मनात राग बाळगू नका
कोणी आपल्याला नाराज करते तेव्हा त्या मनुष्यावर राग न करण्याचे टाळणे फारच आव्हानात्मक वाटू शकते. अशा परिस्थितींसाठी बायबलमध्ये व्यावहारिक सल्ला आहे. प्रेषित पौलाने लिहिले, “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.”—इफिसकर ४:२६.
कोणी आपले मन दुखावते तेव्हा त्याच्यावर काही प्रमाणात राग येणे हे स्वाभाविकच आहे. “तुम्ही रागावा” असे पौल म्हणतो तेव्हा, एखाद्या अयोग्य वागणुकीसाठी किंवा अन्यायाने व्यवहार केल्याबद्दल कदाचित, काही वेळा रागावणे योग्य असल्याचे सूचित होते. (पडताळा २ करिंथकर ११:२९.) पण वाद मिटवले गेले नाहीत तर, योग्य रागामुळे सुद्धा नाशकारक परिणाम उद्भवू शकतात ज्यामुळे मोठे पाप घडू शकते. (उत्पत्ति ३४:१-३१; ४९:५-७; स्तोत्र १०६:३२, ३३) मग, तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही काय करू शकता?
लहान लहान चुकांच्या बाबतीत बहुतेककरून तुम्ही त्या एकतर आपल्या अंतःकरणातच मिटवू शकता व ‘शांत राहू’ शकता किंवा तुमचे मन दुखावणाऱ्याला जाऊन भेटा व त्या वादविषयांची चर्चा करा. (स्तोत्र ४:४; मत्तय ५:२३, २४) दोहोंपैकी कोणत्याही बाबतीत सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, होता होईल तितक्या लवकर वाद मिटवणे जेणेकरून राग अधिक वाढून घातक परिणाम उत्पन्न होणार नाहीत.—इफिसकर ४:३१.
यहोवा आपल्या पापांची उदारपणे क्षमा करतो, अगदी अशा पापांचीसुद्धा जी आपल्या अज्ञानतेमुळे करत असल्याची आपल्याला जाणीव नसते. तेव्हा अशा प्रकारे, सहमानवाच्या लहान चुकांना देखील आपण क्षमा करू शकत नाही का?—कलस्सैकर ३:१३; १ पेत्र ४:८.
आस्थेची गोष्ट म्हणजे, “क्षमा” करणे यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ “सोडून देणे” असा होतो. क्षमा यासाठी अपराधाच्या महत्त्वाला कमी करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. यामध्ये, राग मनात बाळगल्यामुळे आपल्यावर ओझे लादले जाईल व ख्रिस्ती मंडळीतील शांतीचा भंग होईल हे जाणून त्या प्रसंगाला असेच सोडून देणे समाविष्ट असू शकते. तसेच, राग मनात बाळगणे तुमच्या आरोग्याला हानीकारक असू शकते!—स्तोत्र १०३:९.