स्तोत्र
चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.
१२४ “जर यहोवा आपल्या पाठीशी नसता,”+
—आता इस्राएलने म्हणावं—
२ “जर यहोवा आपल्या पाठीशी नसता,+
तर जेव्हा माणसं आपल्यावर हल्ला करायला उठली;+
३ जेव्हा त्यांचा क्रोध आपल्यावर भडकला,+
तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळून टाकलं असतं.+
४ पाण्याने आपल्याला वाहून नेलं असतं,
महापुराने आपल्याला गडप केलं असतं.+
५ आणि उसळतं पाणी आपल्या डोक्यावरून गेलं असतं.
६ यहोवाची स्तुती असो!
कारण शत्रूंनी फाडून खाल्लेल्या शिकारीसारखं, त्याने आपल्याला होऊ दिलं नाही.
७ फासेपारध्याच्या सापळ्यातून बचावलेल्या पक्ष्यासारखे आपण आहोत;+
सापळा तोडून टाकण्यात आला
आणि आपण निसटलो.+
८ ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली,
त्या यहोवाच्या नावामुळे आपल्याला साहाय्य मिळतं.”+