वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “त्यांचे क्लेश मी जाणून आहे”
    टेहळणी बुरूज—२००९ | जुलै १
    • एकदा मेंढरांची राखण करत असताना मोशेला एक अतिशय विलक्षण दृश्‍य दिसले. एक झुडूप अग्नीने जळत असूनही “ते भस्म झाले नाही” असे त्याला दिसले. (२ रे वचन) हा प्रकार आहे तरी काय हे शोधून काढण्यासाठी तो झुडपाजवळ गेला. तेव्हा, आपल्या देवदूताच्या माध्यमाने यहोवा अग्नीतून मोशेशी बोलला: “इकडे जवळ येऊ नको; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमि पवित्र आहे.” (५ वे वचन) जरा विचार करा: ते जळणारे झुडूप, पवित्र देव त्या ठिकाणी उपस्थित असण्याचे चिन्ह असल्यामुळे तेथील जमीनही पवित्र झाली होती!

  • “त्यांचे क्लेश मी जाणून आहे”
    टेहळणी बुरूज—२००९ | जुलै १
    • देवाच्या करुणेमुळे आपल्याला आशादायी मनोवृत्ती बाळगण्याचे प्रोत्साहन मिळते. आपण अपरिपूर्ण असलो, तरी देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपण त्याच्या नजरेत शुद्ध व पवित्र बनण्याचा प्रयत्न करू शकतो. (१ पेत्र १:१५, १६) नैराश्‍याला तोंड दिलेल्या व अगदी खचून गेलेल्या एका ख्रिस्ती स्त्रीला, जळणाऱ्‍या झुडपाबद्दलच्या मोशेच्या अहवालातून खूप सांत्वन मिळाले. ती म्हणते: “जमिनीवरच्या धुळीला जर यहोवा पवित्र करू शकतो तर मग माझ्यासारख्या व्यक्‍तीची परिस्थिती तितकी निराशादायी नाही. या विचाराने मला नैराश्‍यावर मात करण्यास खूप मदत झाली.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा