वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • मोशेचा जन्म (१-४)

      • फारोची मुलगी मोशेला दत्तक घेते (५-१०)

      • मोशे मिद्यानला पळून जातो आणि सिप्पोराशी लग्न करतो (११-२२)

      • देव इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकतो (२३-२५)

निर्गम २:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२०; गण २६:५९

निर्गम २:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२०; इब्री ११:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९७, पृ. ३०

निर्गम २:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “पपायरस गवत.”

  • *

    किंवा “संदूक.”

  • *

    हिब्रूमध्ये डांबरासारख्याच असलेल्या “शिलाजित” या पदार्थाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:१८, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. ९

    ५/१/१९९७, पृ. ३०

निर्गम २:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२०; १इत ६:३; मीख ६:४

निर्गम २:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९७, पृ. ३०

निर्गम २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. ९

    ५/१/१९९७, पृ. ३०

निर्गम २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. ९-११

निर्गम २:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. ९-१०

निर्गम २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. १०-११

    ५/१/१९९७, पृ. ३०-३१

निर्गम २:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, “बाहेर काढलेला,” अर्थात पाण्यातून वाचवलेला.

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:२४, २५
  • +प्रेका ७:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. १०

    ५/१/१९९७, पृ. ३१

निर्गम २:११

तळटीपा

  • *

    किंवा “मोशे ताकदवान होऊ लागल्यावर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:११; ३:७; प्रेका ७:२३

निर्गम २:१२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२४

निर्गम २:१३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२६

निर्गम २:१४

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२७, २८

निर्गम २:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:१, २; निर्ग ३:१; ४:१९

निर्गम २:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:१२

निर्गम २:१७

तळटीपा

  • *

    किंवा “रक्षण केलं.”

निर्गम २:१८

तळटीपा

  • *

    म्हणजे, इथ्रो.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४:१८; १८:१; गण १०:२९

निर्गम २:१९

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:२२

निर्गम २:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:२-४; गण १२:१

निर्गम २:२२

तळटीपा

  • *

    म्हणजे, “तिथे एक विदेशी.”

समासातील संदर्भ

  • +१इत २३:१५
  • +प्रेका ७:२९

निर्गम २:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बऱ्‍याच दिवसांनी.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:७; प्रेका ७:३०
  • +निर्ग ३:७; १रा ८:५१

निर्गम २:२४

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:३४
  • +उत्प १५:१३, १४; निर्ग ६:५; गण २०:१५, १६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. २:१निर्ग ६:२०; गण २६:५९
निर्ग. २:२प्रेका ७:२०; इब्री ११:२३
निर्ग. २:३प्रेका ७:१८, १९
निर्ग. २:४निर्ग १५:२०; १इत ६:३; मीख ६:४
निर्ग. २:५प्रेका ७:२१
निर्ग. २:८निर्ग ६:२०
निर्ग. २:१०इब्री ११:२४, २५
निर्ग. २:१०प्रेका ७:२१
निर्ग. २:११निर्ग १:११; ३:७; प्रेका ७:२३
निर्ग. २:१२प्रेका ७:२४
निर्ग. २:१३प्रेका ७:२६
निर्ग. २:१४प्रेका ७:२७, २८
निर्ग. २:१५उत्प २५:१, २; निर्ग ३:१; ४:१९
निर्ग. २:१६निर्ग १८:१२
निर्ग. २:१८निर्ग ४:१८; १८:१; गण १०:२९
निर्ग. २:१९प्रेका ७:२२
निर्ग. २:२१निर्ग १८:२-४; गण १२:१
निर्ग. २:२२१इत २३:१५
निर्ग. २:२२प्रेका ७:२९
निर्ग. २:२३निर्ग ७:७; प्रेका ७:३०
निर्ग. २:२३निर्ग ३:७; १रा ८:५१
निर्ग. २:२४प्रेका ७:३४
निर्ग. २:२४उत्प १५:१३, १४; निर्ग ६:५; गण २०:१५, १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम २:१-२५

निर्गम

२ या काळात, लेवी वंशातल्या एका माणसाने आपल्याच वंशातल्या एका मुलीशी लग्न केलं.+ २ मग ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. आपलं बाळ खूप सुंदर आहे, हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवलं.+ ३ पण त्याला लपवणं आता शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं,+ तेव्हा तिने एक लव्हाळ्याची* पेटी* घेऊन तिला डांबर* लावलं आणि तिने आपलं बाळ त्या पेटीत ठेवलं. मग तिने ती पेटी नाईल नदीच्या काठावर गवतात ठेवली. ४ आणि त्या बाळाची बहीण+ काही अंतरावर उभी राहून, त्याचं पुढे काय होतं हे पाहू लागली.

५ मग फारोची मुलगी नाईल नदीत अंघोळ करायला आली; तिच्या दासी नदीच्या कडेने चालत असताना, तिला गवतात ती पेटी दिसली आणि तिने लगेच आपल्या एका दासीला ती आणायला पाठवलं.+ ६ पेटी उघडल्यावर तिला ते बाळ दिसलं. तो मुलगा रडत होता. तिला त्याची दया आली, पण ती म्हणाली: “हे तर इब्री लोकांचं मूल आहे.” ७ तेव्हा त्याची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली: “मी जाऊन, या बाळाला दूध पाजण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी एका इब्री दाईला बोलावू का?” ८ फारोची मुलगी तिला म्हणाली: “जा!” तेव्हा ती मुलगी लगेच गेली आणि तिने बाळाच्या आईला+ बोलावून आणलं. ९ फारोची मुलगी तिला म्हणाली: “या मुलाला घेऊन जा आणि माझ्यासाठी याला दूध पाज आणि त्याची काळजी घे. मी तुला त्याची मजुरी देईन.” तेव्हा ती त्या मुलाला घेऊन गेली आणि त्याला दूध पाजून त्याची काळजी घेऊ लागली. १० मुलगा थोडा मोठा झाल्यावर, तिने त्याला फारोच्या मुलीकडे आणलं. फारोच्या मुलीने त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारलं.+ तिने त्याचं नाव मोशे* ठेवलं आणि ती म्हणाली: “कारण मी याला पाण्यातून बाहेर काढलं.”+

११ नंतर, मोशे मोठा झाल्यावर,* त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना करावे लागणारे कष्ट पाहिले.+ त्याने इजिप्तच्या एका माणसाला, आपल्या इब्री भाऊबंदांपैकी एकाला मारताना पाहिलं. १२ त्याने इकडेतिकडे बघितलं आणि कोणी नाही हे पाहिल्यावर, त्याने इजिप्तच्या त्या माणसाला ठार मारून वाळूत लपवलं.+

१३ दुसऱ्‍या दिवशी मोशे पुन्हा बाहेर गेला, तेव्हा त्याला दोन इब्री माणसं मारामारी करताना दिसली. तेव्हा ज्याची चूक होती, त्याला तो म्हणाला: “आपल्या भावाला का मारतोस?”+ १४ यावर तो म्हणाला: “तुम्हाला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमलं? इजिप्तच्या त्या माणसाला ठार मारलं, तसं आता मलाही मारण्याचा विचार आहे का?”+ हे ऐकून मोशे घाबरला आणि मनात म्हणाला: “नक्कीच ही गोष्ट सगळ्यांना कळली असेल!”

१५ फारोला याविषयी समजलं, तेव्हा त्याने मोशेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून, मोशे फारोपासून दूर मिद्यान+ देशात पळून गेला. तिथे तो एका विहिरीजवळ जाऊन बसला. १६ मिद्यानच्या याजकाला+ सात मुली होत्या. त्या विहिरीवर येऊन हौदांमध्ये पाणी भरायच्या आणि आपल्या वडिलांच्या कळपांना पाणी पाजायच्या. १७ पण नेहमीप्रमाणे, मेंढपाळांनी येऊन त्यांना हाकलून लावलं. तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत केली* आणि त्यांच्या कळपांना पाणी पाजलं. १८ त्या घरी आपला पिता रगुवेल*+ याच्याकडे आल्या, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज तुम्ही इतक्या लवकर कशा परत आलात?” १९ यावर त्या म्हणाल्या: “इजिप्तच्या एका माणसाने+ आम्हाला मेंढपाळांपासून वाचवलं. त्याने कळपांसाठी पाणीही काढून दिलं.” २० तो आपल्या मुलींना म्हणाला: “पण तो आहे कुठे? तुम्ही त्याला सोडून का आलात? त्याला आपल्याकडे जेवायला बोलवा.” २१ मग मोशे त्या माणसाकडे राहायला तयार झाला आणि त्या माणसाने आपली मुलगी सिप्पोरा+ हिच्याशी मोशेचं लग्न लावून दिलं. २२ पुढे तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव गेर्षोम*+ ठेवलं. कारण तो म्हणाला, “मी एका परक्या देशात विदेशी झालोय.”+

२३ बऱ्‍याच वर्षांनी* इजिप्तचा राजा मरण पावला,+ पण इस्राएली लोक गुलामीमुळे कण्हत होते आणि दुःखाने रडत होते. गुलामगिरीत होत असलेल्या त्रासामुळे, ते सतत देवाकडे मदतीची याचना करायचे.+ २४ मग देवाने त्यांचं कण्हणं ऐकलं+ आणि त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली.+ २५ तेव्हा देवाने इस्राएली लोकांकडे लक्ष दिलं आणि त्यांना होणारा त्रास पाहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा