यिर्मया
४५ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी,+ नेरीयाच्या मुलाने, बारूखने+ यिर्मया संदेष्ट्याचा संदेश पुस्तकात लिहून काढला. यिर्मया जस-जसा त्याला संदेश सांगत गेला, तस-तसा बारूख तो लिहित गेला.+ त्या वेळी, यिर्मया बारूखला म्हणाला:
२ “हे बारूख, इस्राएलचा देव यहोवा तुझ्याविषयी म्हणतो, ३ ‘तू म्हणालास: “अरेरे! यहोवाने माझ्या दुःखात आणखी भर घातली आहे! कण्हून कण्हून मी पार थकून गेलोय. आणि मला कुठेच विसावा मिळत नाही.”’
४ म्हणून देव म्हणाला बारूखला सांग: ‘यहोवा असं म्हणतो, “पाहा! जो देश मी बांधलाय, तो मी पाडून टाकतोय, आणि जो देश मी रोपासारखा लावलाय, तो मी मुळासकट उपटून टाकतोय.+ ५ पण, तू मोठमोठ्या गोष्टी मिळवायची इच्छा बाळगतोस. अशा इच्छा बाळगू नकोस.”’
‘कारण, बघ! लवकरच मी सर्व लोकांवर संकट आणतोय.+ पण तू जिथे कुठे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवीन,’+ असं यहोवा म्हणतो.”