-
तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलंत्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
-
-
९. पनिन्ना आपल्याशी वाईट वागेल हे माहीत असूनही हन्ना शिलोला गेली, यावरून आपण काय शिकतो?
९ पहाटेची वेळ आहे. घरात सर्वांची धावपळ चाललेली आहे. सर्व जण, अगदी मुलंसुद्धा प्रवासाची तयारी करत आहेत. शिलोला जाण्यासाठी एलकानाला आपल्या मोठ्या कुटुंबाला घेऊन एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातून ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता.b ते पायीच प्रवास करणार असल्यामुळं शिलोला पोचायला त्यांना एक किंवा दोन दिवस लागणार होते. तिथं गेल्यावर आपली सवत आपल्याशी कशी वागेल हे हन्नाला चांगलं ठाऊक होतं; पण म्हणून काही ती घरी बसली नाही. अशा रीतीनं, हन्नानं आपल्यासाठी खरोखर एक फार चांगलं उदाहरण मांडलं. इतरांच्या वाईट वागणुकीमुळं आपण यहोवाची उपासना करण्याचं कधीच सोडू नये. असं करणं नक्कीच शहाणपणाचं ठरणार नाही. कारण, आपण यहोवाच्या उपासनेत सहभागी होतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात; आणि हेच आशीर्वाद खरंतर आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड देण्याचं बळ देत असतात. पण, जर आपण यहोवाच्या उपासनेत सहभागी होण्याचंच सोडून दिलं, तर आपल्याला हे बळ कसं मिळेल?
-
-
तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलंत्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
-
-
b एलकानाचं गाव रामा आणि येशूच्या काळातील अरिमथाई नावाचं ठिकाण कदाचित एकच असावं, या अंदाजावरून हे अंतर ठरवण्यात आलं आहे.
-