वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते
    टेहळणी बुरूज—१९९० | एप्रिल १
    • १, २. (अ) यशया संदेष्ट्याद्वारे देवाने पृथ्वीविषयी काय भाकित केले? (ब) भविष्यकाळात हजार वर्षाच्या पुढे पाहिल्यास आपल्याला काय दिसते?

      यहोवाने या पृथ्वी ग्रहाची निर्मिती त्याचे पाय ठेवण्याची जागा, त्याचे लाक्षणिक पादासन या अर्थाने केली. यशया संदेष्ट्यामार्फत देवाने भाकित केले की, तो ‘त्याचे पादासन शोभायमान करणार.’ (यशया ६०:१३) तर मग, प्रेरित पवित्र शास्त्राच्या मदतीने जणू फार शक्‍तीशाली दुर्बिणीकरवी आपण मानवी भविष्याच्या हजार वर्षापर्यंत डोकावू शकतो. किती आल्हाददायक दृश्‍य आपल्या डोळ्यांना भिडते! सबंध विश्‍वामधील सर्वथोर माळ्‌याने निर्माण केलेले अप्रतिम सौंदर्य ही पृथ्वी सर्वत्र चकाकवीत आहे. मानवजातीत पृथ्वीभर नंदनवनाची पुनर्स्थापना झाली आहे!

  • नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते
    टेहळणी बुरूज—१९९० | एप्रिल १
    • ३, ४. (अ) स्वर्ग व पृथ्वी यांची कशाबाबतीत सुसंगता होईल? (ब) पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना होईल तेव्हा देवदूत कोणता प्रतिसाद व्यक्‍त करतील?

      ३ याच्या हजारो वर्षे आधी आपल्या राज्याविषयी ईश्‍वरी प्रेरणेने दिलेल्या दृष्टांतात देव या विलोभनीय शब्दात आपल्या निवडलेल्या लोकांना म्हणालाः “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे.” (यशया ६६:१) तद्वत, त्याच्या “पादासना”ची शोभा म्हणजे नंदनवनमय पृथ्वी ही अदृश्‍य उर्ध्वलोकात असणाऱ्‍या त्याच्या वैभवी सिंहासनाला अत्यंत साजेशी अशीच आहे.

  • नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते
    टेहळणी बुरूज—१९९० | एप्रिल १
    • ६. हर्मगिदोनानंतर पृथ्वी कशी भरली जाईल?

      ६ हर्मगिदोनातून बचावणारे संख्येने अल्प असले तरी त्यांना होणाऱ्‍या मुलांकरवीच सर्वतोपरि ही पृथ्वी भरणार नाही. यहोवा स्मृतिकबरेत असणाऱ्‍यांना व जे ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाच्या फायद्यामध्ये बसतात अशांचे पुनरुत्थान करून आपल्या ‘पादासनाची शोभा वाढवील.’ हे देखील आमच्या पृथ्वी ग्रहाचे रुपांतर अप्रतिम सुंदर नंदनवनात करण्याच्या आनंदी कार्यात सहभागी होतील.—प्रे. कृत्ये २४:१५.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा