“यहोवा आमचा देव यासारखा कोण आहे?”
“परमेश्वर [यहोवा न्यू.व.] आमचा देव याच्यासारखा कोण आहे? तो उच्च स्थळी सिंहासनारूढ आहे.”—स्तोत्रसंहिता ११३:५.
१, २. (अ) यहोवाचे साक्षीदार देव व पवित्र शास्त्र याकडे कोणत्या दृष्टिने पाहतात? (ब) कोणत्या प्रश्नांना विचारात घेणे आवश्यक आहे?
यहोवाची स्तुति करणारे खरोखर आशीर्वादित आहेत. आनंदी मंडळीत असणे हा किती मोठा सुहक्क आहे! त्याचे साक्षीदार असल्यामुळे आपण त्याचे वचन पवित्र शास्त्र यातील सल्ला, विधी, शिकवणी, अभिवचने, व भविष्यवाण्यांचा स्वीकार करतो. शास्त्र वचनातून शिकण्यास व “यहोवाद्वारे शिकवलेले” असण्याचा आम्हाला आनंद वाटतो.—योहान ६:४५.
२ देवाबद्दल वाटणाऱ्या त्यांच्या खोल आदरामुळे, यहोवाचे साक्षीदार विचारु शकतात: “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आमचा देव याच्यासारखा कोण आहे?” (स्तोत्रसंहिता ११३:५) स्तोत्रकर्त्याचे ते शब्द विश्वास ध्वनित करतात. परंतु साक्षीदारांना देवावर एवढा विश्वास का आहे? व यहोवाची स्तुति करण्यासाठी त्यांच्या जवळ कोणती कारणे आहेत?
विश्वास व स्तुति उचित आहे
३. हालेल स्तोत्रे कोणती आहेत, व त्यांना असे नाव का दिले आहे?
३ यहोवावरील विश्वास प्रमाणबद्ध आहे कारण तोच केवळ अद्वितिय देव आहे. व ही गोष्ट हालेल स्तोत्राच्या सहाव्या विभागात, स्तोत्रसंहिता ११३, ११४, व ११५ मध्ये स्पष्ट केली आहे. हिलेलच्या रब्बी शाळेनुसार, वल्हांडण सणाच्या भोजनप्रसंगी द्राक्षारसाचा दुसरा प्याला ओतल्यावर ही घटना साजरा केल्याचे महत्व स्पष्ट केले जात होते तेव्हा स्तोत्रे ११३, ११४ गाईले जात असे. द्राक्षारसाच्या चवथ्या प्याल्यानंतर स्तोत्रे ११५ ते ११८ गायिली जात होती. (पडताळा मत्तय २६:३०.) त्यांना “हालेल स्तोत्रे” नाव दिले गेले कारण त्यांनी हालेलूया!—“यहोवाची स्तुति करा!” या उद्गाराचा अनेक वेळा वापर केला आहे.
४. “हालेलूया” या नावाचा काय अर्थ होतो, व किती वेळा याचा उल्लेख पवित्र शास्त्रात आढळतो?
४ “हालेलूया!” हा इब्री भाषेतला शब्दप्रयोग स्तोत्रसंहितेत अशाच प्रकारे २४ वेळा आढळतो. ग्रीक भाषेतले त्याचे रुप चार वेळा पवित्र शास्त्रात इतर ठिकाणी खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठ्या बाबेलीचे पतन झाल्यावर आनंद व्यक्त केला गेला, आणि यहोवा देव राजा या नात्याने शासन सुरू करण्यासंबंधीचा आनंद व्यक्त केला जातो तेव्हा आढळते. (प्रकटीकरण १९:१-६) आता आपण तीन हालेल स्तोत्रांचे परिक्षण करणार आहोत, तेव्हा यहोवाच्या स्तुतिसाठी आम्ही ते गात आहोत याची कल्पना करा.
याहचे स्तवन करा!
५. स्तोत्र ११३ कोणत्या प्रश्नाचे उत्तर देते, व स्तोत्र ११३:१, २ मधील आज्ञा खासपणे कोणाला लागू होते?
५ यहोवाचे स्तवन का करावे? या प्रश्नाचे उत्तर स्तोत्रसंहिता ११३ देते. या आज्ञेनेने त्याची सुरूवात करते: “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] स्तवन करा, परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] सेवकांनो, स्तवन करा. आतापासून सर्वकाळ परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] नामाचा धन्यवाद होवो.” (स्तोत्रसंहिता ११३:१, २) “हालेलूया!” होय, “याहचे स्तवन करा.” ही आज्ञा “अंत समयातील” देवाच्या लोकांना लागू होते. (दानिएल १२:४) येथून पुढे व सर्वकाळासाठी यहोवाच्या नावाची स्तुति पृथ्वीभर केली जाईल. त्याचे साक्षीदार यहोवा देव आहे व येशू राजा आहे, आणि स्वर्गात त्या राज्याची स्थापना झाली आहे असे आता घोषित करतात. यहोवाचे होत असलेले स्तवन दियाबल सैतान व त्याची संस्था थांबवू शकत नाही.
६. ‘सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत’ यहोवाचे स्तवन कसे केले जात आहे?
६ हे स्तवनरूपी गायन यहोवा त्या गीताने पृथ्वी भरून टाकेपर्यंत होत राहील. “सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] नाम स्तवनीय आहे.” (स्तोत्रसंहिता ११३:३) याचा अर्थ पृथ्वीवरील काही प्राण्यांकरवीच्या दैनंदिन उपासनेपेक्षा अधिक होतो. सूर्य पूर्वेला उगवतो व तो सर्व. . . पश्चिमेला मावळतो, तो सर्व पृथ्वीला समाविष्ट करतो. सर्व ठिकाणी सूर्य प्रकाशतो, खोट्या धर्माच्या बंधनातून व सैतानाच्या संस्थेतून मुक्त झाल्यावर लवकरच सर्व लोकांकडून यहोवाच्या नामाचे स्तवन केले जाईल. अर्थात, यहोवाचे अभिषिक्त साक्षीदार व त्याचा राजा येशू ख्रिस्त याची पार्थिव मुले गात असलेल्या या गायनाचा शेवट कधीच होणार नाही. यहोवाचे स्तवन करणारे गायक असण्याचा केवढा मोठा हक्क त्यांना आहे!
यहोवा अतुलनीय आहे
७. स्तोत्रसंहिता ११३:४ मध्ये यहोवाच्या श्रेष्ठत्वाच्या कोणत्या दोन पैलूचा उल्लेख केला आहे?
७ स्तोत्रकर्ता सांगतो: “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.” (स्तोत्रसंहिता ११३:४) ही गोष्ट देवाच्या सर्वश्रेष्ठत्वाच्या दोन पैलूकडे लक्ष देते: (१) यहोवा सर्वश्रेष्ठ आहे, “सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे,” ते पोहऱ्यांतल्या जलबिंदूसमान, व तराजूतल्या केवळ रजासमान आहेत; (यशया ४०:१५; दानिएल ७:१८) (२) त्याचे ऐश्वर्य आकाशापेक्षाही महान आहे, व देवदूत त्याची सार्वभौम इच्छा करतात.—स्तोत्रसंहिता १९:१, २; १०३:२०, २१.
८. आकाश व पृथ्वीतील गोष्टींचे अवलोकन करण्यासाठी यहोवा का व कसे लवतो?
८ देवाच्या उच्चतेमुळे भारावून स्तोत्रकर्त्याने असे म्हटलेः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आमचा देव याच्यासारखा कोण आहे? तो उच्च स्थळी सिंहासनारूढ आहे. तो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो.” (स्तोत्रसंहिता ११३:५, ६) देव इतका उच्च आहे की आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास त्याला लवावे लागते. यहोवा कोणापैकीही कमी प्रतीचा नाही किंवा कोणाच्या अधीनही नाही, तरी पापी लोकांच्या बाबतीत कनवाळू व दयेचे अनुकरण करताना तो नम्रता दाखवितो. अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी व मानवजातीच्या जगासाठी त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याचे “प्रायश्चित बलिदान” देऊन यहोवाने नम्रता व्यक्त केली आहे.—१ योहान २:१, २.
यहोवा दयाशील आहे
९, १०. देव, ‘ज्ञानवानासोबत बसण्यासाठी, दारिद्य्रांस उच्च’ कसे करतो?
९ देवाची दया व्यक्त करताना, यहोवाबद्दल स्तोत्रकर्ता कळवतो की, “तो दीनांस धुळीतून उठवितो, दारिद्य्रांस उकिरड्यातून उचलितो आणि त्यांस अधिपतिंच्या आपल्या लोकांच्या अधिपतिंच्या पंक्तीस बसवितो. तो वांझ स्त्रियेला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करितो. परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] स्तवन करा!” (स्तोत्रसंहिता ११३:७-९) यहोवाच्या लोकांना हा विश्वास आहे की तो गरजवंतास मुक्त करून त्यांच्या परिस्थितीत बदल करील व त्यांच्या गरजा व इच्छा पूर्ण करील. ‘उच्च परम थोर नम्रजनांच्या आत्म्याचे संजीवन करितो; हृदय उत्तेजित करितो.’—यशया ५७:१५.
१० कशाप्रकारे यहोवा ‘दारिद्य्रांस उकिरड्यावरून उचलितो आणि त्यांस अधिपतिच्या पंक्तीस बसवितो’? देवाची इच्छा असते तेव्हा त्याच्या सेवकाना तो अधिपतीसारखी महिमा मिळण्याच्या स्थानी ठेवतो. योसेफाच्या बाबतीत त्याने असेच केले होते, जो मिसरात अन्न पुरविणारा कारभारी झाला. (उत्पत्ती ४१:३७-४९) इस्राएलात, ज्ञानवानांसोबत बसणे, किंवा यहोवाच्या लोकांमध्ये अधिकारी पुरुष असणे, या सुहक्काचा त्यांना मोठा आनंद वाटत होता. आजच्या ख्रिस्ती वडिलांप्रमाणे, अशा लोकाना देवाचे सहाय्य व आशीर्वाद होते.
११. स्तोत्रसंहिता ११३:७-९ खासपणे यहोवाच्या आधुनिक समयातील लोकांना लागू होते असे का म्हटले जाऊ शकते?
११ ‘वांझ स्त्रियांना आनंदी माता बनविणे’ याविषयी काय? देवाने वांझ हन्नाला एक पुत्र—शमुवेल दिला, ज्याला तिने त्याच्या सेवेसाठी समर्पित केले. (१ शमुवेल १:२०-२८) अधिक अद्भुतरितीने, सुरूवातीला येशू व मग इ.स. ३३च्या पेंटेकॉस्ट मध्ये त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हापासून, देवाच्या लाक्षणिक स्त्री, स्वर्गीय सीयोनने, आध्यात्मिक मुले प्रसवण्यास सुरूवात केली. (यशया ५४:१-१०, १३; प्रे. कृत्ये २:१-४) बाबेलच्या कैदेतून सोडवून देवाने यहुद्यांना त्यांचा मायदेश जसा परत मिळवून दिला, त्याप्रमाणेच १९१९ मध्ये “देवाचे इस्राएल” च्या अभिषिक्त शेषांना बाबेलच्या बंधनातून त्याने मुक्त केले व आध्यात्मिकरित्या त्यांना आशीर्वादीत केले म्हणूनच स्तोत्रसंहिता ११३:७-९ मधील शब्द त्यांना लागू होतात. (गलतीकर ६:१६) यहोवाचे निष्ठावंत सेवक यानात्याने आध्यात्मिक इस्राएलाचे शेष आणि पार्थिव आशा असणारे त्यांचे सहकारी हृदयापासून स्तोत्रसंहिता ११३ च्या शेवटल्या शब्दास प्रतिसाद देतातः “लोकानो, तुम्ही याहचे स्तवन करा!” [न्यू.व.]
यहोवाच्या अद्वितीयपणाचा पुरावा
१२. यहोवाचा अद्वितीयपणा स्तोत्रसंहिता ११४ कसे दाखविते?
१२ स्तोत्रसंहिता ११४ यहोवाचा अद्वितीयपणा इस्राएलांच्या बाबतीत घडलेल्या अद्वितीय घटनांचा उल्लेख करण्याद्वारे दाखवते. स्तोत्रकर्त्याने गायिले: “इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणाऱ्या लोकातून निघाले, तेव्हा यहुदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राष्ट्र झाला.” (स्तोत्रसंहिता ११४:१, २) देवाने इस्राएलांना मिसराच्या, ज्यांची भाषा कानाला विचित्र वाटत होती त्यांच्या दास्यत्वातून मुक्त केले. काव्यात्मक समांतरतेत यहुदा व इस्राएल म्हटलेल्या देवाच्या लोकांची मुक्तता, याची स्पष्टता देते की आज देव त्याच्या सेवकाना मुक्त करू शकतो.
१३. स्तोत्रसंहिता ११४:३-६ यहोवाचे श्रेष्ठत्व व पुरातन इस्राएलचा अनुभव कसा कसे प्रकट करते?
१३ सर्व निर्मितीवर यहोवाची सार्वभौमता ह्या शब्दातून दिसून येते: “हे पाहून समुद्र पळाला, यार्देन मागे हटली. पर्वतांनी मेंढ्यासारख्या टेकड्यांनी कोकऱ्यांसारख्या उड्या मारिल्या. हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देन तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस. अहो पर्वतांनो तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यासारख्या उड्या मारता? अहो टेकड्यांनो तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही कोकऱ्यांसारख्या उड्या मारिता?” (स्तोत्रसंहिता ११४:३-६) देवाने त्याच्या लोकांसाठी मार्ग तयार केला तेव्हा लाल समुद्र “पळाला.” यहोवाने मिसऱ्यांना पूर्वस्थळी देत असलेल्या पाण्यात ठार मारून आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएलांनी पाहिला. (निर्गम १४:२१-३१) अशाच प्रकारे, ईश्वरीय शक्तीचे प्रदर्शन, यार्देन नदी “मागे हटली” व इस्राएलांना ओलांडून कनानात जाऊ शकले तेव्हा घडले. (यहोशवा ३:१४-१६) जसे नियमशास्त्र करार देताना सीयोन पर्वत धूम्रमय झाला व थरथरू लागला तेव्हा ‘पर्वतांनी मेंढ्यासारख्या उड्या मारिल्या’. (निर्गम १९:७-१८) त्याच्या गायनाचा कळस गाठताना स्तोत्रकर्त्याने ही गोष्ट प्रश्नाच्या रूपात मांडली, कदाचित तो असे सुचवितो की यहोवाच्या शक्तीच्या प्रदर्शनामुळे निर्जीव समुद्र, नदी, पर्वत आणि टेकड्यांना धाक बसला आहे.
१४. मरीबा व कादेश मध्ये यहोवाच्या शक्तीद्वारे काय केले होते आणि त्याच्या आधुनिक दिवसातील सेवकांवर याचा काय परिणाम होतो?
१४ यहोवाच्या शक्तीला अनुलक्षून स्तोत्रकर्त्याने गायिले: “अगे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथरा काप. तो खडक पालटून तळे करितो, गारेचा खडक पालटून झरा करितो.” (स्तोत्रसंहिता ११४:७, ८) लाक्षणिकरित्या, स्तोत्रकर्ता सुचवितो की मानवजातीने यहोवा, जो प्रभू, सर्व पृथ्वीचा सत्ताधारी आहे त्याच्या धाकात राहावे. तो “याकोबाचा देव” किंवा इस्राएलाचा देव होता, त्याचप्रमाणे तो आध्यात्मिक इस्राएलांचा व त्यांचे सहकारी यांचाही आहे. मरीबा व कादेशच्या रानात, यहोवाने इस्राएलांना विस्मयकारकपणे पाणी देऊन, “खडक पालटून तळे करितो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा” करून त्याची शक्ती प्रगट केली. (निर्गम १७:१-७; गणना २०:१-११) यहोवाच्या अशा अद्भुत शक्तीच्या आठवणी व काळजी त्याच्या वर कसलाही संशय न राखता विश्वास ठेवण्याचे त्याच्या साक्षीदारांना सबळ कारणे पुरविते.
मूर्ती दैवतांपेक्षा भिन्न
१५. स्तोत्रसंहिता ११५ कसे गाइले गेले असावे?
१५ स्तोत्रसंहिता ११५ यहोवाचे स्तवन व त्यावर भरवसा ठेवण्याचे आर्जविते. ते आशीर्वादाचा संबंध जोडते व मुर्त्या व्यर्थ आहेत हे शाबीत करते. हे स्तोत्र एकापाठीमागून एकाने गाइलेले असेल. ते एका सुरात गाइले जाऊ शकते: “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणाऱ्यांनो परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेवा.” मंडळीने त्याला प्रतिसाद दिला असेल: “तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.”—स्तोत्रसंहिता ११५:११.
१६. यहोवा व राष्ट्रांच्या मुर्त्यात कोणता फरक आम्हाला काढता येतो?
१६ याची महिमा आम्हाला नव्हे तर यहोवाच्या नावाला मिळाली पाहिजे, तो प्रेम-दयेचा, किंवा निष्ठावान प्रीती व सत्यतेचा देव आहे. (स्तोत्रसंहिता ११५:१) शत्रू थट्टा उडवून असे विचारतील: “यांचा देव कोठे आहे?” परंतु यहोवाचे लोक प्रत्युत्तर देऊ शकतात: ‘आमचा देव स्वर्गात आहे त्याला बरे वाटते ते सर्व तो करितो.’ (२, ३ वचने) राष्ट्रांच्या मुर्त्या काही करू शकत नाहीत, कारण, ते मानव-निर्मित चांदी व सोन्याचे पुतळे आहेत. त्यांना तोंड, डोळे आणि कान असूनही ते मुके, अंधळे, व बहिरे आहेत. त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही, पाय असून चालता येत नाही, कंठ आहे पण त्यातून शब्द निघत नाही. जे या दुर्बळ मुर्त्या बनवितात व त्यावर भाव ठेवतात ते त्यांच्याप्रमाणेच निर्जीव बनतात.—४-८ वचने.
१७. मृत यहोवाचे स्तवन करू शकत नाहीत तर मग आम्ही काय केले पाहिजे, आणि कोणत्या आशेस्तव?
१७ यहोवावर भाव ठेवण्याचे उत्तेजन दिले जाते, की तो इस्राएलांचा, अहरोनाच्या याजकीय घराण्याचा व सर्व जे देवाचे भय बाळगतात त्यांचा साहाय्यकर्ता व रक्षात्मक ढालीप्रमाणे आहे. (स्तोत्रसंहिता ११५:९-११) यहोवाचे भय धरणाऱ्या, आम्हाला देवाबद्दल खोल आदरभाव आहे, व त्याला नाराज करण्याची सुदृढ भीती आम्हाठायी आहे. ‘आकाश व पृथ्वी ही निर्माण करणारा’ त्याच्या निष्ठावंत सेवकांना आशीर्वाद देतो याचा आम्हाला विश्वास आहे. (वचने १२-१५) स्वर्ग त्याच्या सिंहासनाची जागा आहे, परंतु देवाने पृथ्वीला त्याच्या निष्ठावंत व आज्ञाकारी मानवजातीचे चिरकालिक घर बनविले आहे. शांत, अचेतनावस्थेत असल्यामुळे मृत लोक यहोवाची स्तुति करू शकत नाहीत, आपण जीवंतांनी त्याची पूर्णपणे उपासना केली पाहिजे व निष्ठावंतपणा दाखविला पाहिजे. (उपदेशक ९:५) जे यहोवाचे स्तवन करतील केवळ तेच सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील व “परमेश्वराचा [याह, न्यू.व.] धन्यवाद सर्वकाळ” करू शकतील, व “सर्वकाळ” त्याच्याविषयी चांगले बोलत राहतील. तर मग जे “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] स्तवन करा!” हे उत्तेजन ऐकत आहेत त्यांच्यासोबत आपण निष्ठावंतपणे राहू या.—स्तोत्रसंहिता ११५:१६-१८.
यहोवाचे अद्भुत गुण
१८, १९. यहोवाच्या गुणांना कोणत्या मार्गांनी खोट्या दैवतापासून वेगळे ओळखले जाते?
१८ निर्जीव मुर्तीपेक्षा भिन्न, यहोवा हा जीवंत देव आहे, तो अद्भुत गुणांना प्रकट करतो. तो प्रीतीचा सारांश आणि “दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६; १ योहान ४:८) तो कनानी लोकांच्या क्रुर मोलेक दैवत, ज्याला मुलांचे बलिदान वाहिले जात असे त्यापेक्षा किती वेगळा आहे! असे समजते की या दैवताची मुर्ती मानवाच्या स्वरूपात होती व तिला बैलाचे डोके होते. मुर्तीला सतत लाल होऊपर्यंत तप्त केले जात असे व मुलांना तिच्या पुढे केलेल्या हातावर टाकून दिले जात व तेथून ते खाली अग्नीच्या भट्टीत पडत असे. परंतु यहोवा फार प्रेमाळू व दयाळू असल्यामुळे ही कल्पना त्याच्या “मनांतही” (हृदयात न्यू.व.) आली नाही.—यिर्मया ७:३१.
१९ यहोवाच्या मुलभूत गुणात पूर्ण न्याय, सुक्ष्म बुद्धि, व सर्वशक्तीमान सामर्थ्य यांचा समावेश आहे. (अनुवाद ३२:४; ईयोब १२:१३; यशया ४०:२६) काल्पनिक दैवतांबद्दल काय? न्यायाचे अनुकरण करण्याऐवजी बाबेलचे देव व देवता सूड घेणारे होते. मिसरी दैवते बुद्धिचा उत्कृष्ट नमुना नव्हते परंतु त्यांच्यात मानवी कमतरता असल्याचे वर्णन मिळते. यात काही आश्चर्य नाही, कारण खोटे देव व देवता शहाणे असल्याचा दावा करणाऱ्या “शुन्यवत” मानवाची निर्मिती आहेत. (रोमकर १:२१-२३) ग्रीसमधील दैवते एकमेकांविरुद्ध मनात कट बाळगत होते. उदाहरणार्थ, दंतकथेत, झेयस याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून त्याचा पिता क्रॉनसला पदच्युत केले, ज्याने त्याचा स्वतःचा पिता, युरेनस याला अधिकारावरून दूर केले. जीवंत व सत्य देव यहोवा याची सेवा आणि स्तवन करणे हे किती आशीर्वादाचे आहे, जो संपूर्ण प्रीती, न्याय, बुद्धी, व सामर्थ्य प्रकट करतो!
सार्वकालिक स्तवन करण्यास यहोवा योग्यतेचा आहे
२०. यहोवाच्या नावाची स्तुति करण्याबद्दल दाविद राजाने कोणती कारणे दिली?
२० हालेल स्तोत्र दाखवते त्याप्रमाणे यहोवा सार्वकालिक स्तवन करण्याच्या योग्यतेचा आहे. अशाचप्रकारे, जेव्हा दाविद व इतर इस्राएलांनी मंदिर बांधण्यासाठी जी वर्गणी दिली तेव्हा मंडळीदेखत तो म्हणाला: “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] आमचा पिता इस्राएल याच्या देवा तू सदासर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, [यहोवा, न्यू.व.] महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव; ही तुझीच आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच हे परमेश्वरा, [यहोवा, न्यू.व.] राज्यहि तुझेच तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुजपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करितोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा आम्ही तुझे आभार मानितो तुझ्या प्रतापी नामाची स्तुति करितो.”—१ इतिहास २९:१०-१३.
२१. स्वर्गीय समुहाकडून यहोवाची स्तुति केली जाते यासाठी प्रकटीकरण १९:१-६ कोणता पुरावा देते?
२१ स्वर्गात देखील यहोवाला धन्यवाद व स्तवन सदासर्वकाळ केले जाईल. प्रेषित योहानाने ऐकले: “स्वर्गातील मोठा लोकसमुदाय” म्हणतो: “हालेलूया, [अहो लोकहो तुम्ही याहचे स्तवन करा न्यू.व.] तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व नीतीचे आहेत; ज्या मोठ्या कळवंतीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आपल्या दासांच्या रक्तांबद्दल तिचा सूड घेतला आहे.” पुन्हा त्यांनी म्हटले: “हालेलूया” [अहो लोकहो तुम्ही याहची स्तुति करा न्यू.व.] “चोवीस वडील व ते चार प्राणी” यांनीही तसे केले. सिंहासनातून आलेली वाणी म्हणाली: “त्याची भीती बाळगणाऱ्या सर्व लहानथोर जनांनो, त्याच्या दासांनो आमच्या देवाचे स्तवन करा.” नंतर योहान कळवतो: “तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जल प्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली; ती म्हणाली ‘हालेलूया’ [अहो लोकहो तुम्ही याहचे स्तवन करा न्यू.व.] कारण सर्वसत्ताधारी आमचा प्रभू देव [यहोवा, न्यू.व.] याने राज्य हाती घेतले आहे.”—प्रकटीकरण १९:१-६.
२२. त्याच्या वचनयुक्त नव्या जगात यहोवाची स्तुति कशी केली जाईल?
२२ स्वर्गीय समूह यहोवाचे स्तवन करतात हे किती उचित आहे! त्याचे नवे जग जे आता जवळ आहे, त्यात या युगाच्या अंतातून बचावलेले, पुनरूत्थीत निष्ठावंत जनांसोबत याहचे स्तवन करण्यास साथ देतील. उंच पर्वत देखील आपले डोके उंचावून देवासाठी स्तुतिचे गायन करतील. हिरवळयुक्त टेकड्या व फलदायी वृक्षही त्याचे स्तवन करतील. होय, जीवंत असलेले व श्वास घेणारे सर्व प्राणी हालेलूयाचे धृपद गाऊन यहोवाचे स्तवन करतील! (स्तोत्रसंहिता १४८) या आनंदित समुहात तुमचा आवाज ऐकला जाईल का? तुम्ही त्याच्या लोकांबरोबर निष्ठेने याहची सेवा केली तर तुमचाही आवाज ऐकला जाईल. हा तुमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे, कारण आमचा देव यहोवा यासमान कोण आहे?
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ यहोवा देवाची स्तुति का करावी?
▫ कोणत्या मार्गांनी यहोवा अतुलनीय आहे?
▫ यहोवा दयाशील आहे याचा कोणता पुरावा आहे?
▫ निर्जीव मुर्त्या व खोटी दैवते यापासून यहोवा कसा वेगळा आहे?
▫ स्वर्गात व पृथ्वीवर यहोवाची सदासर्वकाळ स्तुति केली जाईल असे आम्ही का म्हणतो?
[१६ पानांवरील चित्रं]
वल्हांडण सणाच्यावेळी हालेल स्तोत्रे गाईली जात होती