स्तोत्र
१०६ याहची स्तुती करा!*
२ यहोवाच्या पराक्रमांचं पूर्णपणे वर्णन कोण करू शकतं?
त्याच्या सगळ्या अद्भुत कार्यांबद्दल कोण सांगू शकतं?+
३ जे न्यायाने वागतात;
जे नेहमी योग्य ते करतात ते सुखी!+
४ हे यहोवा, तू आपल्या लोकांवर कृपा* करशील तेव्हा माझी आठवण ठेव.+
माझी काळजी घे आणि मला वाचव.
५ म्हणजे तुझ्या निवडलेल्या लोकांना तू दाखवत असलेला चांगुलपणा मला अनुभवता येईल;+
तुझ्या राष्ट्रासोबत मी आनंद करू शकेन
आणि तुझ्या वारशाच्या लोकांसोबत मी अभिमानाने तुझी स्तुती करू शकेन.*
७ आमच्या वाडवडिलांनी इजिप्तमध्ये तुझ्या अद्भुत कार्यांची कदर केली नाही.*
तू दाखवलेल्या अपार एकनिष्ठ प्रेमाची त्यांनी आठवण ठेवली नाही;
उलट त्यांनी समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ बंड केलं.+
९ त्याने तांबड्या समुद्राला दटावलं आणि तो सुकून गेला.
वाळवंटातून* न्यावं, तसं त्याने खोल समुद्रातून त्यांना नेलं.+
१२ मग त्याच्या अभिवचनावर त्यांचा विश्वास बसला.+
ते त्याची स्तुती गाऊ लागले.+
१५ त्यांनी जे मागितलं, ते त्याने दिलं;
पण मग त्याने एका भयंकर रोगाने त्यांना पीडित केलं,
त्यामुळे ते अशक्त होऊन मेले.+
१६ छावणीत ते मोशेवर जळफळू लागले.
यहोवाचा निवडलेला सेवक अहरोन+ याच्यावरही ते जळफळू लागले.+
१७ तेव्हा पृथ्वीने तोंड उघडून दाथानला गिळून टाकलं
अबीरामसोबत जमलेल्यांना तिने गडप केलं.+
१८ त्यांच्या जमावात आग भडकली;
आगीच्या ज्वालांनी त्या दुष्टांना भस्म केलं.+
२० माझा गौरव त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या प्रतिमेला दिला.+
२२ त्याने हामच्या देशात अद्भुत कार्यं केली;+
तांबड्या समुद्राजवळ त्याने विस्मयकारक गोष्टी घडवून आणल्या.+
२३ तो तर त्यांचा सर्वनाश करणार होता;
पण त्याचा विनाशकारी क्रोध शांत करण्यासाठी
त्याचा निवडलेला सेवक मोशे, याने त्यांच्या वतीने याचना केली.*+
२६ म्हणून, त्याने ओसाड रानातच त्यांचा नाश करण्याची,
हात वर करून शपथ घेतली.+
२७ त्याने देशादेशांत त्यांची पांगापांग करण्याची
आणि परक्या राष्ट्रांमध्ये त्यांचा नाश करण्याची शपथ घेतली.+
३० शेवटी, फिनहासने उठून कार्य केलं
तेव्हा कुठे पीडा थांबली.+
३१ त्याच्या या कार्यामुळे पिढ्या न् पिढ्या सर्वकाळासाठी
त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.+
३७ ते दुष्ट स्वर्गदूतांना
आपल्या मुलांचा आणि मुलींचा बळी द्यायचे.+
३८ ते निर्दोष रक्त सांडत राहिले;+
कनानच्या मूर्तींसमोर बळी देण्यासाठी,
त्यांनी आपल्याच मुलामुलींचं रक्त सांडलं.+
यामुळे देश रक्तपाताने दूषित झाला.
४० त्यामुळे यहोवाचा राग त्याच्या लोकांवर भडकला,
आपल्या वारशाच्या लोकांची त्याला घृणा वाटू लागली.
४१ त्याने पुन्हापुन्हा त्यांना इतर राष्ट्रांच्या हाती दिलं;+
त्यांचा द्वेष करणाऱ्यांना त्याने त्यांच्यावर राज्य करू दिलं.+
४२ त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर अत्याचार केले,
त्यांना त्यांच्या सत्तेखाली* राहावं लागलं.
४३ त्याने कित्येकदा त्यांना सोडवलं,+
पण ते पुन्हा बंड करून त्याच्या आज्ञा मोडायचे+
आणि त्यांच्या अपराधामुळे त्यांची दुर्दशा व्हायची.+
४५ त्यांच्यासाठी तो आपला करार आठवायचा
आणि त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे त्याला त्यांची दया यायची.*+
४६ त्यांना बंदी बनवणाऱ्यांच्या मनात
तो त्यांच्याबद्दल दया उत्पन्न करायचा.+
४७ हे यहोवा, आमच्या देवा, आम्हाला वाचव+
आणि सर्व राष्ट्रांतून आम्हाला एकत्र कर,+
म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देऊ
आणि खूप आनंदाने तुझी स्तुती करू.+
आणि सर्व लोक ‘आमेन’* म्हणोत
याहची स्तुती करा!*