वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो
    टेहळणी बुरूज—२००१ | नोव्हेंबर १५
    • १७. सर्वसामान्य लोकांचे आयुष्यमान किती आहे आणि आपल्या आयुष्याची वर्षे कशी असतात?

      १७ अपरिपूर्ण मनुष्यांच्या जीवनकाळाविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०) सर्वसाधारणपणे लोकांचे आयुष्यमान ७० वर्षांचे असते; ८५ वर्षांच्या कालेबने आपल्या असाधारण ताकदीचा उल्लेख केला होता. अहरोन (१२३), मोशे (१२०), आणि यहोशवा (११०) हे काही अपवाद होते. (गणना ३३:३९; अनुवाद ३४:७; यहोशवा १४:६, १०, ११; २४:२९) पण ईजिप्तमधून बाहेर पडलेल्या अविश्‍वासू पिढीपैकी २० वर्षांच्या वरील वयाच्या लोकांचा चाळीस वर्षांच्या आत मृत्यू झाला. (गणना १४:२९-३४) आजही अनेक देशांतील लोकांचे सरासरी आयुष्यमान स्तोत्रकर्त्याने दिलेल्या मर्यादेतच आहे. आपल्या आयुष्याची वर्षे “कष्टमय व दुःखमय” असतात. ती लवकर सरून जातात आणि ‘आपण निघून जातो.’—ईयोब १४:१, २.

  • यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो
    टेहळणी बुरूज—२००१ | नोव्हेंबर १५
    • १९ असे म्हणण्याद्वारे स्तोत्रकर्ता यहोवाला प्रार्थना करत होता, की त्याने त्याच्या लोकांना सुज्ञपणे वागण्यास शिकवावे जेणेकरून ते आपले उर्वरीत दिवस मोलवान जाणून त्याला संतोष वाटेल अशा पद्धतीने त्यांचा उपयोग करतील. ७० वर्षांच्या आयुष्यात जवळजवळ २५,५०० दिवस मिळण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आपले वय कितीही असले तरीसुद्धा, ‘आपल्याला उद्याचे समजत नाही; आपले आयुष्य ते काय? आपण वाफ आहोत ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.’ (याकोब ४:१३-१५) ‘समय व प्रसंग सर्वांवर येतात,’ त्यामुळे आपण आणखी किती जगू हे सांगता येत नाही. म्हणून आपण अशी प्रार्थना करू या की यहोवाने आपल्याला परीक्षांना तोंड देण्याची, इतरांशी योग्यप्रकारे वागण्याची आणि आताच म्हणजे आज यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करण्याची सुज्ञता द्यावी! (उपदेशक ९:११; याकोब १:५-८) यहोवा आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे व त्याच्या संस्थेद्वारे मार्गदर्शन देतो. (मत्तय २४:४५-४७; १ करिंथकर २:१०; २ तीमथ्य ३:१६, १७) सुज्ञ अंतःकरणाने वागल्यास आपल्याला ‘पहिल्याने देवाच्या राज्याचा शोध’ करण्याची आणि यहोवाचे गौरव व्हावे व त्याचे मन आनंदित व्हावे अशारितीने आपल्या आयुष्यातील दिवसांचा उपयोग करण्याची प्रेरणा मिळेल. (मत्तय ६:२५-३३; नीतिसूत्रे २७:११) पूर्ण अंतःकरणाने त्याची उपासना केल्यामुळे अर्थातच आपल्या सर्व समस्या दूर होणार नाहीत, पण निश्‍चितच आपल्याला खूप आनंद प्राप्त होईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा