स्तोत्र
११८ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+
त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२ आता इस्राएलने म्हणावं:
“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”
३ आता अहरोनच्या घराण्याने म्हणावं:
“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”
४ आता यहोवाची भीती बाळगणाऱ्या लोकांनी म्हणावं:
“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”
६ यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.+
माणूस माझं काय बिघडवू शकतो?+
८ माणसांवर भरवसा ठेवण्यापेक्षा,
यहोवाचा आश्रय घेणं चांगलं आहे.+
९ अधिकाऱ्यांवर भरवसा ठेवण्यापेक्षा,
यहोवाचा आश्रय घेणं चांगलं आहे.+
११ त्यांनी मला वेढलं, हो, सर्व बाजूंनी वेढलं,
पण यहोवाच्या नावाने,
मी त्यांना हाकलून लावलं.
१२ त्यांनी मला माश्यांसारखं घेरलं,
पण आगीत काटे जळून जावेत, तशी ती राष्ट्रं लगेच भस्म झाली.
यहोवाच्या नावाने,
मी त्यांना हाकलून लावलं.+
१३ मी पडावं, म्हणून मला जोरात ढकलण्यात आलं,*
पण यहोवाने मला सावरलं.
१४ याह माझा आश्रय आणि माझी ताकद आहे,
तो माझ्यासाठी तारण ठरला आहे.+
१५ नीतिमानांचं तारण* झालंय,
म्हणून त्यांच्या तंबूंमधून आनंदाचा जल्लोष ऐकू येतोय.
यहोवाचा उजवा हात आपलं सामर्थ्य दाखवतोय.+
१६ यहोवाचा उजवा हात उंचावलाय;
यहोवाचा उजवा हात आपलं सामर्थ्य दाखवतोय.+
१७ मी मरणार नाही, मी जगेन,
याहच्या कार्यांचं वर्णन करण्यासाठी मी जगेन.+
१९ माझ्यासाठी नीतिमत्त्वाची दारं उघडा;+
म्हणजे मी आत जाऊन याहची स्तुती करीन.
२० हे यहोवाचं दार आहे.
नीतिमान त्यातून आत जातील.+
२१ मी तुझी स्तुती करीन, कारण तू मला उत्तर दिलंस+
आणि तू माझ्यासाठी तारण ठरलास.
२४ हा यहोवाने ठरवलेला दिवस आहे;
यात आम्ही आनंदाने जल्लोष करू.
२५ हे यहोवा, आम्ही याचना करतो, कृपा करून आम्हाला वाचव!
हे यहोवा, कृपा करून आम्हाला विजयी कर!
२७ यहोवा देव आहे;
तो आपल्याला प्रकाश देतो.+
२८ तू माझा देव आहेस, मी तुझी स्तुती करीन;
माझ्या देवा, मी तुझा महिमा करीन.+