पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ईयोब रूपरेषा ईयोब पुस्तकाची रूपरेषा १ ईयोबचा खरेपणा आणि संपत्ती (१-५) सैतान ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्त करतो (६-१२) ईयोब आपली संपत्ती आणि मुलं गमावतो (१३-१९) ईयोब देवाला दोष देत नाही (२०-२२) २ सैतान पुन्हा ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्त करतो (१-५) सैतानाला ईयोबच्या शरीराला हानी करण्याची परवानगी (६-८) ईयोबची बायको म्हणते: “देवाची निंदा करा आणि मरा!” (९, १०) ईयोबचे तीन मित्र येतात (११-१३) ३ ईयोब आपल्या जन्माबद्दल दुःख व्यक्त करतो (१-२६) त्याच्यावर संकट का आलं, असं विचारतो (२०, २१) ४ अलीफजचं पहिलं भाषण (१-२१) ईयोबच्या खरेपणाची थट्टा करतो (७, ८) अदृश्य व्यक्तीचा संदेश सांगतो (१२-१७) देवाचा आपल्या सेवकांवर भरवसा नाही (१८) ५ अलीफजचं पहिलं भाषण पुढे सुरू (१-२७) देव बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो (१३) ईयोबने देवाची शिकवण नाकारू नये (१७) ६ ईयोबचं उत्तर (१-३०) त्याचं वेड्यासारखं बडबडणं योग्य आहे, असं म्हणतो (२-६) त्याला सांत्वन देणारे धोकेबाज आहेत (१५-१८) “प्रामाणिक शब्द मनावर घाव करत नाहीत!” (२५) ७ ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२१) जीवन सक्तीच्या मजुरीसारखं आहे (१, २) “तू मला आपलं निशाण का बनवलं आहेस?” (२०) ८ बिल्ददचं पहिलं भाषण (१-२२) ईयोबच्या मुलांनी पाप केलं असं सुचवतो (४) जर तू शुद्ध असतास, तर देवाने तुला वाचवलं असतं (६) ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो (१३) ९ ईयोबचं उत्तर (१-३५) नाशवंत माणूस देवासोबत वाद करू शकत नाही (२-४) देव गूढ कार्यं करतो (१०) कोणी देवाशी वाद करू शकत नाही (३२) १० ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२२) देव माझ्याशी भांडत आहे (२) देवाची आणि ईयोबची तुलना (४-१२) मला थोडा तरी आराम मिळेल (२०) ११ सोफरचं पहिलं भाषण (१-२०) विनाकारण बडबड करण्याचा ईयोबवर आरोप (२, ३) ईयोबला चुकीचं काम सोडून द्यायला सांगतो (१४) १२ ईयोबचं उत्तर (१-२५) “मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही” (३) “मी थट्टेचा विषय बनलोय” (४) देवाजवळ बुद्धी आहे (१३) देव न्यायाधीश आणि राजांपेक्षा श्रेष्ठ (१७, १८) १३ ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२८) मी देवाशी बोलीन (३) तुम्ही बिनकामाचे वैद्य आहात (४) “मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे” (१८) देव आपल्याला वैरी का समजतो, असं विचारतो (२४) १४ ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२२) मानवाचं आयुष्य फक्त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं (१) “झाडासाठीही आशा असते” (७) “कृपा करून, मला कबरेत लपव” (१३) “माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?” (१४) “मला पुन्हा पाहण्यासाठी तू आतूर होशील” (१५) १५ अलीफजचं दुसरं भाषण (१-३५) ईयोबला देवाचं भय नसल्याचा दावा करतो (४) ईयोबला गर्विष्ठ म्हणतो (७-९) “देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही भरवसा नाही” (१५) ज्याच्यावर संकट येतं तो दुष्ट असतो (२०-२४) १६ ईयोबचं उत्तर (१-२२) “तुमचं सांत्वन मला त्रासदायक वाटतं!” (२) देवाने मला आपलं निशाण बनवलंय असं म्हणतो (१२) १७ ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-१६) “थट्टा करणाऱ्यांनी मला घेरलंय” (२) “त्याने मला लोकांमध्ये थट्टेचा विषय बनवलंय” (६) “कबर माझं घर होईल” (१३) १८ बिल्ददचं दुसरं भाषण (१-२१) पापी लोकांसोबत काय होतं याचं वर्णन करतो (५-२०) ईयोब देवाला ओळखत नाही असं सुचवतो (२१) १९ ईयोबचं उत्तर (१-२९) मित्रांचं ताडन नाकारतो (१-६) सगळ्यांनी मला सोडून दिलंय असं म्हणतो (१३-१९) “मला सोडवणारा जिवंत आहे” (२५) २० सोफरचं दुसरं भाषण (१-२९) ईयोबने अपमान केलाय असं म्हणतो (२, ३) ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो (५) ईयोबला पाप करायला आवडतं असं म्हणतो (१२, १३) २१ ईयोबचं उत्तर (१-३४) दुष्टांची भरभराट का होते (७-१३) सांत्वन करणाऱ्यांचा खोटेपणा उघड करतो (२७-३४) २२ अलीफजचं तिसरं भाषण (१-३०) “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?” (२, ३) ईयोब लोभी आणि अन्यायी असल्याचा आरोप करतो (६-९) “देवाकडे परत ये, म्हणजे तो तुला पुन्हा समृद्ध करेल” (२३) २३ ईयोबचं उत्तर (१-१७) देवासमोर आपला वाद नेण्याची इच्छा व्यक्त करतो (१-७) देव सापडत नाही असं म्हणतो (८, ९) “मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही” (११) २४ ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२५) “देव एक वेळ का ठरवत नाही?” (१) देव दुष्टतेला परवानगी देतो असं म्हणतो (१२) पापी लोकांना अंधार आवडतो (१३-१७) २५ बिल्ददचं तिसरं भाषण (१-६) माणूस देवासमोर निर्दोष कसा असू शकतो (४) ईयोबचा खरेपणा व्यर्थ आहे असा दावा करतो (५, ६) २६ ईयोबचं उत्तर (१-१४) “व्वा! दुर्बळ माणसाला तू चांगलीच मदत केलीस!” (१-४) देवाने पृथ्वीला निराधार टांगलंय (७) देवाच्या कार्यांची फक्त किनार (१४) २७ खरेपणा टिकवून ठेवायचा ईयोबचा निश्चय (१-२३) “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!” (५) दुष्टांना आशा नाही (८) “तुमची भाषणं इतकी अर्थहीन का वाटतात?” (१२) दुष्टाकडे काहीच उरत नाही (१३-२३) २८ ईयोब मौल्यवान वस्तूंची तुलना बुद्धीशी करतो (१-२८) माणसाचं खाणकाम (१-११) बुद्धीचं मोल मोत्यांपेक्षाही जास्त (१८) यहोवाची भीती बाळगणं ही खरी बुद्धी (२८) २९ ईयोब संकटं येण्याआधीचे चांगले दिवस आठवतो (१-२५) शहराच्या फाटकाजवळ आदर (७-१०) त्याने पूर्वी केलेली न्यायाची कार्यं (११-१७) सर्व त्याचा सल्ला ऐकायचे (२१-२३) ३० ईयोब आपल्या बदललेल्या परिस्थितीचं वर्णन करतो (१-३१) मूर्ख लोक टिंगल करतात (१-१५) देवाकडून काहीच मदत नाही असं वाटतं (२०, २१) माझी कातडी काळवंडली आहे (३०) ३१ ईयोब आपल्या खरेपणाचं समर्थन करतो (१-४०) “डोळ्यांसोबत करार” (१) देवाने तोलून पाहावं असं म्हणतो (६) व्यभिचारी नाही (९-१२) पैशाचा लोभी नाही (२४, २५) मूर्तिपूजक नाही (२६-२८) ३२ अलीहू नावाचा तरुण चर्चेत सामील होतो (१-२२) ईयोबवर आणि त्याच्या मित्रांवर भडकतो (२, ३) मोठ्यांना मान देऊन, बोलण्याआधी वाट पाहतो (६, ७) फक्त वयामुळे शहाणपण येत नाही (९) अलीहू बोलायला आतुर (१८-२०) ३३ ईयोब स्वतःला नीतिमान समजत असल्यामुळे अलीहू ताडन करतो (१-३३) खंडणी मिळाली (२४) तारुण्यातला उत्साह परत मिळावा (२५) ३४ अलीहू देवाच्या न्यायाचं आणि मार्गांचं समर्थन करतो (१-३७) देवाने न्याय नाकारला असं ईयोब म्हणतो (५) देव कधीच दुष्टपणे वागत नाही (१०) ईयोबला काही माहीत नाही (३५) ३५ ईयोबच्या चुकीच्या तर्कांकडे अलीहू लक्ष वेधतो (१-१६) ईयोब स्वतःला देवापेक्षा जास्त नीतिमान म्हणतो (२) देव इतक्या उंचावर, की पापामुळे त्याचं नुकसान होत नाही (५, ६) ईयोबने देवाची वाट पाहावी (१४) ३६ देवाच्या महानतेची अलीहू स्तुती करतो (१-३३) आज्ञाधारक समृद्ध होतात; दुष्टांना नाकारलं जातं (११-१३) देवासारखा शिक्षक कोण (२२) ईयोबने देवाचा महिमा करावा (२४) देवाच्या महानतेची आपण कल्पनाही करू शकत नाही (२६) पाऊस आणि वीज यांवर देवाचं नियंत्रण (२७-३३) ३७ नैसर्गिक शक्तींमधून देवाची महानता दिसते (१-२४) देव माणसाचं सर्व कामकाज ठप्प पाडू शकतो (७) देवाच्या अद्भुत कार्यांबद्दल विचार करायला सांगतो (१४) देवाला पूर्णपणे समजणं माणसाच्या आवाक्याबाहेर (२३) माणसाने स्वतःला बुद्धिमान समजू नये (२४) ३८ माणूस किती लहान आहे याची यहोवा जाणीव करून देतो (१-४१) “पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?” (४-६) देवाच्या मुलांनी जल्लोष केला (७) निसर्गातल्या गोष्टींबद्दल प्रश्न (८-३२) “आकाशावर नियंत्रण करणारे कायदे” (३३) ३९ प्राण्यांच्या सृष्टीवरून माणसाचं अज्ञान कळून येतं (१-३०) रानशेळ्या आणि हरिणी (१-४) रानगाढव (५-८) रानबैल (९-१२) शहामृगी (१३-१८) घोडा (१९-२५) ससाणा आणि गरुड (२६-३०) ४० यहोवा आणखी प्रश्न विचारतो (१-२४) आपल्याकडे उत्तर नाही हे ईयोब कबूल करतो (३-५) “तू माझ्या न्यायीपणावर शंका घेतोस का?” (८) देव शक्तिशाली बेहेमोथचं वर्णन करतो (१५-२४) ४१ देव अद्भुत लिव्याथानचं वर्णन करतो (१-३४) ४२ ईयोबचं यहोवाला उत्तर (१-६) तीन मित्रांना दोषी ठरवलं जातं (७-९) यहोवा ईयोबला पुन्हा समृद्ध करतो (१०-१७) ईयोबची मुलं आणि मुली (१३-१५)