वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

दानीएल रूपरेषा

      • पर्शियाचे आणि ग्रीसचे राजे (१-४)

      • दक्षिणेचे आणि उत्तरेचे राजे (५-४५)

        • कर वसूल करणारा येईल (२०)

        • कराराच्या प्रमुखाचा नाश (२२)

        • किल्ल्यांच्या देवाचा गौरव (३८)

        • दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा राजा यांच्यात लढाई (४०)

        • पूर्वेकडून आणि उत्तरेकडून बेचैन करणाऱ्‍या बातम्या येतील (४४)

दानीएल ११:१

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्यासाठी मजबूत किल्ला म्हणून उभा राहिलो.”

समासातील संदर्भ

  • +दान ५:३०, ३१; ९:१

दानीएल ११:२

समासातील संदर्भ

  • +दान ८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१७, पृ. ४

दानीएल ११:३

समासातील संदर्भ

  • +दान ८:५, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१७, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. २६-२८

दानीएल ११:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “आकाशाच्या चार वाऱ्‍यांकडे.”

समासातील संदर्भ

  • +दान ७:६; ८:८, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१७, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. २८-२९

दानीएल ११:८

तळटीपा

  • *

    किंवा “ओतीव मूर्ती.”

दानीएल ११:१४

तळटीपा

  • *

    किंवा “लुटारूंची मुलं.”

दानीएल ११:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:२; दान ८:९; ११:४१, ४५

दानीएल ११:२०

तळटीपा

  • *

    हे अशा माणसालाही सूचित करू शकतं, जो लष्करी सेवेसाठी लोकांची नावनोंदणी करतो.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. ५

    ज्ञान, पृ. ३६

दानीएल ११:२१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तो चेतावणी न देता येईल.”

  • *

    किंवा “फसवणूक.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. ५

    ज्ञान, पृ. ३६

दानीएल ११:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८; प्रेका ३:२५
  • +दान ९:२५; योह १:४५, ४९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. ५

    ज्ञान, पृ. ३६

दानीएल ११:२४

तळटीपा

  • *

    किंवा “चेतावणी न देता.”

दानीएल ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९९, पृ. ३०-३१

दानीएल ११:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ५

दानीएल ११:२७

समासातील संदर्भ

  • +दान १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ५

दानीएल ११:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ५

दानीएल ११:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १२-१३

दानीएल ११:३०

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:४; गण २४:२४; यश २३:१; यिर्म २:१०; यहे २७:६
  • +दान ११:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १३-१४

दानीएल ११:३१

समासातील संदर्भ

  • +दान ८:११
  • +दान ८:१२
  • +दान १२:११; मत्त २४:१५; मार्क १३:१४; लूक २१:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १४-१५

दानीएल ११:३२

तळटीपा

  • *

    किंवा “गोडगोड बोलून; फसवणूक करून.”

  • *

    किंवा “धर्मत्याग.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १५-१६

दानीएल ११:३३

तळटीपा

  • *

    किंवा “समज देतील.”

समासातील संदर्भ

  • +दान १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १५-१६

दानीएल ११:३४

तळटीपा

  • *

    किंवा “खुशामत करून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६, १२-१३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १६

दानीएल ११:३५

समासातील संदर्भ

  • +दान १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १६-१७

दानीएल ११:३६

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१७; स्तो १३६:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १७

दानीएल ११:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १७

दानीएल ११:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १७-१८

दानीएल ११:३९

तळटीपा

  • *

    किंवा “किल्ल्यांविरुद्ध यशस्वी होईल.”

  • *

    किंवा कदाचित, “तो ज्यांचा सन्मान करतो.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १८

दानीएल ११:४०

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला शिंगं मारेल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १८

दानीएल ११:४१

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:२; दान ८:९; ११:१६, ४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १३-१४

    शुद्ध उपासना, पृ. १८३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १८

दानीएल ११:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १८

दानीएल ११:४३

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्यामागे जातील.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १८

दानीएल ११:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १५

    शुद्ध उपासना, पृ. १८३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २९-३०

    ११/१/१९९३, पृ. २०-२२

दानीएल ११:४५

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:२; दान ८:९; ११:१६, ४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १५

    शुद्ध उपासना, पृ. १८३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २९-३०

    ११/१/१९९३, पृ. २०-२२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

दानी. ११:१दान ५:३०, ३१; ९:१
दानी. ११:२दान ८:२१
दानी. ११:३दान ८:५, २१
दानी. ११:४दान ७:६; ८:८, २२
दानी. ११:१६स्तो ४८:२; दान ८:९; ११:४१, ४५
दानी. ११:२२उत्प १५:१८; प्रेका ३:२५
दानी. ११:२२दान ९:२५; योह १:४५, ४९
दानी. ११:२७दान १२:९
दानी. ११:३०उत्प १०:४; गण २४:२४; यश २३:१; यिर्म २:१०; यहे २७:६
दानी. ११:३०दान ११:२८
दानी. ११:३१दान ८:११
दानी. ११:३१दान ८:१२
दानी. ११:३१दान १२:११; मत्त २४:१५; मार्क १३:१४; लूक २१:२०
दानी. ११:३३दान १२:१०
दानी. ११:३५दान १२:१०
दानी. ११:३६अनु १०:१७; स्तो १३६:१, २
दानी. ११:४१स्तो ४८:२; दान ८:९; ११:१६, ४५
दानी. ११:४५स्तो ४८:२; दान ८:९; ११:१६, ४१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
दानीएल ११:१-४५

दानीएल

११ मेदचा राजा दारयावेश+ याच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी, मी त्याला हिंमत द्यायला आणि बळ द्यायला उभा राहिलो.* २ आता मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी खरी आहे:

पाहा! पर्शियात आणखी तीन राजे सत्तेवर येतील. चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनसंपत्ती जमा करेल. तो जेव्हा आपल्या धनसंपत्तीच्या जोरावर शक्‍तिशाली होईल, तेव्हा तो सगळं काही ग्रीसच्या राज्याविरुद्ध+ उभं करेल.

३ मग एक शक्‍तिशाली राजा सत्तेवर येईल आणि मोठ्या अधिकाराने राज्य करेल.+ तो आपल्या मनाला येईल तसं वागेल. ४ तो जेव्हा अतिशय शक्‍तिशाली होईल, तेव्हा त्याच्या राज्याचे तुकडे-तुकडे केले जातील आणि ते चार दिशांना* विभागलं जाईल.+ पण त्याच्या वंशजांना ते मिळणार नाही. तसंच, त्याच्या अधिकाराखाली असताना ते राज्य जितकं शक्‍तिशाली होतं, तितकं ते नंतर राहणार नाही. कारण ते मुळासकट उपटून इतरांना दिलं जाईल.

५ मग त्याचा एक अधिकारी, म्हणजे दक्षिणेचा राजा शक्‍तिशाली होईल. पण दुसरा एक अधिकारी त्याच्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली होऊन जास्त अधिकाराने राज्य करेल.

६ काही वर्षांनंतर ते एकमेकांशी करार करतील. आणि हा करार पक्का करण्यासाठी दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे येईल. पण तिची सत्ता टिकणार नाही; तसंच राजा आणि त्याची सत्ताही टिकणार नाही. तिला आणि तिला घेऊन येणाऱ्‍यांना दुसऱ्‍यांच्या हाती दिलं जाईल; तसंच, ज्याने तिला जन्म दिला त्याला आणि ज्याने त्या काळात तिला शक्‍तिशाली बनवलं त्यालाही दुसऱ्‍यांच्या हाती दिलं जाईल. ७ पण तिच्याच कुटुंबातला एक जण त्याच्या जागी सत्तेवर येईल. आणि तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर व त्याच्या किल्ल्यावर हल्ला करेल. तो त्यांच्याशी लढेल आणि त्यांच्यावर विजय मिळवेल. ८ तो त्यांची दैवतं, धातूच्या मूर्ती* आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू घेऊन इजिप्तला येईल. तसंच, तो तिथल्या लोकांना बंदी करून इजिप्तला आणेल. आणि काही वर्षं तो उत्तरेच्या राजाच्या वाट्याला जाणार नाही. ९ उत्तरेचा राजा मात्र दक्षिणेच्या राजाच्या राज्यावर हल्ला करेल, पण तो आपल्या देशात परत निघून जाईल.

१० त्याची मुलं युद्धाची तयारी करतील आणि एक मोठं, अफाट सैन्य जमवतील. तो पुढे-पुढे जात राहील आणि पुराच्या पाण्यासारखा देशातून पार जाईल. पण तो परत मागे वळेल आणि लढाई करत करत आपल्या किल्ल्यापर्यंत येईल.

११ मग दक्षिणेचा राजा रागाने पेटून उठेल, आणि उत्तरेच्या राजाशी जाऊन लढेल. आणि तो लोकांचा एक मोठा जमाव गोळा करेल, पण तो जमाव त्याच्या हाती दिला जाईल. १२ तो त्या जमावाला घेऊन जाईल आणि त्यामुळे त्याचं मन गर्वाने फुगेल. तो लाखोंचा नाश करेल; तो खूप ताकदवान होईल, पण तो आपल्या ताकदीचा उपयोग करणार नाही.

१३ उत्तरेचा राजा परत येईल. तो आधीपेक्षा खूप मोठा जमाव गोळा करेल. काही काळाने व काही वर्षांनी, तो युद्धसामग्रीने सज्ज असलेलं एक मोठं सैन्य घेऊन नक्की येईल. १४ त्या काळात, अनेक जण दक्षिणेच्या राजाच्या विरोधात उभे राहतील.

आणि तुझ्या लोकांमधले जे हिंसक लोक* आहेत तेही इतरांच्या प्रभावाखाली येऊन दृष्टान्त खरा ठरवण्याचा प्रयत्न करतील; पण ते पडतील.

१५ उत्तरेचा राजा येईल आणि एका तटबंदीच्या शहराला वेढा घालून ते काबीज करेल. त्याच्याविरुद्ध दक्षिणेचं सैन्य किंवा त्यांचे शूरवीर टिकाव धरू शकणार नाहीत; आणि त्याचा सामना करण्याचं बळ त्यांच्यात उरणार नाही. १६ त्याच्याविरुद्ध येणारा आपल्या मनाला येईल तसं करेल, आणि त्याच्यापुढे कोणीही टिकाव धरू शकणार नाही. तो ‘सुंदर देशात’+ उभा राहील आणि त्याच्या हातात समूळ नाश करण्याची ताकद असेल. १७ तो आपल्या राज्याच्या पूर्ण ताकदीने येण्याचा पक्का निश्‍चय करेल. पण त्याच्यासोबत एक करार केला जाईल; आणि तो आपल्या कामात यशस्वी होईल. त्याला स्त्रियांच्या मुलीचा नाश करण्याचा अधिकार दिला जाईल. ती मुलगी त्याला विश्‍वासू राहणार नाही किंवा त्याच्या पक्षाची राहणार नाही. १८ मग तो समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या प्रदेशांकडे आपलं लक्ष वळवेल आणि त्यांतले अनेक प्रदेश काबीज करेल. त्याने फासलेला काळिमा एक सेनापती पुसून टाकेल; त्या सेनापतीची आणखी बदनामी होणार नाही. उलट, तो सेनापतीच त्याची बदनामी करेल. १९ मग तो स्वतःच्या देशातल्या किल्ल्यांकडे आपलं लक्ष वळवेल. पण तो अडखळून पडेल आणि त्याचा पत्ता लागणार नाही.

२० मग त्याच्या जागी दुसरा एक जण उभा राहील. तो वैभवशाली राज्यात कर वसूल करणाऱ्‍याला* पाठवेल. मात्र काही दिवसांतच त्याचा नाश होईल; पण क्रोधाने किंवा युद्धाने नाही.

२१ नंतर तुच्छ असलेला एक जण त्याच्या जागी येईल. ते त्याला शाही मानसन्मान देणार नाहीत. तो शांतीच्या काळात येईल* आणि कटकारस्थान* करून राज्य मिळवेल. २२ तो पुरासारख्या मोठ्या सैन्याला हरवून टाकेल, आणि त्यांचा नाश होईल; कराराच्या+ प्रमुखाचाही+ नाश होईल. २३ त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या करारामुळे तो फसवणूक करत राहील. तो हल्ला करेल आणि छोट्याशा राष्ट्राच्या जोरावर शक्‍तिशाली बनेल. २४ शांतीच्या काळात,* तो प्रांतामधल्या सगळ्यात चांगल्या भागांत घुसेल आणि अशी कामं करेल जी त्याच्या वाडवडिलांनीही कधी केली नाहीत. तो लुटीचा माल आणि सामानसुमान त्यांना वाटून देईल. आणि तटबंदीच्या जागा काबीज करायला कट रचेल; पण फक्‍त काही काळासाठी.

२५ तो दक्षिणेच्या राजावर हल्ला करण्यासाठी आपलं सगळं बळ आणि धैर्य एकवटेल; तो त्याच्या विरोधात एक मोठं सैन्य तयार करेल. दक्षिणेचा राजाही युद्धासाठी तयारी करेल; तोसुद्धा एक अतिशय मोठं आणि शक्‍तिशाली सैन्य उभं करेल. पण त्याचा टिकाव लागणार नाही, कारण ते त्याच्याविरुद्ध कट रचतील. २६ त्याचं अन्‍न खाणारेच त्याच्या नाशाचं कारण बनतील.

आणि त्याच्या सैन्याचा पराभव होईल आणि त्यातले अनेक जण मारले जातील.

२७ या दोन्ही राजांच्या मनाचा कल वाईट गोष्टी करण्याकडे असेल. ते एकाच मेजावर बसून एकमेकांशी खोटं बोलतील. पण त्यातून काहीच साध्य होणार नाही, कारण अंत हा नेमलेल्या वेळीच येईल.+

२८ उत्तरेचा राजा भरपूर सामानसुमान घेऊन आपल्या देशात परत जाईल, आणि त्याचं मन पवित्र कराराच्या विरोधात असेल. त्याला आपल्या कामात यश मिळेल आणि तो आपल्या देशात परत जाईल.

२९ पण नेमलेल्या समयी तो परत येईल आणि दक्षिणेवर हल्ला करेल. मात्र आधी घडलं होतं, तसं या वेळी घडणार नाही. ३० कारण कित्तीमची+ जहाजं त्याच्या विरोधात येतील, आणि त्याला नमवलं जाईल.

तो मागे फिरेल आणि पवित्र करारावर आपला राग काढेल+ व आपल्या कामात यशस्वी होईल; तो मागे जाईल आणि पवित्र करार सोडून देणाऱ्‍यांकडे लक्ष देईल. ३१ त्याचं सैन्य उठेल आणि पवित्र ठिकाण, म्हणजे किल्ला भ्रष्ट करेल+ व नियमितपणे दिलं जाणारं बलिदान काढून टाकेल.+

आणि ते उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट उभी करतील.+

३२ आणि उत्तरेचा राजा कराराच्या विरोधात दुष्टपणे वागणाऱ्‍यांना फूस लावून* बंड* करायला लावेल. पण जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते शक्‍तिशाली होऊन आपल्या कामात यशस्वी होतील. ३३ लोकांपैकी ज्यांच्याकडे सखोल समज+ आहे ते अनेकांना बोध करतील.* ते काही दिवस तलवार, आग, बंदिवास आणि लूटमार यांमुळे अडखळून पडतील. ३४ पण जेव्हा ते अडखळतील, तेव्हा त्यांना थोडी मदत केली जाईल; आणि अनेक जण गोडगोड बोलून* त्यांना जाऊन मिळतील. ३५ सखोल समज असलेल्यांपैकी काही जण अडखळतील; म्हणजे त्यांच्यामुळे पारखण्याचं काम, आणि अंताच्या समयापर्यंत शुद्ध आणि शुभ्र करण्याचं काम होईल.+ कारण हे नेमलेल्या समयी पूर्ण होईल.

३६ उत्तरेचा राजा आपल्या मनाला येईल तसं वागेल. तो इतर सर्व देवांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ करेल आणि स्वतःचा जास्त गौरव करेल. तो देवांच्या देवाविरुद्ध+ धक्कादायक गोष्टी बोलेल. आणि क्रोधाचा काळ पूर्ण होईपर्यंत तो यशस्वी ठरेल; कारण देवाने जे ठरवलंय ते नक्कीच पूर्ण होईल. ३७ तो इतर कोणत्याही देवाची किंवा स्त्रियांच्या इच्छेची कदर करणार नाही. तो इतर सर्वांपेक्षा स्वतःचा जास्त गौरव करेल. तो आपल्या वाडवडिलांच्या देवाचा सन्मान करणार नाही. ३८ त्याच्या ऐवजी तो किल्ल्यांच्या देवाचा गौरव करेल; त्याच्या वाडवडिलांना माहीत नव्हता अशा देवाचा तो सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं आणि अनमोल गोष्टी यांनी गौरव करेल. ३९ तो एका परक्या देवाच्या मदतीने सगळ्यात मजबूत किल्ल्यांवर हल्ला करेल.* त्याला मान देणाऱ्‍यांचा* तो खूप गौरव करेल आणि त्यांना अनेकांवर राज्य करायचा अधिकार देईल; तसंच, तो किंमत घेऊन जमीन वाटून देईल.

४० अंताच्या समयी दक्षिणेचा राजाही त्याच्याशी लढाई करेल.* आणि उत्तरेचा राजा आपले रथ, घोडेस्वार आणि अनेक जहाजं घेऊन त्याच्याशी लढायला येईल; तो अनेक देशांमध्ये घुसेल आणि पुराच्या पाण्यासारखा त्यांच्यातून पार जाईल. ४१ तो ‘सुंदर देशातही’+ शिरेल आणि अनेक देशांचा पराभव होईल. पण जे त्याच्या हातून सुटतील ते हे: अदोम, मवाब आणि अम्मोनी लोकांपैकी मुख्य लोक. ४२ तो देशांवर आपला हात चालवत राहील; आणि इजिप्त देशही त्याच्या हातून सुटणार नाही. ४३ तो इजिप्तच्या गुप्त धनावर, म्हणजे सोनं, चांदी आणि इतर सर्व मौल्यवान गोष्टी यांवर अधिकार मिळवेल. आणि लिबियाचे व इथियोपियाचे लोकही त्याच्या पावलांजवळ असतील.*

४४ पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणाऱ्‍या बातम्यांमुळे तो बेचैन होईल. आणि अनेकांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी तो मोठ्या संतापाने निघेल. ४५ मोठा समुद्र आणि ‘सुंदर देशाचा’+ पवित्र डोंगर, यांच्या मधे तो आपले शाही तंबू ठोकेल. पण त्याचा नाश होईल; कोणीही त्याच्या मदतीला येणार नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा