वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”
    टेहळणी बुरूज—१९९५ | जुलै १
    • ८ इस्राएल राष्ट्र विश्‍वासू होते तेव्हा त्याने यहोवाचे सार्वभौमत्व कबूल केले आणि त्याला आपला राजा म्हणून स्वीकारले. (यशया ३३:२२) अशा प्रकारे ते एक राज्य होते. परंतु नंतर प्रकट केल्याप्रमाणे ‘राज्याविषयीच्या’ भविष्यवाणीचा अर्थ ह्‍याहूनही अधिक होता. शिवाय, त्यांनी यहोवाचे नियम पाळले तेव्हा ते शुद्ध आणि त्यांच्या आसपासच्या राष्ट्रांपासून वेगळे होते. ते खरोखरच एक पवित्र राष्ट्र होते. (अनुवाद ७:५, ६) ते याजकांचे राज्य होते का? इस्राएलमध्ये लेवी वंशाला मंदिराच्या सेवेसाठी राखून ठेवण्यात आले होते व त्या वंशामध्ये लेवीय याजकपण होते. मोशेच्या नियमशास्त्राची सुरवात झाली तेव्हा, प्रत्येक गैर-लेवीय कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राऐवजी लेवीय पुरुषांना घेण्यात आले.a (निर्गम २२:२९; गणना ३:११-१६, ४०-५१) अशा प्रकारे इस्राएलमधील प्रत्येक कुटुंब जणू काय मंदिराच्या सेवेसाठी प्रतिनिधीत्व करत होते. अशा प्रातिनिधिक मार्गाने या राष्ट्राला याजकगण बनण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. तरीदेखील, त्यांनी राष्ट्रांसमोर यहोवाचे प्रतिनिधीत्व केले. खऱ्‍या देवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या कोणत्याही विदेश्‍याला इस्राएलसोबत सहवास राखताना असे करावे लागत असे.—२ इतिहास ६:३२, ३३; यशया ६०:१०.

  • ‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”
    टेहळणी बुरूज—१९९५ | जुलै १
    • a इस्राएलच्या याजकगणाची सुरवात झाली तेव्हा इस्राएलमधील गैर-इस्राएली वंशातील ज्येष्ठ पुत्रांची आणि लेवी वंशातील पुरुषांची मोजणी करण्यात आली. लेवी पुरुषांपेक्षा २७३ जास्त ज्येष्ठ पुत्र होते. यास्तव, २७३ इतके लोक अधिक असल्यामुळे खंडणी म्हणून प्रत्येकासाठी पाच शेकेल द्यावेत अशी यहोवाने आज्ञा दिली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा