स्तोत्र
दावीदचं स्तुतिगीत.
१३८ मी अगदी मनापासून तुझी स्तुती करीन.+
मी इतर देवांच्या देखत,
तुझं गुणगान गाईन.*
२ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्वासूपणामुळे,
मी तुझ्या पवित्र मंदिराकडे* वळून दंडवत घालीन+
आणि तुझ्या नावाची स्तुती करीन.+
कारण तू आपले शब्द आणि आपलं नाव,
इतर सर्व गोष्टींपेक्षा महान केलं आहेस.*
४ हे यहोवा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी स्तुती करतील;+
कारण तू दिलेली अभिवचनं त्यांनी ऐकली आहेत.
५ ते यहोवाच्या अद्भुत कार्यांचं गुणगान करतील,
कारण यहोवा अत्यंत गौरवशाली आहे.+
७ मी संकटात सापडलो, तरी तू माझ्या जिवाचं रक्षण करशील.+
माझ्या संतापलेल्या शत्रूंविरुद्ध तू आपला हात उगारशील;
तुझा उजवा हात मला वाचवेल.
८ यहोवा माझ्यासाठी असलेले त्याचे सर्व संकल्प पूर्ण करेल.