे, सांग.” हे ऐकून मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली.+ ५ त्यानंतर मी राजाला म्हणालो: “तुमची हरकत नसेल आणि तुमच्या या सेवकावर तुमची कृपा असेल, तर यहूदामध्ये ज्या शहरात माझ्या वाडवडिलांना पुरलं आहे, तिथे मला पाठवा, म्हणजे मी ते पुन्हा बांधीन.”+ ६ मग राजा, ज्याच्या शेजारी त्याची राणीही बसली होती, त्याने मला विचारलं: “तुझा प्रवास किती दिवसांचा असेल आणि तू कधी परत येशील?” अशा रितीने, राजा मला पाठवायला तयार झाला+ आणि मी त्याला माझ्या परत येण्याची निश्‍चित वेळ सांगितली.+

७ मग मी राजाला म्हणालो: “महाराजांची माझ्यावर कृपा असेल, तर नदीपलीकडच्या* प्रांताच्या राज्यपालांसाठी मला पत्रं देण्यात यावीत,+ म्हणजे ते मला त्यांच्या प्रदेशातून जाऊ देतील आणि मी यहूदापर्यंत सुखरूपपणे पोहोचू शकेन. ८ तसंच, महाराजांचा वनरक्षक आसाफ याच्यासाठीही एक पत्र मला द्यावं, म्हणजे तो मंदिराच्या किल्ल्याची दारं,+ शहराच्या भिंती+ आणि मी ज्या घरात राहीन ते बांधण्यासाठी मला लाकडं देईल.” तेव्हा राजाने मला पत्रं दिली,+ कारण माझा देव माझ्यासोबत होता.*+

९ मग मी नदीपलीकडच्या प्रांताच्या राज्यपालांकडे आलो आणि त्यांना राजाची पत्रं दिली. राजाने माझ्यासोबत सैन्याचे अधिकारी आणि घोडेस्वार यांनाही पाठवलं होतं. १० इस्राएलच्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी आला आहे, ही गोष्ट होरोनी सनबल्लट+ आणि अम्मोनी+ अधिकारी* तोबीया+ यांना समजली, तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नाही.

११ शेवटी मी यरुशलेमला पोहोचलो आणि तिथे तीन दिवस राहिलो. १२ मी रात्री उठून आपल्यासोबत काही माणसांना घेतलं. यरुशलेमसाठी जे करण्याचं माझ्या देवाने माझ्या मनात घातलं होतं, त्याबद्दल मी कोणालाही सांगितलं नाही. आणि ज्या गाढवावर मी बसलो होतो, त्याच्याशिवाय आमच्यासोबत इतर कोणतंच जनावर नव्हतं. १३ मी रात्री खोऱ्‍याच्या फाटकातून+ गेलो आणि मोठ्या सापाच्या कारंज्यासमोरून, राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकाकडे+ गेलो. यरुशलेमच्या पडलेल्या भिंतींची आणि त्याच्या जळून गेलेल्या फाटकांची+ मी पाहणी केली. १४ नंतर मी पुढे कारंज्याच्या फाटकाकडे+ आणि राजाच्या तळ्याकडे गेलो. मी ज्या गाढवावर बसलो होतो, त्याला तिथून पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. १५ तरीही, रात्री मी खोऱ्‍याच्या वाटेने+ पुढे जात भिंतीची पाहणी करत राहिलो. त्यानंतर मी परत फिरलो आणि खोऱ्‍याच्या फाटकातून आत येऊन आपल्या घरी परतलो.

१६ मी कुठे गेलो होतो आणि काय करत होतो, हे उपअधिकाऱ्‍यांना+ माहीत नव्हतं. कारण मी यहुदी लोकांना, याजकांना, उच्च घराण्यातल्या लोकांना, उपअधिकाऱ्‍यांना आणि मंदिराच्या बांधकामात भाग घेणाऱ्‍या इतरांना काहीच सांगितलं नव्हतं. १७ शेवटी मी त्यांना म्हणालो: “आपली परिस्थिती किती वाईट आहे! पाहा, यरुशलेम उजाड पडलं आहे आणि त्याची फाटकं आगीने जाळून टाकण्यात आली आहेत. चला, आपण यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधू, म्हणजे आपल्यावर हा कलंक राहणार नाही.” १८ मग देव कशा प्रकारे माझ्यासोबत होता+ आणि राजा मला काय म्हणाला,+ हे मी त्या सर्वांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले: “चला आपण बांधकाम सुरू करू.” मग त्यांनी या चांगल्या कामासाठी एकमेकांना प्रोत्साहन दिलं.*+

१९ जेव्हा होरोनी सनबल्लट, अम्मोनी+ अधिकारी* तोबीया+ आणि अरबी गेशेम+ यांनी याविषयी ऐकलं, तेव्हा ते आमची थट्टा करू लागले.+ ते तिरस्काराने आम्हाला म्हणाले: “तुम्ही हे काय चालवलंय? महाराजांविरुद्ध तुम्ही बंड करणार आहात का?”+ २० तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं: “स्वर्गातला देवच आम्हाला यश देईल+ आणि आम्ही त्याचे सेवक हे बांधकाम पूर्ण करू. पण यरुशलेममध्ये तुमचा काहीच भाग नाही किंवा तुम्ही कोणताच हक्क सांगू शकत नाही आणि यरुशलेमच्या इतिहासात तुमचं नाव असावं, असं तुम्ही काहीही केलेलं नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा