अभ्यास २२
प्रभावी प्रस्तावना
१-३. भाषणाच्या प्रस्तावनेमध्ये विषयाबद्दल कोणत्या मार्गाने तुम्हाला गोडी निर्माण करता येईल?
१ गोडी निर्माण करणारी. भाषणाची प्रस्तावना विषयाबद्दल गोडी निर्माण करणारी ठरली पाहिजे. तिने तुमच्या श्रोतेजनांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे आणि पुढे जे म्हटले जाणार, त्याबद्दल संमतीकारक विचार दर्शविण्यासाठी तयार करविले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी, श्रोतेजनांना तुमच्या विषयाचे मोल दाखवून देण्याची गरज आहे.
२ भाषणात गोडी निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या श्रोतेजनांना समाविष्ट करणे होय. तुम्ही सांगणारी माहिती ही त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, तिचा त्यांच्या जीवनाशी संबंध आहे हे त्यांना जाणवू द्या. हे करण्यासाठी तुम्ही श्रोतेजनांच्या पातळीपासून सुरवात केली पाहिजे. याचा अर्थ हा की, तुम्ही जे सांगणार ते श्रोत्यांच्या, सर्वसाधारण माहितीचे असावयास हवे. ते एखादे उदाहरण, किंवा एखादी समस्या, किंवा प्रश्नांची शृंखला असू शकते. परंतु ते तुमच्या श्रोतेजनांच्या परिचयाचे असे काही असावे, जे त्यांना समजू शकेल व त्याचा त्यांना स्वतःसाठी अवलंब करता येईल.
३ काही प्रकरणात, तुमच्या प्रस्तावनेत, पूर्वग्रहावर मात करण्याची गरज असेल. ज्या विषयाची चर्चा होत आहे तो वादग्रस्त आहे तर, हे खासपणे खरे असू शकते. अशा प्रकरणात तुमची प्रस्तावना ही, तुमचा मुद्दा प्रभावी रितीने प्रस्थापित होईपर्यंत होणाऱ्या चर्चेत श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. घरोघरच्या प्रचारकार्यात ठराविक आक्षेपांना कुशलपणे प्रथम मांडून तुम्हाला ज्यावर चर्चा करायची आहे ते साहित्य हाताळून, त्या आक्षेपांवर सहसा मात करता येते.
४-६. आणखी कोणत्या गोष्टी आमच्या प्रस्तावनेची गोडी निर्माण करण्यास साहाय्यक ठरतील?
४ तुम्ही जे म्हणता ते नेहमीच प्राथमिक मोलाचे आहे. परंतु तुमच्या प्रस्तावनेद्वारे गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही ते कसे सांगता याला, भाषणाच्या बहुधा इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक महत्त्व आहे. यासाठीच, तुमच्या प्रस्तावनेच्या बाबतीत, तुम्ही जे काही सांगणार आहात, तेवढेच नव्हे तर ती कोणत्या पद्धतीने सांगणार यासाठी काळजीपूर्वक आगाऊ तयारी करण्याची गरज आहे.
५ साधारणपणे, छोटी व साधी वाक्ये प्रस्तावनेतील तुमच्या उद्देशाची सर्वोत्तम साध्यता घडवून आणतील. प्रस्तावना ही अल्प वेळेची असते व त्यात तुमचा हेतू साध्य करण्यासाठी शब्दांची अचूक निवड महत्त्वपूर्ण असल्यामुळे, पहिली दोन किंवा तीन वाक्ये अत्यंत काळजीपूर्वक तयार करणे तुम्हाला फायद्याचे दिसून येईल. ही वाक्ये तुमच्या कागदावर लिहा म्हणजे ती वाचून दाखवता येतील, किंवा त्यांना स्मरणात ठेवा म्हणजे तुमचे सुरवातीचे बोल योग्य व जरुरीचा तो सर्व प्रभाव साध्य करतील. याखेरीज, तुम्हाला यामुळे आरंभापासूनच आत्मविश्वास मिळेल आणि आयत्या वेळी बोलण्यासाठी पुरेसे मानसिक स्थैर्यही मिळेल.
६ तुमच्या प्रस्तावनेच्या बाबतीत आणखी काही थोडेसे. या गोष्टी अर्थातच तुमचा सल्लागार भाषणाची गुणवत्ता या दृष्टिने विचारात घेणार नाही. तुम्हाला अस्वस्थ झाल्यासारखे वाटत असेल तर, बोलण्याची गती मंद करा व दबक्या आवाजात बोला. आत्मविश्वासाने बोला, पण स्वमताग्रही असल्याची कसलीही छाप पाडण्याचे टाळा. कारण अशी ढब श्रोत्यांना आरंभापासूनच तुम्हापासून दूर लोटील.
७. तुम्ही तुमची प्रस्तावना केव्हा तयार करावी?
७ भाषणाची प्रस्तावना ही सादर करण्यात येणारी पहिली गोष्ट असली तरी, भाषणाचा मध्यभाग चांगल्या तऱ्हेने तयार करण्यात आल्यावरच तिची तयारी अत्यंत प्रभावीपणे केली जाते. यामुळे, तुम्ही तयार केलेले साहित्य उचितपणे प्रस्तुत करण्यासाठी काय बोलणे चांगले ठरेल हे जाणण्यासाठी तुम्हाला मुभा मिळेल.
८-१०. आम्हाला शीर्षकाला अनुसरून असणाऱ्या प्रस्तावना कशा बनवता येतील?
८ शीर्षकाला अनुसरुन. तुमची प्रस्तावना भाषणाच्या शीर्षकाला अनुसरुन असली तरच ती तुमच्या विषयाकडे प्रभावीपणे नेऊ शकेल. बोलण्यातील तुमच्या हेतूला हातभार लावणारीच प्रस्तावना उपयोगात आणण्याबद्दल मोठी काळजी घेतली पाहिजे. ती अर्थातच, राज्य संदेशाच्या सन्माननीयतेला सुसंगत असणारी असावी आणि श्रोतेजनांत कोणी अनोळखी उपस्थित असल्यास त्याला दुखविणारी नसावी.
९ प्रस्तावनेने तुम्ही चर्चित असलेल्या विषयाकडेच निरवले पाहिजे इतकेच नव्हे तर, तुम्ही हाताळीत असणाऱ्या साहित्याचा जो विशिष्ट प्रकार आहे त्याला स्पष्टरित्या सादर केले पाहिजे. याचा अर्थ तुमचा विषय हा विशिष्ट शीर्षकापर्यंतच मर्यादित करणे व कोणत्यातरी प्रकारे ते शीर्षक प्रस्तावनेत होता होईल तितक्या व्यवहार्यतेने दाखवले पाहिजे. शीर्षक खासपणे सांगत नसाल तर, काही प्रकारणात, तुम्ही प्रस्तावनेत प्रमुख शब्द किंवा शीर्षकाचे शब्द वापरू शकाल. यामुळे श्रोतेजन तुमच्या भाषणाचे शीर्षक इतर काही विषय सुचवीत असल्यास ते पूर्ण करण्याची अपेक्षा तुम्हाकडून करणार नाहीत.
१० सर्व भाषणे संयुक्त व पूर्ण असली पाहिजेत. शिवाय, त्याची सुरवात एकीकडे व शेवट मात्र दुसरीकडे असे असू नये. शिवाय, शीर्षकाला अनुसरून असणारी प्रस्तावना ही, गोडी निर्माण करणाऱ्या प्रस्तावनेशी तोल साधणारी असली पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, सुरवातीच्या चांगल्या कहाणीसाठी भाषणाचे शीर्षक बळी ठरू नये. भाषणाच्या हेतूने तुमचे साहित्य निवडण्यावर प्रभुत्व राखले पाहिजे. शिवाय तो भाषणाच्या मध्यभागाशी जुळणारा व सुसंगत असला पाहिजे.
११-१४. प्रस्तावना ही योग्य लांबीची आहे हे आपल्याला कसे ठरवता येईल?
११ योग्य प्रमाणाची. एखादी प्रस्तावना केवढ्या प्रमाणाची असावी? सर्व परिस्थितीला लागू होऊ शकेल असे विशिष्ट उत्तर नाही. प्रस्तावनेचे प्रमाण हे विषयाला देण्यात आलेला वेळ, भाषणाचा हेतू, समाविष्ट असणारे श्रोतेजन आणि अशा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
१२ वस्तुतः, भाषण ऐकताना, त्याचा ओघ लक्षात घेता, प्रस्तावना व मध्यभाग यात स्पष्ट विभाग करण्याचे कठीण वाटले पाहिजे. तुमचा सल्लागार भाषण सल्ला पत्रकातील या गुणाची हाताळणी करीत असताना या समस्येबद्दल लक्ष देईल. प्रत्येक विद्यार्थी आपल्या भाषणात काही प्रास्ताविक सांगतोच, पण तुमचा सल्लागार या गोष्टीमध्ये रस बाळगून असेल: ही प्रस्तावना भरकटत जाणारी, विस्तारित, लांबलचक आहे का की, तुम्ही मुख्य मुद्यांकडे येण्याआधीच तुमचे श्रोतेजन अस्वस्थ झाल्याचे दिसतात?
१३ प्रस्तावनेने गोडी निर्माण करणाऱ्या गुणांची पायमल्ली न करता विषयाकडे निश्चित, व्यवस्थित आणि विचाराच्या त्वरित क्रमाने जाता आले पाहिजे. ती पूर्ण असली पाहिजे, तिच्यात खंड असू नये. यासाठी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, कारण तुमची सुरवातच मुळात विषयापासून दूरवर असेल आणि त्यासाठी लांबलचक व सविस्तर स्पष्टीकरण देण्याची गरज पडत आहे तर मग, ती प्रस्तावना पुन्हा तयार करणे आणि तिला नवी सुरवात देणे हे अधिक चांगले असेल.
१४ प्रस्तावना व भाषणाचा मध्यभाग यात विभाग पाडणे हे कठीण जात असेल तर, तुमची प्रस्तावना ही योग्य लांबीची आहे असे म्हणता येऊ शकेल. त्याद्वारे हे दिसेल की, तुम्ही तुमच्या श्रोतेजनांना साहित्याकडे इतक्या चांगल्या पद्धतीने निरवले आहे की, त्यांना जाणीव न होता ते तुमच्या चर्चेकडे कान देऊन आहेत. त्याउलट, तुम्ही मुद्यावर केव्हा येता याबद्दल ते विचार करू लागले तर, तुमची प्रस्तावना ही प्रदीर्घ आहे हे तुम्ही खात्रीने सांगू शकता. घरोघरच्या कार्यात याबद्दलची कमतरता जाणवते, कारण घराघरात तुमच्या प्रस्तावनेची लांबी ही बदलण्याची गरज असते.
१५, १६. एखादे भाषण परिसंवादाचा भाग असते तेव्हा त्याची प्रस्तावना केवढी लांब असावी?
१५ तुम्ही सबंध कार्यक्रमाचे एकमेव भाषण देत आहात, किंवा विद्यार्थी भाषण देत आहात तर, तुमची प्रस्तावना इतर प्रसंगांपेक्षा थोडी जादा लांब असू शकते. पण तुमचे भाषण हे परिसंवादाचा एक भाग आहे, किंवा सेवा सभेतील एखादा भाग आहे तर, ही प्रस्तावना त्रोटक व सूक्ष्म असली पाहिजे, कारण ती आधी ज्याची ओळख करून देण्यात आली आहे त्या संयुक्त विषयाचा एक भाग आहे. दीर्घ व गुंतागुंतीची प्रस्तावना निष्कारण वेळ घेते. तुम्हाला ज्या कल्पना सादर करायच्या असतात त्या भाषणाच्या मध्यभागात येतात.
१६ सारांशात, तुमची प्रस्तावना केवळ संपर्क साधण्यासाठी, गोडी निर्माण करण्यासाठी आणि तुम्ही ज्या विषयाची चर्चा करणार तेथे निरवणारी आहे. ती होता होईल तितक्या व्यवहार्यपणे उरका व मग तुमच्या विषयाच्या खऱ्या मलिद्याकडे वळा.