वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • १. या विश्‍वाची सुरुवात कशी झाली?

      बायबल म्हणतं, “सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.” (उत्पत्ती १:१) बरेच वैज्ञानिकही मान्य करतात की विश्‍वाला एक सुरुवात आहे. पण देवाने ते कसं निर्माण केलं? त्याने त्याच्या ‘क्रियाशील शक्‍तीने’ म्हणजे पवित्र शक्‍तीने ग्रह-तारे, आकाशगंगा आणि विश्‍वातलं सगळं काही निर्माण केलं.​—उत्पत्ती १:२.

  • सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ५. बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय ते पटण्यासारखं आहे

      उत्पत्ती पुस्तकाच्या १ ल्या अध्यायात, पृथ्वी आणि तिच्यावरच्या सगळ्या गोष्टींच्या निर्मितीबद्दल सांगितलंय. तुमचा यावर विश्‍वास बसतो का? की ही एक काल्पनिक कथा आहे असं तुम्हाला वाटतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

      व्हिडिओ: सृष्टीची निर्मिती करण्यात आली होती का?​—निवडक भाग  (३:५१)

      चित्रं: ‘सृष्टीची निर्मिती करण्यात आली होती का?​—निवडक भाग’ या व्हिडिओमधली दृश्‍यं. १. पृथ्वीवरून पाहणाऱ्‍याच्या दृष्टिकोनातून निर्मितीचे सहा दिवस. २. निर्मितीच्या सहाव्या दिवसानंतर पृथ्वीचं दृश्‍य, ज्यात सूर्य, जमीन, पाणी, झाडंझुडपं, प्राणी आणि मानव आहेत.
      • पृथ्वी आणि तिच्यावरची सृष्टी सहा दिवसांत निर्माण करण्यात आली असं बायबल सांगतं. पण हे २४ तासांचे दिवस होते का?

      • बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय ते पटण्यासारखं आहे का? तुम्हाला असं का वाटतं?

      उत्पत्ती १:१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • वैज्ञानिक म्हणतात की या विश्‍वाला एक सुरुवात आहे. मग वैज्ञानिक जे म्हणतात आणि आपण आताच बायबलमध्ये जे वाचलं, या दोन्ही गोष्टींवरून तुम्ही काय म्हणाल?

      काहींना वाटतं, की सृष्टीची निर्मिती करण्यासाठी देवाने उत्क्रांतीचा वापर केला असेल. उत्पत्ती १:२१, २५, २७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

      • देवाने एका-पेशीचा जीव बनवला आणि मग त्यातून मासे, प्राणी आणि मानवांची उत्क्रांती होऊ दिली, असं बायबल शिकवतं का? की देवाने स्वतः सगळ्या “जातींचे” जीव निर्माण केले?b

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा