वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • अबशालोमचा पराभव आणि मृत्यू (१-१८)

      • दावीदला अबशालोमच्या मृत्यूची खबर दिली जाते (१९-३३)

२ शमुवेल १८:१

समासातील संदर्भ

  • +नीत २०:१८

२ शमुवेल १८:२

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६; १०:७
  • +१इत २:१५, १६
  • +२शमु २३:१८, १९
  • +२शमु १५:१९, २१

२ शमुवेल १८:३

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:१७
  • +२शमु १७:१-३; विल ४:२०

२ शमुवेल १८:५

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:१२

२ शमुवेल १८:६

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२६

२ शमुवेल १८:७

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:१५
  • +स्तो ३:७; नीत २४:२१, २२

२ शमुवेल १८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. ३१

२ शमुवेल १८:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६; १८:२

२ शमुवेल १८:१२

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:५

२ शमुवेल १८:१४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “भाले; बरच्या.”

  • *

    शब्दशः “हृदयात.”

२ शमुवेल १८:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१०; नीत २:२२; २०:२०; ३०:१७

२ शमुवेल १८:१७

समासातील संदर्भ

  • +यहो ७:२४, २६; ८:२९; १०:२३, २७

२ शमुवेल १८:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१७
  • +२शमु १४:२७

२ शमुवेल १८:१९

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३५, ३६; १७:१७
  • +स्तो ९:४

२ शमुवेल १८:२०

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:५

२ शमुवेल १८:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:६

२ शमुवेल १८:२४

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:४
  • +२रा ९:१७

२ शमुवेल १८:२७

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:१९

२ शमुवेल १८:२८

समासातील संदर्भ

  • +२शमु २२:४७; स्तो १४४:१

२ शमुवेल १८:२९

तळटीपा

  • *

    हे कूशी माणसाला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:२२

२ शमुवेल १८:३१

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:२१
  • +२शमु २२:४९; स्तो ५५:१८; ९४:१; १२४:२, ३

२ शमुवेल १८:३२

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:२

२ शमुवेल १८:३३

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१०; १७:१४; १९:१; नीत १९:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. १८:१नीत २०:१८
२ शमु. १८:२२शमु ८:१६; १०:७
२ शमु. १८:२१इत २:१५, १६
२ शमु. १८:२२शमु २३:१८, १९
२ शमु. १८:२२शमु १५:१९, २१
२ शमु. १८:३२शमु २१:१७
२ शमु. १८:३२शमु १७:१-३; विल ४:२०
२ शमु. १८:५२शमु १८:१२
२ शमु. १८:६२शमु १७:२६
२ शमु. १८:७२शमु १६:१५
२ शमु. १८:७स्तो ३:७; नीत २४:२१, २२
२ शमु. १८:१०२शमु ८:१६; १८:२
२ शमु. १८:१२२शमु १८:५
२ शमु. १८:१५२शमु १२:१०; नीत २:२२; २०:२०; ३०:१७
२ शमु. १८:१७यहो ७:२४, २६; ८:२९; १०:२३, २७
२ शमु. १८:१८उत्प १४:१७
२ शमु. १८:१८२शमु १४:२७
२ शमु. १८:१९२शमु १५:३५, ३६; १७:१७
२ शमु. १८:१९स्तो ९:४
२ शमु. १८:२०२शमु १८:५
२ शमु. १८:२१उत्प १०:६
२ शमु. १८:२४२शमु १८:४
२ शमु. १८:२४२रा ९:१७
२ शमु. १८:२७२शमु १८:१९
२ शमु. १८:२८२शमु २२:४७; स्तो १४४:१
२ शमु. १८:२९२शमु १८:२२
२ शमु. १८:३१२शमु १८:२१
२ शमु. १८:३१२शमु २२:४९; स्तो ५५:१८; ९४:१; १२४:२, ३
२ शमु. १८:३२स्तो २७:२
२ शमु. १८:३३२शमु १२:१०; १७:१४; १९:१; नीत १९:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल १८:१-३३

२ शमुवेल

१८ मग दावीदने आपल्यासोबत असलेल्या माणसांची संख्या मोजली, आणि शंभर-शंभर व हजार-हजार माणसांचे गट करून त्यांच्यावर प्रमुख नेमले.+ २ दावीदने आपल्यासोबत असलेल्या माणसांना तीन गटांमध्ये पाठवलं: एक गट यवाबच्या+ अधिकाराखाली, दुसरा गट यवाबचा भाऊ, म्हणजे सरूवाचा+ मुलगा अबीशय+ याच्या अधिकाराखाली आणि तिसरा गट गथचा राहणारा इत्तय+ याच्या अधिकाराखाली पाठवला. मग राजा त्यांना म्हणाला: “मीसुद्धा तुमच्यासोबत येईन.” ३ पण ते त्याला म्हणाले: “तुम्ही आमच्यासोबत येऊ नका.+ कारण आम्ही जर पळून गेलो, तर त्यांना त्याचं काही वाटणार नाही. आणि आमच्यातले अर्धे लोक जरी मेले, तरीही त्यांना काही फरक पडणार नाही. पण तुमचं मोल आमच्यातल्या १०,००० माणसांपेक्षा जास्त आहे.+ म्हणून, तुम्ही शहरातच राहून आम्हाला मदत पुरवली तर बरं होईल.” ४ त्यावर राजा त्यांना म्हणाला: “तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं मी करीन.” मग राजा शहराच्या दरवाजाजवळ उभा राहिला आणि सगळी माणसं शंभर व हजारांच्या गटांत बाहेर पडली. ५ त्या वेळी राजाने यवाब, अबीशय आणि इत्तय यांना असा आदेश दिला: “माझ्यासाठी त्या तरुणासोबत, अबशालोमसोबत नरमाईने वागा.”+ राजाने जेव्हा प्रमुखांना अबशालोमविषयी हा आदेश दिला, तेव्हा सगळ्या माणसांनी तो ऐकला.

६ मग सगळी माणसं इस्राएलचा सामना करण्यासाठी शहराबाहेर गेली, आणि एफ्राईमच्या जंगलात युद्ध झालं.+ ७ तिथे दावीदच्या सेवकांनी इस्राएलच्या लोकांना+ हरवलं.+ आणि त्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन २०,००० माणसं मारली गेली. ८ हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरलं. त्या दिवशी तलवारीमुळे जितके लोक मारले गेले, त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक जंगलामुळे मारले गेले.

९ शेवटी, अबशालोमची दावीदच्या सेवकांशी गाठ पडली. त्या वेळी अबशालोम खेचरावर बसून चालला होता. खेचरावर बसून पळून जात असताना, ते खेचर एका मोठ्या झाडाच्या दाट फांद्यांखालून गेलं. आणि अबशालोमचं डोकं त्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलं. तो ज्या खेचरावरून जात होता, ते पुढे निघून गेलं आणि अबशालोम तिथेच अधांतरी लटकत राहिला. १० मग कोणीतरी ते पाहिलं आणि यवाबला+ जाऊन असं सांगितलं: “मी अबशालोमला एका मोठ्या झाडाला लटकलेलं पाहिलं.” ११ तेव्हा यवाब त्या माणसाला म्हणाला: “तू जर ते पाहिलंस, तर मग त्याला तिथल्या तिथे मारून जमिनीवर का पाडलं नाहीस? तू तसं केलं असतंस, तर मी तुझ्यावर खूश होऊन तुला चांदीचे दहा तुकडे आणि एक कमरबंद दिला नसता का?” १२ पण तो माणूस यवाबला म्हणाला: “तुम्ही मला १,००० चांदीचे तुकडे जरी दिले असते, तरी मी राजाच्या मुलावर हात उचलला नसता. कारण राजाने जेव्हा अबीशयला, इत्तयला आणि तुम्हाला आदेश दिला होता, की ‘त्या तरुण अबशालोमवर कोणीही हात उचलणार नाही याची काळजी घ्या,’+ तेव्हा आम्ही ते ऐकलं होतं. १३ तो आदेश मोडून मी जर अबशालोमचा जीव घेतला असता, तर ही गोष्ट राजापासून मुळीच लपून राहिली नसती आणि तुम्हीही मला वाचवलं नसतं.” १४ त्यावर यवाब त्याला म्हणाला: “मी तुझ्यामागे आणखी वेळ वाया घालवणार नाही.” मग त्याने तीन टोकदार सळया* घेतल्या आणि मोठ्या झाडाला जिवंत लटकत असलेल्या अबशालोमच्या छातीत* त्या खुपसल्या. १५ मग यवाबची शस्त्रं वाहणारे दहा सेवक तिथे आले आणि अबशालोमवर वार करून त्यांनी त्याला ठार मारलं.+ १६ लोकांनी इस्राएलचा पाठलाग करायचं सोडून द्यावं, म्हणून मग यवाबने रणशिंग फुंकलं; अशा प्रकारे यवाबने त्यांना थांबवलं. १७ मग त्यांनी अबशालोमचा मृतदेह घेऊन तो जंगलात एका मोठ्या खड्ड्यात फेकला व त्यावर दगडांचा मोठा ढीग केला;+ आणि सगळे इस्राएली आपल्या घरी पळून गेले.

१८ अबशालोम जेव्हा जिवंत होता, तेव्हा त्याने ‘राजाच्या खोऱ्‍यात’+ स्वतःसाठी एक स्तंभ उभारला होता. कारण तो म्हणाला: “माझं नाव पुढे चालवायला मला मुलगा नाही.”+ म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचं नाव दिलं, आणि आजपर्यंत त्याला अबशालोमचा स्मारकस्तंभ असं म्हटलं जातं.

१९ सादोकचा मुलगा अहीमास+ म्हणाला: “मला परवानगी द्या. म्हणजे मी धावत जाऊन राजाला ही खबर देईन. कारण यहोवाने राजाला आपल्या शत्रूंपासून सुटका देऊन त्यांना न्याय दिलाय.”+ २० पण यवाब त्याला म्हणाला: “नाही, आज तू खबर घेऊन जाणार नाहीस. दुसऱ्‍या एखाद्या दिवशी तू खबर घेऊन जा, पण आज नको. कारण राजाचा स्वतःचा मुलगा मेलाय.”+ २१ मग यवाबने एका कूशी+ माणसाला म्हटलं: “जा, तू जे काही पाहिलंस ते राजाला जाऊन सांग.” तेव्हा तो कूशी माणूस यवाबला नमन करून धावत निघाला. २२ मग सादोकचा मुलगा अहीमास पुन्हा यवाबला म्हणाला: “काहीही झालं तरी चालेल. पण मलासुद्धा त्या कूशी माणसाच्या मागे धावत जाऊ द्या.” पण यवाब त्याला म्हणाला: “माझ्या मुला, तुझ्याजवळ सांगायला काही खबर नाही, मग तू कशाला त्याच्यामागे धावत जातोस?” २३ तरीसुद्धा तो म्हणाला: “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” म्हणून मग यवाब त्याला म्हणाला: “ठीक आहे, जा!” तेव्हा अहीमास, यार्देन प्रांताच्या रस्त्याने धावत निघाला आणि शेवटी त्या कूशी माणसाच्या पुढे निघून गेला.

२४ इकडे, दावीद शहराच्या दोन दरवाजांच्या मधे बसला होता.+ त्या वेळी एक पहारेकरी+ शहराच्या भिंतीला लागून असलेल्या दरवाजाच्या छतावर गेला होता. पहारेकऱ्‍याने समोर पाहिलं तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. २५ त्यामुळे पहारेकऱ्‍याने मोठ्याने ओरडून राजाला ते सांगितलं. त्यावर राजा म्हणाला: “तो जर एकटाच असेल, तर तो नक्कीच खबर घेऊन आला असेल.” तो माणूस जवळ येत होता, २६ तेवढ्यात पहारेकऱ्‍याला आणखी एक माणूस धावत येताना दिसला. पहारेकरी मग मोठ्याने ओरडून द्वारपालाला म्हणाला: “पाहा! आणखी एक माणूस धावत येतोय!” त्यावर राजा म्हणाला: “हासुद्धा खबरच घेऊन येतोय.” २७ पहारेकरी पुढे म्हणाला: “पहिल्या माणसाचं धावणं सादोकचा मुलगा अहीमास+ याच्यासारखं वाटतंय.” त्यावर राजा म्हणाला: “तो एक चांगला माणूस आहे. आणि तो नेहमी चांगली खबर घेऊन येतो.” २८ अहीमास धावत येत मोठ्याने राजाला म्हणाला: “सगळं काही ठीक आहे!” मग त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला नमन केलं. आणि तो राजाला म्हणाला: “तुमचा देव यहोवा याची स्तुती होवो! कारण माझ्या प्रभूविरुद्ध, राजाविरुद्ध बंड करणाऱ्‍यांना त्याने तुमच्या हवाली केलंय.”+

२९ पण राजाने विचारलं: “तो तरुण अबशालोम तर ठीक आहे ना?” त्यावर अहीमास म्हणाला: “यवाबने राजाच्या सेवकाला* आणि आपल्या या सेवकाला पाठवलं, त्या वेळी तिथे खूप मोठा गोंधळ माजलेला मी पाहिला. पण नेमकं काय झालं ते मला समजलं नाही.”+ ३० तेव्हा राजा त्याला म्हणाला: “तू बाजूला हो आणि इकडे उभा राहा.” म्हणून तो बाजूला जाऊन उभा राहिला.

३१ मग तो कूशी माणूस तिथे पोहोचला+ आणि म्हणाला: “माझ्या प्रभूसाठी, राजासाठी मी एक खबर आणली आहे: आज यहोवाने, तुमच्या विरोधात उठलेल्या सगळ्या लोकांच्या हातून तुम्हाला सोडवलंय आणि तुम्हाला न्याय दिलाय.”+ ३२ पण राजाने त्या कूशी माणसाला विचारलं: “तो तरुण अबशालोम तर ठीक आहे ना?” त्यावर तो कूशी माणूस म्हणाला: “राजाच्या, माझ्या प्रभूच्या सगळ्या शत्रूंची गत, आणि तुमचं वाईट करण्यासाठी तुमच्या विरोधात उठणाऱ्‍या सगळ्यांची गत त्या तरुणासारखीच होवो!”+

३३ हे ऐकून राजाला फार गहिवरून आलं. आणि तो दरवाजाच्या वर असलेल्या छतावरच्या खोलीत जाऊन रडला. वर चढून जाता असताना तो म्हणत होता: “माझ्या मुला अबशालोम! माझ्या मुला! तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर बरं झालं असतं! अबशालोम माझ्या मुला!”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा