स्तोत्र
कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी सूचना. अलामोथ* शैलीनुसार गायलं जावं.
३ समुद्र जरी गर्जना करून फेसाळू लागला;+
किंवा त्याच्या खवळण्यामुळे पर्वत हादरू लागले, तरी आम्ही घाबरणार नाही. (सेला )
४ एका नदीच्या प्रवाहांमुळे, देवाचं शहर आनंदी होतं;+
सर्वोच्च देवाचा महान आणि पवित्र उपासना मंडप आनंदी होतो.
५ देव त्या शहरात आहे;+ त्या शहराचा कधीही नाश होणार नाही.
सूर्योदय होण्याआधीच तो त्या शहराच्या मदतीला धावून येईल.+
६ राष्ट्रं खवळली होती आणि राज्यं उलथून टाकण्यात आली होती,
पण देवाने आवाज चढवताच पृथ्वी विरघळली.+
८ या आणि यहोवाची कार्यं पाहा,
बघा, त्याने पृथ्वीवर किती अद्भुत कार्यं केली आहेत!
९ तो सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत करतो.+
तो धनुष्यं मोडून टाकतो आणि भाले तोडून टाकतो.
तो लढाईचे रथ* आगीत जाळून टाकतो.
१० तो म्हणाला, “मला शरण या आणि मीच देव आहे हे ओळखा.