यशया
४४ आता हे याकोब! माझ्या सेवका, माझं ऐक!
हे इस्राएल! माझ्या निवडलेल्या सेवका, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे.+
२ ज्याने तुला बनवलं, तुला घडवलं,+
तू आईच्या गर्भात होतास तेव्हापासून* ज्याने तुला मदत केली,
तो तुझा देव यहोवा असं म्हणतो:
‘याकोब माझ्या सेवका, तू घाबरू नकोस.+
हे यशुरून*+ माझ्या निवडलेल्या, तू भिऊ नकोस.
४ ते हिरव्या गवतासारखे,
आणि पाण्याच्या प्रवाहांजवळ लावलेल्या मोठ्या वृक्षांसारखे जोमाने वाढतील.+
५ कोणी म्हणेल: “मी यहोवाचा आहे,”+
तर कोणी स्वतःला याकोबचं नाव लावेल;
कोणी आपल्या हातावर “मी यहोवाचा आहे,” असं लिहील,
आणि इस्राएल हे नाव धारण करेल.’
६ इस्राएलचा राजा यहोवा,+ इस्राएलची सुटका करणारा+ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:
‘मीच पहिला आणि शेवटचा आहे.+
मला सोडून दुसरा कोणीही देव नाही.+
७ माझ्यासारखा कोण आहे?+
कोणी असेल तर त्याने जाहीरपणे बोलावं आणि मला ते सिद्ध करून दाखवावं!+
मी पूर्वीच्या लोकांची स्थापना केल्यापासून असा कोणी आहे का,
जो लगेच काय होईल आणि पुढे भविष्यात काय घडेल ते सांगू शकतो?
मी तुमच्यापैकी प्रत्येकाला आधीच सगळं काही सांगितलं नाही का? आणि सर्वकाही जाहीर केलं नाही का?
तुम्ही माझे साक्षीदार आहात.+
माझ्याशिवाय दुसरा कोणी देव आहे का?
नाही. माझ्याशिवाय दुसरा कोणताही खडक नाही;+ असा कोणी असल्याचं मला माहीत नाही.’”
९ कोरीव मूर्ती बनवणारे काहीच कामाचे नाहीत,
जिवापाड जपलेल्या त्यांच्या वस्तूंचा काहीच फायदा होणार नाही.+
त्या साक्षीदार असूनही त्यांना* काहीच दिसत किंवा समजत नाही,+
म्हणून त्यांना घडवणारे लज्जित केले जातील.+
१० जो देवाला घडवतो किंवा धातूची ओतीव मूर्ती बनवतो,
त्याला त्यांच्यापासून काही फायदा होतो का?+
११ पाहा! त्याला आणि त्याच्या सगळ्या सोबत्यांना लज्जित केलं जाईल!+
मूर्ती घडवणारी ही शेवटी माणसंच!
त्या सगळ्यांनी एकत्र जमावं आणि पुढे यावं.
भीतीने त्यांचा थरकाप उडेल आणि शरमेने त्यांना आपली मान खाली घालावी लागेल.
१२ लोहार आपलं अवजार हाती घेतो,
आणि निखाऱ्यांवर लोखंड तापवतो.
मग ते आपल्या मजबूत हातांनी ठोकून तो मूर्ती घडवतो.+
नंतर त्याला भूक लागते आणि तो गळून जातो;
पाणी न प्यायल्यामुळे तो पार दमून जातो.
१३ सुतार मोजमाप करायच्या दोरीने लाकडाचं माप घेतो आणि त्यावर लाल खडूने आकृती तयार करतो.
मग रंधा मारून तो कर्कटकाने त्यावर खुणा करतो.
१४ देवदाराची झाडं कापणारा एक वेगळ्या प्रकारचं झाड निवडतो; तो अल्लोनचं* झाड निवडतो,
आणि जंगलातल्या इतर झाडांसोबत वाढून ते मजबूत होईपर्यंत तो त्याची चांगली काळजी घेतो.+
तो ओरेनचं* झाड लावतो आणि पावसामुळे ते चांगलं वाढतं.
१५ मग तो त्या झाडाची लाकडं सरपण म्हणून वापरतो.
त्यातली काही लाकडं तो शेकोटी करण्यासाठी,
तर काही चूल पेटवून भाकरी भाजण्यासाठी वापरतो.
पण त्याच झाडाच्या लाकडापासून तो एक दैवतही बनवतो आणि त्याची पूजाअर्चा करतो.
त्यापासून तो एक कोरीव मूर्ती बनवून तिच्या पाया पडतो.+
१६ तो अर्धी लाकडं चुलीत घालून,
त्यांवर मांस भाजतो आणि ते खाऊन तृप्त होतो.
त्यापासून तो ऊबही घेतो आणि म्हणतो:
“वाह! शेकोटी किती छान पेटली; किती उबदार वाटतंय!”
१७ पण उरलेल्या लाकडापासून तो दैवताची एक कोरीव मूर्ती बनवतो.
तिच्या पाया पडून तो तिची पूजाअर्चा करतो.
मग तिच्यापुढे प्रार्थना करून तो म्हणतो:
“मला वाचव, कारण तू माझा देव आहेस.”+
१८ पण या लोकांना काहीच कळत नाही, त्यांना काहीच समजत नाही.+
त्यांचे डोळे घट्ट मिटलेले आहेत, त्यांना काहीच दिसत नाही,
त्यांची मनं बुद्धिहीन झाली आहेत.
१९ कोणालाही ज्ञान किंवा समज नाही;
कोणीही मनात विचार करून असं म्हणत नाही:
“यांतली अर्धी लाकडं तर मी आगीत जाळली,
त्यांच्या निखाऱ्यावर मी खाण्यासाठी भाकर आणि मांस भाजलं.
मग उरलेल्या लाकडांपासून मी एखादी घृणास्पद वस्तू कशी काय बनवू शकतो?+
या लाकडी ठोकळ्याच्या मी पाया कसं काय पडू शकतो?”
२० तो जणू राख खाणाऱ्या माणसासारखा आहे.
त्याच्या फसव्या हृदयाने त्याला बहकवलं आहे.
तो स्वतःचा जीव वाचवू शकत नाही,
किंवा, “माझ्या उजव्या हातात असलेली ही वस्तू खोटीच नाही का?” असंही तो म्हणत नाही.
२१ “हे याकोब! हे इस्राएल! या गोष्टी लक्षात ठेव,
कारण तू माझा सेवक आहेस.
मी तुला घडवलंय, तू माझा सेवक आहेस.+
हे इस्राएल, मी तुला कधीही विसरणार नाही.+
२२ मी तुझे अपराध पुसून टाकीन,
आणि तुझी पापं दाट ढगाने झाकून टाकीन.+
माझ्याकडे परत ये, म्हणजे मी तुझी सुटका करीन.+
२३ हे आकाशांनो, आनंदाने जयघोष करा!
कारण यहोवाने पाऊल उचललंय.
हे पृथ्वी, आनंदाने जयजयकार कर!
डोंगरांनो, जंगलांनो आणि तुमच्यातल्या सगळ्या झाडांनो, तुम्हीसुद्धा आनंद साजरा करा!+
कारण यहोवाने याकोबला सोडवलंय,
आणि इस्राएलवर आपलं वैभव प्रकट केलंय.”+
२४ ज्याने तुमची सुटका केली,+
तुम्ही गर्भात होता तेव्हापासून ज्याने तुम्हाला घडवलं, तो यहोवा असं म्हणतो:
“मी यहोवा आहे, मीच सगळं काही निर्माण केलंय.
त्या वेळी माझ्यासोबत कोण होतं?
२५ मी वायफळ गोष्टी बोलणाऱ्यांची* चिन्हं खोटी ठरवतो,
आणि शकुन पाहणाऱ्यांना वेड्यांसारखं वागायला लावतो;+
मी बुद्धिमान लोकांना गोंधळात पाडतो,
आणि त्यांचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवतो.+
२६ मी माझ्या सेवकाचा शब्द खरा ठरवतो.
माझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी पूर्ण करतो;+
मी यरुशलेमबद्दल म्हणतो,
‘तिच्यात पुन्हा लोकवस्ती होईल,’+
आणि यहूदाच्या शहरांविषयी म्हणतो,
‘ती पुन्हा बांधली जातील,+
आणि उद्ध्वस्त झालेलं यरुशलेम शहर मी पुन्हा बांधून काढीन’;+
२७ मी खोल पाण्याला म्हणतो, ‘आटून जा,
मी तुझ्या सर्व नद्या कोरड्या करीन’;+
‘तो माझा मेंढपाळ आहे,
मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी तो पूर्ण करेल,’+
मी यरुशलेमविषयी म्हणतो,
‘ती पुन्हा बांधली जाईल,’
आणि मंदिराविषयी म्हणतो, ‘तुझा पाया घातला जाईल.’”+