वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “तुला उत्कंठा लागेल”
    टेहळणी बुरूज—२०११ | जुलै १
    • ही वचने कोणत्या परिस्थितीत लिहिली होती त्यावर थोडा विचार करूया. उल्लेखनीय विश्‍वास असलेल्या ईयोबाला अनेक संकटे सोसावी लागली होती. त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते, त्याची सर्व प्रिय मुले मरण पावतात आणि त्याला एक गंभीर आजार जडतो. अत्यंत दुःखाने तो देवाला म्हणतो: ‘तू मला अधोलोकात [मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत] लपव.’ (वचन १३) अधोलोकात गेल्याने दुःखांतून आपली सुटका होईल, असे ईयोबाला वाटत होते. अधोलोक अर्थात मानवजातीची सर्वसाधारण कबर, देवाने लपवून ठेवलेल्या खजिन्याप्रमाणे आहे जेथे कसल्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना होत नाहीत, असे ईयोबाला वाटत होते.a

      पण ईयोब नेहमीसाठीच अधोलोकात राहणार होता का? ईयोबाचा तर तसा विश्‍वास नव्हता. देवाला त्याच्या प्रार्थनेत तो पुढे म्हणतो: “तू . . . माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील तर किती बरे होईल!” ईयोबाला पक्की खात्री होती की तो अधोलोकात तात्पुरताच राहणार आहे आणि यहोवा त्याला कधीच विसरणार नाही. अधोलोकात त्याला थांबून राहाव्या लागणाऱ्‍या काळाची तुलना तो ‘कष्टमय सेवेशी’ करतो; हा असा काळ होता ज्यामधून सुटण्यासाठी त्याला वाट पाहावी लागणार होती. पण, त्याला किती वेळपर्यंत थांबून राहावे लागणार होते? “माझी सुटका होईपर्यंत” असे तो म्हणतो. (वचन १४) दुसऱ्‍या शब्दांत, देव त्याला पुन्हा जिवंत करेपर्यंत थांबून राहावे लागणार होते त्यानंतरच अधोलोकातून त्याची सुटका होणार होती.

  • “तुला उत्कंठा लागेल”
    टेहळणी बुरूज—२०११ | जुलै १
मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा