स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी.
१४ मूर्ख* माणसं आपल्या मनात म्हणतात:
“यहोवा अस्तित्वात नाही.”+
ते वाईट कामं करतात आणि त्यांची वागणूक घृणास्पद आहे;
चांगली कामं करणारा एकही नाही.+
२ पण यहोवा स्वर्गातून खाली मानवांकडे पाहतो.
सखोल समज दाखवणारा आणि यहोवाचा शोध घेणारा कोणी आहे का, हे तो पाहतो.+
३ ते सगळे भरकटले आहेत;+
सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत.
चांगली कामं करणारा एकही नाही,
एकसुद्धा नाही!
४ दुर्जनांपैकी कोणालाही कळत नाही का?
भाकर खावी तसे ते माझ्या लोकांना खाऊन टाकतात.
ते यहोवाला हाक मारत नाहीत.
६ दुर्जनांनो, तुम्ही गरिबाच्या योजना धुळीला मिळवू पाहता,
पण यहोवा त्याचा आश्रय आहे.+
७ सीयोनवरून इस्राएलचं तारण होवो!+
बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना यहोवा गोळा करेल,
तेव्हा याकोब आनंदी होवो, इस्राएल हर्ष करो!