स्तोत्र
चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.
१२२ “चला, आपण यहोवाच्या घरी जाऊ या,”
असं ते म्हणाले, तेव्हा मला खूप आनंद झाला.+
२ हे यरुशलेम, पाहा, आमची पावलं
तुझ्या फाटकांतून आत आली आहेत.+
३ हे यरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखं
तुला बांधण्यात आलंय.+
४ याहचे* वंश, वर यरुशलेमला गेले आहेत;
इस्राएलला दिलेल्या आज्ञेप्रमाणे,*
यहोवाच्या नावाची उपकारस्तुती करण्यासाठी ते गेले आहेत.+
६ यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा.+
हे नगरी, तुझ्यावर प्रेम करणारे सुरक्षित राहतील.
७ तुझ्या भिंतींच्या आत सदैव शांती नांदो!
तुझ्या तटबंदी बुरुजांमध्ये सुरक्षा वस्ती करो!
८ माझ्या भावांसाठी आणि माझ्या सोबत्यांसाठी मी म्हणेन:
“तुझ्यात सदैव शांती नांदो!”
९ आपला देव यहोवा याच्या घरासाठी,+
तुझं भलं व्हावं, अशी मी प्रार्थना करीन.