-
“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१६ | एप्रिल
-
-
१२. एदेन बागेत असणाऱ्या करूबांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
१२ करूब. हे अतिशय उच्च पदावर असणारे देवदूत आहेत. जेव्हा आदाम आणि हव्वेनं देवाविरुद्ध पाप केलं, तेव्हा यहोवा देवानं काही करूबांना पृथ्वीवर एक नवीन नेमणूक दिली. स्वर्गातील त्यांच्या जबाबदारीपेक्षा ही जबाबदारी खूपच वेगळी होती. जेव्हा आपल्यावर एखादी कठीण जबाबदारी सोपवण्यात येते, तेव्हा या देवदूतांचं उदाहरण आपल्याला धीरानं आपली जबाबदारी पार पाडण्यास मदत करेल. बायबल सांगतं, की देवानं “जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली.”[2] (उत्प. ३:२४) देवानं त्यांना ही जबाबदारी सोपवल्यानंतर, हे काम त्यांच्यासाठी अत्यंत क्षुल्लक आहे किंवा कमी दर्जाचं आहे अशी तक्रार त्यांनी यहोवाकडे केली, असं बायबलमध्ये कुठंही सांगितलेलं नाही. तसंच आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांना कधीच आपल्या कामाचा कंटाळा आला नाही. याउलट, ते आपली जबाबदारी पूर्ण होईपर्यंत तिथंच राहिले. १,६०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावर जेव्हा जलप्रलय आला तेव्हा कदाचित त्यांची ही जबाबदारी संपली असावी!
-
-
“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१६ | एप्रिल
-
-
^ [२] (परिच्छेद १२) या जबाबदारीसाठी देवानं किती करूबांची नेमणूक केली होती, याविषयी बायबल काहीच सांगत नाही.
-