वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवाची आशा धरा
    टेहळणी बुरूज—१९८८ | जानेवारी १
    • १३, १४. यहोवाचे साक्षीदार आपली आशा कोणावर ठेवून आहेत व ते त्याविषयी काय करतात?

      १३ मानवजातीच्या आशेविषयी येशूने यहोवाची जागा अर्थातच घेतली नाही. स्तोत्रसंहिता ३७:३४ अद्याप लागू होणारे आहे, जे म्हणते: “यहोवाची आशा धर व त्याच्या मार्गांचे अवलंबन कर म्हणजे तो तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” लोकांनी मानव–निर्मित संस्थांवर आशा ठेवण्याचे सोडून देऊन यहोवाची आशा धरणे अद्याप जरूरीचे आहे.

  • यहोवाची आशा धरा
    टेहळणी बुरूज—१९८८ | जानेवारी १
    • १६. येशूठायी दावीदासारखाच दृष्टिकोण होता असे का म्हणता येऊ शकते?

      १६ दावीद राजा प्राचीन इस्राएलांच्या वंशावर यहोवाचा आध्यात्मिक मेंढपाळ होता व त्यानेच यरूशलेमास राष्ट्राची राजधानी बनविली; येथे त्याचा पुत्र शलमोन याने ४० वर्षे राज्य केले. येशू ख्रिस्ताला “दाविदाचा पुत्र” असे उचितार्थाने संबोधिण्यात आले. (लूक १:३१; १८:३९; २०:४१) दावीदाने यहोवा देवाची आशा धरली तर त्याचा ऐहिक वंशज येशू ख्रिस्ताने सुद्धा तेच करावयास हवे होते; आणि ते त्याने तसेच केले.

      १७. येशूने यहोवाची आशा धरली याचा कोणता पुरावा आहे?

      १७ दावीदाचा हा अत्यंत महशूर असा दैहिक वंशज येशू याने स्तोत्रसंहिता ३७:३४चा सल्ला अनुसरला याचा पुरावा त्याने वधस्तंभावर आपल्या शेवटल्या श्‍वासोच्छ्‌वासाच्या वेळी जे म्हटले त्यात दिसतो. तो म्हणाला: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) यावेळी तो स्तोत्रसंहिता ३१:५ मधील दावीदाचे शब्द, “तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो” हे अवतरीत व पूर्ण करीत होता. दावीद राजाचा आशा भंग केला गेला नाही त्याप्रमाणेच येशूचाही आशाभंग झाला नाही. तिसऱ्‍या दिवशी ख्रिस्ताचे पुनरूत्थान करण्यात आले. चाळीस दिवसांनी तो आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतला. विदेश्‍यांच्या काळाची १९१४ मध्ये समाप्ती झाली त्यावेळी यहोवाने आपल्या या पुत्राला पृथ्वीचा शासनाधिपति असे उंचावले.

      आता आशा धरण्याजोगा काळ

      १८. आशेसाठी आजचा काळ उचित समय का आहे?

      १८ सध्या (जागतिक वर्षाच्या) ६,०१४ या नव्या वर्षी मानवजात शिरली असता तिच्या साठी कोणती आशा रखली जाऊ शकते? हा प्रश्‍न अत्यंत उचित असा आहे कारण आम्ही पवित्र शास्त्र युगानंतर आता १,९०० वर्षे पुढे आलो आहेत. दावीदाने स्तोत्रसंहिता ३७:३४चे लिखाण केले त्यानंतर हा बराच काळ झाला आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा