स्तोत्र
दावीदने यहूदाच्या ओसाड रानात असताना+ रचलेलं गीत.
६३ हे देवा, माझ्या देवा, मी तुला शोधत राहतो.+
माझा जीव* तुझ्यासाठी तहानलेला आहे.+
कोरड्या, रुक्ष आणि निर्जल देशात,
तुझ्या ओढीने माझा जीव कासावीस झालाय.+
२ मी तुला तुझ्या पवित्र ठिकाणी पाहिलंय;
तुझं सामर्थ्य आणि तुझं वैभव मी पाहिलंय.+
४ मी आयुष्यभर तुझी स्तुती करीन;
मी आपले हात उंचावून तुला हाक मारीन.
५ सगळ्यात चांगला आणि उत्तम वाटा मिळाल्यामुळे मी* तृप्त आहे,
म्हणून माझे ओठ आनंदाने तुझी स्तुती गातील.+
७ कारण मला साहाय्य करणारा तू आहेस,+
तुझ्या पंखांच्या सावलीत आनंदी होऊन, मी मोठ्याने तुझी स्तुती करतो.+
८ मी सतत तुला धरून राहतो;
तुझा उजवा हात मला आधार देतो.+
९ पण जे माझ्या जिवावर* उठले आहेत,
ते मृत्यूच्या खोल खळग्यात जातील.
१० त्यांना तलवारीच्या स्वाधीन केलं जाईल;
कोल्हे त्यांना खाऊन टाकतील.
११ पण राजा देवामुळे आनंदी होईल.
देवाची शपथ घेणारा प्रत्येक जण हर्ष करेल,*
पण खोटं बोलणाऱ्यांचं तोंड कायमचं बंद केलं जाईल.