यिर्मया
४ यहोवा म्हणतो: “हे इस्राएल, तू जर परत फिरशील,
माझ्याकडे परत येशील,
आणि तुझ्या घृणास्पद मूर्ती माझ्यासमोरून काढून टाकशील,
तर तुला भटकत राहावं लागणार नाही.+
२ आणि ‘यहोवाच्या जीवनाची शपथ,’ असं म्हणून शपथ घेताना तू जर ती खरेपणाने, न्यायाने आणि नीतीने घेशील,
तर राष्ट्रांना त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल,
आणि त्याच्यामुळे ते अभिमानाने बोलतील.”+
३ कारण यहूदाच्या आणि यरुशलेमच्या माणसांना यहोवा म्हणतो:
“सुपीक जमीन नांगरा,
काट्याकुट्यांत पेरणी करत बसू नका.+
नाहीतर तुमच्या दुष्ट कामांमुळे,
माझा क्रोध तुमच्यावर आगीसारखा भडकेल;
तो असा पेटेल, की कोणालाही तो शांत करता येणार नाही.”+
५ यहूदामध्ये घोषणा करा आणि यरुशलेममध्ये जाहीर करा.
देशभरात रणशिंग फुंका आणि मोठ्याने ओरडा.+
मोठ्या आवाजात अशी घोषणा करा:
“एकत्र या, आपण सगळे तटबंदी असलेल्या शहरांत पळून जाऊ.+
६ निशाणी म्हणून सीयोनच्या दिशेने झेंडा उभारा.
हातावर हात ठेवून बसू नका,
आश्रयाची जागा शोधा.”
कारण मी उत्तरेकडून संकट आणत आहे;+
मी एक मोठा विनाश आणत आहे.
तो तुझ्या देशाची अशी अवस्था करायला निघाला आहे, की ती पाहणाऱ्यांना दहशत बसेल.
तुझी शहरं उद्ध्वस्त केली जातील, आणि त्यांत एकही रहिवासी उरणार नाही.+
८ म्हणून गोणपाट घाला,+
आणि शोक* व आक्रोश करा,
कारण आपल्यावर भडकलेला यहोवाचा राग अजून शांत झालेला नाही.
९ यहोवा म्हणतो: “त्या दिवशी राजाचं धैर्य खचेल,+
त्याच्या अधिकाऱ्यांचंही धैर्य खचेल.
याजक घाबरून जातील आणि संदेष्ट्यांना आश्चर्याचा धक्का बसेल.”+
१० मग मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! तू या लोकांना आणि यरुशलेमला पूर्णपणे फसवलंस.+ तलवार आमच्या मानेवर असताना तू म्हणालास, की ‘तुम्हाला शांती मिळेल.’”+
११ त्या वेळी या लोकांना आणि यरुशलेमला असं सांगितलं जाईल:
“वाळवंटातल्या उजाड टेकड्यांवरून येणारा जोरदार उष्ण वारा,
माझ्या मुलीवर,* माझ्या लोकांवर वाहील;
पण तो वारा धान्यापासून भुसा वेगळा करायला किंवा धान्य स्वच्छ करायला येणार नाही.
१२ हा जोरदार वारा माझ्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणांवरून येतोय.
आता मी माझ्या लोकांवर न्यायदंड बजावीन.
१३ पाहा! तो पावसाच्या ढगांसारखा येईल,
त्याचे रथ वादळी वाऱ्यासारखे आहेत.+
त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत.+
आता आपलं काही खरं नाही! आपला नाश निश्चित आहे!
१४ हे यरुशलेम, तुला जर आपला जीव वाचवायचा असेल,
तर आपल्या मनातला दुष्टपणा काढून टाक आणि आपलं मन शुद्ध कर.+
तू आणखी किती दिवस आपल्या मनात दुष्ट विचार बाळगत राहशील?
१५ कारण दानकडून एक आवाज बातमी जाहीर करतोय,+
तो एफ्राईमच्या डोंगरांतून संकटाची घोषणा करतोय.
१६ ही गोष्ट राष्ट्रांना सांगा;
यरुशलेममध्ये याची घोषणा करा.”
