वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ७/१ पृ. २५-३०
  • देव पक्षपाती नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव पक्षपाती नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आमचा निर्माता—पक्षपाती?
  • येशू पक्षपाती होता का?
  • मोठा बदल
  • “प्रत्येक राष्ट्रात”
  • यहोवा “पक्षपाती नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • जेव्हा सर्व जाती शांतीने एकत्र राहतील
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ७/१ पृ. २५-३०

देव पक्षपाती नाही

“देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

१. प्राचीन अथेनैमध्ये पौलाने वंशाविषयीचे कोणते महत्वपूर्ण उद्‌गार काढले?

“ज्यादेवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात राहात नाही. . . . त्याने एका पूर्वजापासून माणसाचा प्रत्येक वंश निर्माण करुन त्यांना पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर राहावे असे केले.” (प्रे. कृत्ये १७:२४-२६, फिलिप्स) हे कोणाचे बोल होते? तो ख्रिस्ती प्रेषित पौल होता ज्याने त्याचे हे प्रसिद्ध उद्‌गार ग्रीसमधील अथेन्सच्या मार्स डोंगर किंवा अरीयोपगस येथे काढले होते.

२. कशामुळे जीवन बहुरंगी व मनोरंजक बनते, आणि एक जपानी पाहुणा दक्षिण आफ्रिकेच्या भेटीत कशामुळे स्तंभित बनला?

२ पौलाच्या त्या उद्‌गारांमुळे, निर्मितीत केवढी अद्‌भुत विविधता अस्तित्वात आहे त्याचा विचार आम्हापुढे आणील. यहोवा देवाने मानव, पशु, पक्षी, किडे आणि वनस्पति व तेही विविध प्रकारे निर्माण केले. या साऱ्‍या गोष्टी एकाच पद्धतीच्या असत्या तर जीवन हे किती कंटाळवाणे वाटले असते बरे! यात असणारी विविधता आमचे जीवन बहुरंगी आणि मनोरंजक करते. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिका येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनास जपानमधील एका व्यक्‍तीने भेट दिली तेव्हा तेथे असणारी वंशाची भिन्‍नता आणि वर्ण बघून तो स्तंभित झाला. त्याने म्हटले की, तेच वंशीय गुण आहेत तरी जपानमध्ये केवढे वेगळेपण भासते.

३. त्वचेच्या वेगळ्या वर्णाकडे काहीजण कसे पाहतात व त्यामुळे कशाचा उद्‌भव होतो?

३ तथापि, वर्णात दिसून येणारी भिन्‍नता बहुधा गंभीर समस्या निर्माण करते. काहींना वाटते की, वेगळ्या वर्णाचे लोक हलक्या प्रतीचे आहेत. यामुळे मत्सर, द्वेष उद्‌भवून वंशाभिमानाची लागण सुरु होते. हाच आमच्या निर्मात्याचा उद्देश होता का? त्याच्या नजरेत काही वंश श्रेष्ठ आहेत का? तर मग, यहोवा पक्षपाती आहे का?

आमचा निर्माता—पक्षपाती?

४-६. (अ) यहोशाफाट राजाने पक्षपाताविषयी काय म्हटले? (ब) मोशे व पौलाने यहोशाफाटाच्या विधानाची कशी पुष्टी दिली? (क) तरीपण कोणते प्रश्‍न उद्‌भवतील?

४ इतिहासात मागे पाऊल टाकल्यावर, आमच्या निर्मात्याच्या सबंध मानवजातीविषयीच्या दृष्टीकोनाची माहिती आपल्याला कळू शकेल. इ. स. पू. ९३६ ते ९११ च्या दरम्यान यहुदात राज्य केलेल्या यहोशाफाट राजाने आपल्या राज्यात बऱ्‍याच सुधारणा करुन इश्‍वरी नियमांवर आधारीत असणारी न्यायदानाची व्यवस्था आरंभिली. त्याने न्यायधिशांना हा सुंदर सल्ला दिलाः “तुम्ही काय करता याचा विचार करा. तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर यहोवासाठी करावयाचा आहे . . . तर . . . तुम्ही जे काही कराल ते संभाळून करा, कारण आपला देव यहोवा याच्याकडे काही अधर्म नाही; तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही.”—२ इतिहास १९:६, ७.

५ याच्या शेकडो वर्षांआधी मोशे या संदेष्ट्याने इस्राएली वंशाला सांगितले होतेः “तुमचा देव यहोवा . . . कोणाचा पक्षपात करीत नाही.” (अनुवाद १०:१७) त्याचप्रमाणे, पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात असा सल्ला दिलाः “दुष्कृत्य करणाऱ्‍या माणसावर संकट व क्लेश येतील; प्रथम यहुदी व नंतर हेल्लेणी . . . कारण देवाजवळ पक्षपात नाही.”—रोमकर २:९-११, द न्यू इंग्लिश बायबल.

६ तथापि, काही विचारतीलः ‘पण यहुद्यांबद्दल काय? ते देवाचे निवडलेले लोक नव्हते का? तर मग, त्याने त्यांच्यासंबंधाने पक्षपात धरला की नाही? मोशानेही सर्व इस्राएलांना असे म्हटले नव्हते काः “तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्‍या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव यहोवा ह्‍याने तुला निवडून घेतले आहे”?’—अनुवाद ७:६.

७. (अ) यहुद्यांनी येशूचा धिक्कार केला तेव्हा काय घडले? (ब) आज कोण देवाकडील अद्‌भूत आशीर्वाद अनुभवू शकतात व कसे?

७ नाही, देवाने इस्राएलांचा एका खास उद्देशास्तव उपयोग केला म्हणून तो पक्षपाती ठरत नाही. मशीहाची उत्पत्ती सामोरी आणावी याकरता यहोवाने विश्‍वासू इब्री कुलपित्यांच्या वंशंजांची निवड केली. पण जेव्हा यहुद्यांनी मशीहा, येशू ख्रिस्ताचा धिक्कार केला व त्याला ठार केले तेव्हा त्यांनी देवाची मर्जी गमावली. तथापि, आज, जे कोणी, मग ते कोणाही वंशाचे वा राष्ट्राचे असोत, त्यांनी येशूवर आपला विश्‍वास प्रकट केला तर त्यांना अद्‌भूत आशीर्वादांचा आनंद तसेच सार्वकालच्या जीवनाच्या भवितव्याची आशा मिळू शकते. (योहान ३:१६; १७:३) यामुळे देवाठायी पक्षपात नाही हे स्पष्टरित्या दिसते. याखेरीज, यहोवाने इस्राएलांना ही आज्ञा दिलीच होती की, त्यांनी “परदेशीयांवर प्रीती करावी” आणि त्यांचा वंश वा राष्ट्रीयत्व कोठलेही असले तरी त्यांना “उपद्रव देऊ नका.” (अनुवाद १०:१९; लेवीय १९:३३, ३४) खरेच, आमचा स्वर्गातील प्रेमळ पिता हा निश्‍चितच पक्षपाती नाही.

८. (अ) यहोवाने इस्राएलांच्या बाबतीत पक्षपात धरला नव्हता हे कशावरुन दिसते? (ब) यहोवाने इस्राएलांचा कसा वापर केला?

८ हे खरे की, इस्राएलांनी खास हक्कांचा आनंद उपभोगला. पण त्यांच्यावर गहन जबाबदारीही आली होती. त्यांच्यावर यहोवाच्या कायद्यांचे पालन करण्याचे बंधन होते आणि त्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर शाप येत होता. (अनुवाद २७:२६) खरे म्हणजे, देवाच्या कायद्यांचा अवमान केला म्हणून इस्राएलांना वारंवार शिक्षा मिळाली. अशाप्रकारे देवाने त्यांना विशेष कृपापसंतीने वागविले नव्हते हे स्पष्ट आहे. तर, भविष्यवादित नमुना प्रस्थापित करावा व त्यांच्याद्वारे इशारेवजा उदाहरण द्यावे यासाठी त्याने त्यांचा वापर केला. देवाने सर्व मानवजातीला आशीर्वाद देणारा मुक्‍तीदाता येशू ख्रिस्त याला इस्राएलांमार्फत सामोरे आणले.—गलतीकर ३:१४; पडताळा उत्पत्ती २२:१५-१८.

येशू पक्षपाती होता का?

९. (अ) यहोवा व येशू कसे सदृश्‍य आहेत? (ब) येशूबद्दल कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

९ यहोवा देव पक्षपाती नाही तर येशू पक्षपाती असू शकतो का? याचा जरा विचार कराः एकदा येशूने म्हटलेः “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:३०) यहोवा देव व त्याचा प्रिय पुत्र यांजमध्ये अप्रतिम ऐक्य वास करते, आणि येशू प्रत्येक बाबतीत आपल्या पित्याची इच्छा अनुसरतो. खरे म्हणजे विचार व उद्देश याबाबतीत त्या दोघात इतके सादृश्‍य आहे की येशू असेहि म्हणू शकलाः “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) येशू हा ३३ पेक्षा अधिक वर्षे पृथ्वीवरील मानव असा जगला आणि या काळात त्याने इतर लोकांना जी वागणूक दिली त्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला माहिती देते. त्याची दुसऱ्‍या वंशाविषयीच्या लोकांसंबंधाने कशी प्रवृत्ती होती? तो अभिमानी किंवा पक्षपाती होता का? येशूने कधी वंशवाद केला का?

१०. (अ) एका कनानी स्त्रीने मदतीकरता याचना केली तेव्हा येशूने काय उत्तर दिले? (ब) विदेश्‍यांना “घरची कुत्री” असे संबोधून येशू अहंभाव दाखवीत होता का? (क) त्या स्त्रीने या आक्षेपावर कशी मात केली आणि याचा काय परिणाम दिसला?

१० येशूने आपले बहुतेक जीवन यहुदी लोकातच घालविले. पण एकदा एक कनानी, विदेशी बाई त्याच्याकडे आली व तिने आपल्या मुलीला बरे करावे अशी विनंती त्याला केली. येशू तिला म्हणालाः “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही.” तरी त्या स्त्रीने त्याला कळकळून म्हटलेः “प्रभुजी, मला साहाय्य करा.” तेव्हा येशू म्हणालाः “बाई, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे.” यहुद्यांसाठी कुत्रा हा प्राणी अशुद्ध होता. तेव्हा, विदेशी लोकांना ‘घरची कुत्री’ असे म्हणण्यात येशू अहंभाव दाखवीत नव्हता का? नाही, कारण त्याला देवाकडून ‘इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढरांची काळजी’ करण्याची जी खास नेमणूक मिळाली होती त्याचा त्याने नुकताच उल्लेख केला होता. तसेच, यहुद्देत्तरांना जंगली कुत्रे नव्हे तर “घरची कुत्री” असे संबोधिल्यामुळे त्याने अतिशयोक्‍ती टाळली. अर्थात, त्याने जे म्हटले त्याकरवी त्या स्त्रीची परिक्षा झाली. त्यामुळेच प्रस्तुत झालेल्या आक्षेपाला त्या स्त्रीने मात करण्याचा निश्‍चय राखून अगदी नम्रपणे पण चतुराईने असे म्हटलेः “खरेच, प्रभुजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरुन पडलेला चूरा खातात.” तेव्हा त्या स्त्रीचा एवढा विश्‍वास बघून येशू अचंबीत झाला व त्याने तिच्या मुलीला लगेच बरे केले.—मत्तय १५:२२-२८.

११. येशूला ज्या एका घटनेचा अनुभव आला तो पाहता यहुदी व शोमरोन्यांमध्ये आपसात कसली वृत्ती होती असे दिसते?

११ याचप्रमाणे येशूला काही शोमरोनी लोकांना जो सामना द्यावा लागला तोही विचारात घ्या. यहुदी व शोमरोनी यांच्यात बरेच वितुष्ट होते. एके प्रसंगी येशूने काही निरोप्यांना पाठवून एका शोमरोनी गावात त्याच्यासाठी तयारी करावयाला सांगितले. पण त्या शमरोन्यांनी “त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमाकडे जाण्याचा होता.” यामुळे याकोब व योहानाला इतका राग आला की, आकाशातून अग्नि पडून या गावाचा नाश व्हावा असेही त्यांनी बोलून दाखविले. पण येशूने या दोन्ही शिष्यांना दटाविले आणि मग सगळे वेगळ्या गावी निघून गेले.—लूक ९:५१-५६.

१२. येशूची विनंति ऐकून एक शोमरोनी स्त्री का आश्‍चर्यचकित झाली?

१२ या यहुदी व शोमरोनी यांच्यातील वैरभावाची लागण येशूने स्वतःला होऊ दिली का? यासाठी, आणखी एका प्रसंगी काय घडले ते लक्षात घ्या. येशू व त्याचे शिष्य यहुदीयापासून गालीलपर्यंतचा प्रवास करीत असताना त्यांना शमरोनातून जावे लागले. प्रवासामुळे थकलेला असा, येशू याकोबाच्या झऱ्‍यापाशी बसला आणि त्याचे शिष्य सुखार नावाच्या शहरात जेवण आणण्यासाठी गेले. मध्यंतरात एक शोमरोनी स्त्री तेथे पाणी भरण्यासाठी आली. शोमरोनी लोक हे ‘परक्या वंशाचे’ आहेत असे येशूने दुसऱ्‍या एके प्रसंगी बोलून दाखविले होते. (लूक १७:१६-१८, द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर्स) इतके असताही तो या स्त्रीला म्हणालाः “मला प्यावयाला पाणी दे.” यहुदी शमरोन्यांसोबत दळणवळण राखीत नव्हते त्यामुळे आश्‍चर्याने ही स्त्री उत्तरलीः “आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे?”—योहान ४:१-९.

१३. (अ) शोमरोनी स्त्रीच्या आक्षेपाला येशूने कसे उत्तर दिले आणि तिची कोणती प्रतिक्रिया दिसली? (ब) शेवटचा कोणता परिणाम घडला?

१३ तरीपण येशूने या स्त्रीच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले. उलट, त्याने या संधीचा उपयोग तिला साक्ष देण्यासाठी केला आणि तो स्वतः मशीहा होता ही कबुलीही त्याने तिला दिली! (योहान ४:१०-२६) आता अधिक विस्मित झालेल्या या स्त्रीने आपल्या पाण्याचा घडा तेथेच सोडला व ती शहराकडे पळाली आणि जे घडले ते तिने इतरांना सांगितले. तिने जरी अनैतिक स्वरुपाचे जीवन व्यतित केले होते तरी तिने आध्यात्मिक गोष्टींविषयीचा रस दाखवून म्हटलेः “तोच ख्रिस्त असेल काय?” याचा अंतिम परिणाम काय दिसला? या स्त्रीने जी उत्तम साक्ष दिली त्यामुळे त्या गावच्या कित्येक लोकांनी येशूवर आपला विश्‍वास ठेवला. (योहान ४:२७-४२) याविषयीचे विचार मांडताना थोमास ओ. फिगार्ट यांनी ए बिब्लिकल पर्सपेक्टीव्ह ऑन द रेस प्रॉब्लम यात ही लक्षवेधक गोष्ट लिहिलीः “जर आमच्या प्रभूने आपल्या उदार वक्‍तृत्वाने चुकीच्या वंशिक सांप्रदायाला रद्द ठरविणे महत्वाचे मानले तर मग, आम्ही आज या वंशवादाच्या प्रवाहात स्वतःला वाहवून नेत नाही ना याची खबरदारी घेतली पाहिजे.”

१४. सुवार्तिक फिलिप्प याच्या उपाध्यपणाच्या काळात यहोवाच्या निपक्षपातीपणाविषयीचा कोणता पुरावा दिसला?

१४ यहोवा देवाच्या निःपक्षपातीपणामुळेच विविध वंशाच्या लोकांना यहुदी धर्मात परिवर्तित होता आले. याविषयी १९ शतके आधी यरुशलेम व गज्जा यातील वाळवंटीय रस्त्यावर काय घडले त्याचा विचार करा. कुशी राणीच्या हुजुराला असणारा एक काळ्‌या वर्णाचा माणूस आपल्या रथात बसून यशयाचा ग्रंथ वाचीत चालला होता. हा अधिकारी सुंता झालेला यहुदी मतपरिवर्तित होता, कारण “तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.” यहोवाच्या दिव्यदूताने यहुदी सुवार्तिक फिलिप्प याला दर्शन देऊन म्हटलेः “जा, त्याचा रथ गाठ.” तेव्हा फिलिप्पाने असे म्हटले काः “तो तर वेगळ्या वंशाचा आहे, मी त्याच्याशी कसा बोलू?” नाही. तो गेला. आणि जेव्हा कुशीने त्याला रथात आपल्या बाजूला येऊन बसण्याचे आमंत्रण त्याला दिले ते त्याने आनंदाने स्वीकारले. त्याच्यासोबत बसून त्याने यशयाने येशू ख्रिस्ताविषयी जो भविष्यवाद लिहिला होता त्याचे स्पष्टीकरणही त्याला केले! जेव्हा हे एका जलसंचयाकडे आले तेव्हा कुशीने विचारलेः “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” कोठलीहि आडकाठी नसल्यामुळे फिलिप्पाने आनंदाने त्या कुशीचा बाप्तिस्मा केला आणि यहोवाने या आनंदी माणसाचा आपला निपक्षपाती पुत्र येशू ख्रिस्त याचा अभिषिक्‍त अनुयायी या अर्थाने स्वीकार केला. (प्रे. कृत्ये ८:२६-३९) पण या ईश्‍वरी निपक्षपातीपणाचा आणखी पुरावा लवकरच सामोरा आला.

मोठा बदल

१५. येशूच्या मृत्युनंतर कोणता बदल झाला आणि याविषयी पौलाचे विवेचन काय आहे?

१५ ख्रिस्ताच्या मृत्युमुळे जगातील वंशाभिमान नष्ट झाला नाही. पण त्या यज्ञार्पित मरणामुळे देवाने येशूच्या यहुदी शिष्यांचा विदेशी अनुयायांसोबत असणाऱ्‍या नातेसंबंधात बदल घडवून आणला. हेच प्रेषित पौलाने इफिस येथील विदेशी ख्रिश्‍चनांना लिहिताना सूचित करुन म्हटलेः “आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय . . . म्हणविले जाणारे होता; ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहीत, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहीत असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्‍ताच्या योगे जवळचे झाला आहा. कारण तो आपली शांती आहे; त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली.” ती “भिंत” किंवा विभाजन करणारी गोष्ट ही नियमशास्त्र करार होता; यानेच यहुदी व विदेशी यात फाळणी केली होती. त्याचा ख्रिस्ताच्या मृत्युच्या आधारावर नाश करण्यात आला ते यासाठी की, यहुदी व विदेशी या दोघांना येशूच्या द्वारे “एकाच आत्म्याच्या योगे . . . पित्याजवळ प्रवेश” मिळवता यावा.—इफिसकर २:११-१८.

१६. (अ) पेत्राला राज्याच्या किल्ल्या का देण्यात आल्या? (ब) एकंदर किती किल्ल्या होत्या, आणि त्यांच्या वापराने काय परिणाम झाला?

१६ याखेरीज, प्रेषित पेत्राला “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” सोपवण्यात आल्या की, ज्याद्वारे कोणाही वंशाच्या लोकांना देवाच्या उद्देशाविषयी शिकण्याचा, पवित्र आत्म्याद्वारे “नव्याने जन्मण्याचा”, व याकरवी ख्रिस्तासोबत आध्यात्मिक वारस बनण्याचा मार्ग मोकळा झाला. (मत्तय १६:१९; योहान ३:१-८) पेत्राने तीन लाक्षणिक किल्ल्यांचा वापर केला. पहिली यहुद्यांसाठी, दुसरी शोमरोन्यांसाठी तर तिसरी विदेश्‍यांसाठी होती. (प्रे. कृत्ये २:१४-४२; ८:१४-१७; १०:२४-२८, ४२-४८) अशाप्रकारे निपक्षपाती देवाने सर्व वंशातील निवडलेल्या लोकांसाठी येशूचे आध्यात्मिक भाऊ व राज्याचे सहवारीस बनण्यासाठी मार्ग मोकळा केला.—रोमकर ८:१६, १७; १ पेत्र २:९, १०.

१७. (अ) पेत्राला कोणता अपूर्व दृष्टांत देण्यात आला व का? (ब) काही माणसांनी कोणाच्या घरी पेत्राला आणले आणि तेथे कोण त्याची वाट पाहात होते? (क) पेत्राने त्या विदेश्‍यांना कसले स्मरण दिले, तरी देवाने त्याला स्पष्टरित्या काय शिकविले?

१७ तिसऱ्‍या किल्लीचा विदेश्‍यांसाठी उपयोग करावा म्हणून पेत्राची तयारी करण्याकरता त्याला अशुद्ध प्राण्यांचा अपूर्व दृष्टांत देण्यात आला व म्हटले गेलेः “पेत्रा, उठ; मारुन खा!” यात धडा हा होता की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.” (प्रे. कृत्ये १०:९-१६) या दृष्टांताच्या अर्थाविषयी पेत्राच्या मनात खूपच गोंधळ उडाला. पण लवकरच तीन माणसे त्याला कर्नेल्य या कैसरीया येथील रोमी अधिकाऱ्‍याच्या घरी घेऊन जाण्यासाठी तेथे आली. ते शहर रामी सैन्याचे यहुदीया प्रांतासाठी मुख्यालय असल्यामुळे कर्नेल्यचे घर तेथे असावे हे साहजिकच आहे. या घरी कर्नेल्य आपल्या नातेवाईकांसह व घनिष्ट मित्रांसोबत पेत्राची वाट बघत होता. प्रेषिताने त्यांना स्मरण दिलेः “तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी माणसाने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मुनष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. म्हणून मला बोलाविल्यावर मी का कू न करता आलो आहे.”—प्रे. कृत्ये १०:१७-२९.

१८. (अ) पेत्राने कर्नेल्य व त्याच्या पाहुण्यांना अत्यंत महत्वाची अशी कोणती घोषणा केली? (ब) पेत्राने येशूविषयीची साक्ष प्रदान केल्यावर कोणती नाट्यमय घटना घडली? (क) मग त्या विश्‍वास धारण केलेल्या विदेश्‍यांच्या बाबतीत कोणती कृति आचरण्यात आली?

१८ कर्नेल्यने याबाबतीत देवाच्या मार्गदर्शनाविषयीची स्पष्टता पेत्राला दिली तेव्हा पेत्र म्हणालाः “देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३०-३५) यानंतर प्रेषित येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष त्यांना देत असता काहीतरी नाट्यमय घटना घडली. “पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्‍या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला.” पेत्राच्या यहुदी साथीदारांना हे बघून मोठे “आश्‍चर्य वाटले, कारण परराष्ट्रीयांवर पवित्र आत्म्याच्या मुक्‍त दानाचा वर्षाव झाला आहे [हे त्यांना दिसले]. . . . त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले.” तेव्हा पेत्र म्हणालाः “आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?” होय, स्वर्गातील निपक्षपाती देवाचा पवित्र आत्मा त्या विश्‍वास धरणाऱ्‍या विदेश्‍यांवर आला असल्यामुळे कोण आक्षेप घेऊ शकत होता? यासाठीच पेत्राने हे आज्ञापिले की, या सर्वांचा “येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा व्हावा.”—प्रे. कृत्ये १०:३६-४८.

“प्रत्येक राष्ट्रात”

१९. वंशीय द्वेष का वाढता आहे, व याचा विस्तार कोठवर गेला आहे?

१९ आम्ही आता “शेवटल्या काळी” आहोत आणि “कठीण दिवस” याचा आम्हाला सामना करावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. लोक स्वार्थी, अभिमानी, गर्विष्ठ, कोणतीही स्वाभाविक भावना नसणारे, सहमत न दर्शविणारे, असंयमी, क्रुर, तापट, आणि गर्वाने फुगलेली असे दिसत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) अशा या सामाजिक वातावरणात वंशीय द्वेष आणि झगडे हे जगभरात वाढते दिसताहेत यात काही नवल नाही. काही देशात वेगळ्या वंशाचे अथवा वर्णाचे लोक एकमेकांना तुच्छ मानून त्यांचा द्वेष देखील करीत आहेत. यामुळे काही देशात खरोखरीचे दंगे आणि क्रुर घटना घडल्या आहेत. ज्ञानाकरवी प्रकाशित झालेल्या समाजात देखील पुष्कळांना वंशाभिमानावर मात करण्यात बऱ्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आणि आता हा “रोग” एकेकाळी जेथे लक्षणीय शांती नांदत होती त्या समुद्रावरील बेटांवरही आपला जम बसवीत आहे हे कोणी कधी अपेक्षिले देखील नसते.

२०. (अ) योहानाने कोणता प्रेरित दृष्टांत पाहिला? (ब) हा भविष्यवादित दृष्टांत केवढ्या प्रमाणात पूर्ण होत आहे? (क) तरीपण अद्याप काहींना कोणती अडचण वाटते आणि याचा उपाय त्यांनी कोठे शोधावा?

२० जगातील विविध भागात जरी वंशातील ऐक्यतेची उणीव दिसत असली तरी निपक्षपाती यहोवा देवाने सर्व वंशांच्या व राष्ट्रांच्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचे आंतरराष्ट्रीय स्वरुपात अप्रतिम ऐक्य घडवून आणणार असे भाकित केले होते. इश्‍वरी प्रेरणेने प्रेषित योहानाने “प्रत्येक राष्ट्र, वंश, जमात आणि भाषा यातून मोजता येणार नाही इतक्या मोठ्या संख्येचा लोकसमुदाय पाहिला. ते राजासन आणि कोकऱ्‍यासमोर उभे राहून” यहोवाची स्तुति गात होते.” (प्रकटीकरण ७:९, द जरुसलेम बायबल) हा भविष्यवाद आता पूर्ण होत आहे. आज २१० राष्ट्रात ३३,००,००० पेक्षा अधिक सर्व राष्ट्र व वंशाचे यहोवाचे साक्षीदार ऐक्य व वंशीय समानता अनुभवीत आहेत. पण ते अद्याप अपूर्ण आहेत. यापैकी काहींना नकळतपणे का होईना, वंशाभिमानावर पूर्ण मात करण्यास काही अडचण वाटत आहे. मग ही समस्या कशी सोडवली जाऊ शकते? याविषयी आपण पुढील महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्‍या लेखात चर्चा करु या. ही चर्चा निपक्षपाती देव यहोवा याच्या प्रेरित वचनातील मदतगार सल्ल्यावर आधारीत आहे.

तुमचा प्रतिसाद काय असेल?

◻ यहोवाने इस्राएलांचा वापर केला तेव्हा तो पक्षपाती नव्हता असे तुम्ही का म्हणू शकता?

◻ येशू ख्रिस्ताठायी वंशाभिमान नव्हता किंवा तो पक्षपाती नव्हता याचा कोणता पुरावा आहे?

◻ “देव पक्षपाती नाही” हे पेत्राला पाहण्यात कशी मदत देण्यात आली?

◻ या जगात वंशीय एकवाक्यतेची उणीव असली तरी ऐक्याविषयीचा कोणता भविष्यवाद आता पूर्ण होत आहे?

[२५ पानांवरील चित्रं]

प्रेषित पौलाने अथेनैकरांना म्हटले की, देवाने “माणसाचा प्रत्येक वंश निर्माण करुन त्यांना पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर राहावे असे केले”

[२७ पानांवरील चित्रं]

येशूठायी पक्षपात नव्हता म्हणूनच त्याने सुखारजवळ असलेल्या याकोबाच्या झऱ्‍यापाशी एका शोमरोनी स्त्रीला साक्ष दिली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा