वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवा आपल्या लोकांना प्रकाश देऊन शोभायमान करतो
    टेहळणी बुरूज—२००२ | जुलै १
    • १२ केवळ व्यापारीच नव्हे, तर मेंढपाळ देखील सियोनेकडे झुंडीने येत आहेत. भविष्यवाणी पुढे असे सांगते: “केदारचे सर्व कळप तुजजवळ एकवट होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील.” (यशया ६०:७अ) मेंढपाळांच्या वेगवेगळ्या जमाती आपल्या कळपातील सर्वात उत्तम दान यहोवाला देण्याकरता पवित्र नगरीत येत आहेत. ते स्वतः देखील सियोनेकरता काम करण्यास तयार आहेत! यहोवा या विदेश्‍यांचे स्वागत कसे करतो? तो स्वतःच याचे उत्तर देतो: “ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.” (यशया ६०:७ब) या विदेश्‍यांची अर्पणे व सेवा यहोवा दयाळूपणे स्वीकारतो. ते त्याच्या मंदिराची शोभा वाढवतात.

  • यहोवा आपल्या लोकांना प्रकाश देऊन शोभायमान करतो
    टेहळणी बुरूज—२००२ | जुलै १
    • १५. (अ) यशया ६०:४-९ यातील शब्द कोणत्या वाढीविषयी भाकीत करतात? (ब) खरे ख्रिस्ती कशाप्रकारची प्रवृत्ती दाखवतात?

      १५ सबंध जगात १९१९ पासून घडलेल्या विस्ताराचे किती सुस्पष्ट भविष्यसूचक चित्र ४ ते ९ वचनांत वाचायला मिळते! यहोवाने सियोनेला इतक्या वाढीचा आशीर्वाद का दिला? कारण १९१९ पासून देवाच्या इस्राएलने आज्ञाधारकपणे व सातत्याने यहोवाचा प्रकाश पसरवला आहे. पण ७ व्या वचनानुसार हे नवीन लोक ‘देवाच्या वेदीवर चढतात’ याकडे तुम्ही लक्ष दिले का? वेदीवर बलिदाने दिली जातात आणि भविष्यवाणीचा हा भाग आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो की यहोवाच्या सेवेत बलिदानांचा समावेश आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “मी . . . तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोमकर १२:१) पौलाच्या शब्दांनुसार खरे ख्रिश्‍चन केवळ आठवड्यातून एकदा धार्मिक सभांना उपस्थित राहून समाधान मानत नाहीत. तर ते आपला वेळ, शक्‍ती आणि संपत्ती खऱ्‍या उपासनेच्या वाढीकरता खर्च करतात. अशा समर्पितभावाने उपासना करणाऱ्‍यांमुळे यहोवाच्या भवनाची शोभा वाढत नाही का? यशयाच्या भविष्यवाणीत असे घडण्याविषयी भाकीत करण्यात आले होते. आणि आपण याची खात्री बाळगू शकतो की हे आवेशी उपासक यहोवाच्या नजरेत शोभायमान आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा