थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र
२ पण बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती+ आणि त्याच्याजवळ आपलं एकत्र केलं जाणं+ यांबद्दल आम्हाला हे सांगायचं आहे: २ यहोवाचा* दिवस+ आला आहे असं सुचवणाऱ्या कोणत्याही प्रेरित संदेशामुळे,+ तोंडी सांगितलेल्या संदेशामुळे किंवा आमच्याकडून आहे असं भासणाऱ्या पत्रामुळे लगेच गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका.
३ कोणीही तुम्हाला बहकवू नये* म्हणून सांभाळा. कारण जोपर्यंत धर्मत्याग+ होत नाही आणि अनीतिमान माणूस,+ म्हणजेच नाशाचा मुलगा प्रकट होत नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही.+ ४ हा नाशाचा मुलगा विरोधी असून देव समजल्या जाणाऱ्या प्रत्येकापेक्षा आणि पूज्य समजल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूपेक्षा स्वतःला वरचढ करतो. अशा रितीने तो देवाच्या मंदिरात बसून आपण जणू एक देव असल्याचं सगळ्यांना दाखवतो. ५ मी तुमच्यामध्ये असताना तुम्हाला या गोष्टी सांगायचो, हे तुम्हाला आठवत नाही का?
६ आणि ठरवलेल्या वेळी त्याने प्रकट व्हावं म्हणून त्याला कोणी रोखून धरलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे. ७ हे खरं आहे, की या अनीतिमान माणसाचं कार्य आधीच सुरू झालं आहे+ आणि ते गुप्त आहे. पण, जोपर्यंत रोखून धरणारा मार्गातून निघणार नाही, तोपर्यंतच हे कार्य गुप्त राहील. ८ मग मात्र तो अनीतिमान माणूस प्रकट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या तोंडाच्या श्वासाने नाहीसं करेल+ आणि आपली उपस्थिती प्रकट करून नष्ट करेल.+ ९ पण, अनीतिमान माणसाची उपस्थिती सैतानाच्या प्रभावामुळे असून+ तो प्रत्येक शक्तिशाली कार्य, खोटी चिन्हं, चमत्कार,+ १० आणि सर्व प्रकारच्या अनीतीची आणि फसवणुकीची कामं करेल.+ आणि जे नाशाकडे वाटचाल करत आहेत त्यांची यांमुळे फसवणूक होईल. हीच त्यांची शिक्षा आहे, कारण तारण मिळावं म्हणून त्यांनी सत्यावर प्रेम केलं नाही. ११ आणि त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा, म्हणून देव एका फसव्या प्रभावामुळे त्यांची दिशाभूल होऊ देतो.+ १२ हे यासाठी, की त्या सर्वांचा न्याय केला जावा, कारण त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीमध्ये आनंद मानला.
१३ पण यहोवाला* प्रिय असलेल्या माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण देवाने आपल्या पवित्र शक्तीने* तुम्हाला पवित्र करण्याद्वारे+ आणि सत्यावरच्या तुमच्या विश्वासाद्वारे सुरुवातीपासूनच तारणासाठी तुमची निवड केली.+ १४ आम्ही घोषित करत असलेल्या आनंदाच्या संदेशाद्वारे त्याने तुम्हाला बोलावलं. हे यासाठी, की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्हालाही गौरवलं जावं.+ १५ तर मग बांधवांनो, स्थिर उभे राहा+ आणि ज्या गोष्टी* तुम्ही आमच्याकडून शिकून घेतल्या, मग त्या तोंडी दिलेल्या संदेशाद्वारे असोत किंवा पत्राद्वारे असोत, त्यांना जडून राहा.+ १६ शिवाय, स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केलं+ आणि अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचं सांत्वन आणि एक चांगली आशा दिली,+ तो देव जो आपला पिता आहे, १७ त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावं आणि तुम्हाला स्थिर* करावं, म्हणजे तुमचं वागणं आणि बोलणं नेहमी चांगलं असेल.