“एका दूरच्या देशातून हेर* येत आहेत,
ते येऊन यहूदाच्या शहरांविरुद्ध मोठ्याने युद्धाची घोषणा करतील.
१७ ते शेतांची राखण करणाऱ्यांसारखे चारही बाजूंनी येत आहेत,+
कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केलंय,”+ असं यहोवा म्हणतो.
१८ “तुला तुझ्या स्वतःच्या वागणुकीचे आणि कामांचे परिणाम भोगावे लागतील.+
तुझा बंडखोरपणा तुझ्या मनात अगदी खोलवर रुजलेला आहे,
म्हणून तुझ्यावर येणारं संकट फार भयंकर असेल!”
१९ मी फार दुःखी आहे! खरंच मी फार दुःखी आहे!
माझ्या मनाला भयंकर वेदना होत आहेत.
माझं हृदय धडधडतय.
२० एकापाठोपाठ एक संकट कोसळत असल्याची बातमी येत आहे,
संपूर्ण देशाचा नाश झालाय.
माझे तंबू एकाएकी जमीनदोस्त झाले आहेत,
एका क्षणात माझे तंबू खाली पडले आहेत.+
२१ सीयोनच्या दिशेने उभारलेल्या झेंड्याकडे मी किती वेळ पाहत बसू?
रणशिंगाचा आवाज मी किती वेळ ऐकत राहू?+
२२ “माझे लोक मूर्ख आहेत;+
ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत.
ती मूर्ख मुलं आहेत; त्यांना काहीच समजत नाही.
वाईट गोष्टी करण्याच्या बाबतीत ते हुशार* आहेत,
पण चांगल्या गोष्टी कशा करायच्या हे मात्र त्यांना माहीत नाही.”
२३ मी देशाकडे पाहिलं, तेव्हा तो मला रिकामा आणि ओसाड पडलेला दिसला.+
मी वर आकाशाकडे पाहिलं, तर तिथे मला प्रकाश दिसला नाही.+
२४ मी डोंगरांकडे पाहिलं, तर ते हादरत होते,
आणि टेकड्या थरथर कापत होत्या.+
२५ मी पाहिलं, तेव्हा मला एकही माणूस दिसला नाही,
आकाशातले सगळे पक्षीही उडून गेले होते.+
२६ मी पाहिलं, तेव्हा फळबाग ओसाड रान बनली होती,
आणि तिची सगळी शहरं जमीनदोस्त झाली होती.+
हे सगळं यहोवामुळे,
त्याच्या जळजळीत क्रोधामुळे झालं होतं.
मी स्वतः हे बोललोय,
मी स्वतः हे ठरवलंय,
आणि यामुळेच असं घडेल.
मी माझं मन बदलणार नाही* किंवा मी जे बोललोय ते केल्याशिवाय राहणार नाही.+
२९ घोडेस्वारांचा आणि तिरंदाजांचा आवाज ऐकताच,
शहरातले सगळे लोक पळून जातात.+
ते दाट झाडाझुडपांत शिरतात,
आणि खडकांवर चढतात.+
प्रत्येक शहर ओसाड पडलंय,
त्यात एकही माणूस राहत नाही.”
३० तुझा तर नाश झालाय, आता तू काय करशील?
पूर्वी तू गडद लाल रंगाचे कपडे घालायचीस,
स्वतःला सोन्याच्या दागिन्यांनी सजवायचीस,
आणि डोळ्यांना काजळ लावायचीस.
पण तुझं हे सगळं नटणं व्यर्थ आहे,+
कारण आपल्या वासना तृप्त करण्यासाठी तुझ्या मागे येणाऱ्यांनी तुला झिडकारलंय,
आणि आता ते तुझा जीव घ्यायला टपले आहेत.+
३१ कारण वेदनेने तळमळणाऱ्या स्त्रीच्या आवाजासारखा आवाज मी ऐकलाय,
पहिल्या मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या ओरडण्याच्या आवाजासारखा आवाज मी ऐकलाय,
धापा टाकणाऱ्या सीयोनच्या मुलीचा आवाज मी ऐकलाय.
ती आपले हात पसरून म्हणत आहे:+
“माझ्यावर ही कोणती वेळ आली आहे! माझा जीव घेणाऱ्यांमुळे मी पार दमून गेले आहे!”