वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • ३ यशयाने म्हटले: “पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्‍निध देव) असे ठेवील. . . . वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलास समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या [अराम व इस्राएल] भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.” (यश. ७:१४, १६) या भविष्यवाणीच्या पहिल्या भागाचा संबंध आपण सहसा मशीहाच्या जन्माशी जोडतो आणि हे योग्यच आहे. (मत्त. १:२३) पण भविष्यवाणीत उल्लेखलेल्या ‘दोन राजांनी’ अर्थात अराम व इस्राएल या राष्ट्रांनी येशूच्या काळात यहूदा राज्यावर हल्ला केला नाही. यावरून असे म्हणता येईल, की इम्मानुएलसंबंधी असलेल्या या भविष्यवाणीची पहिली पूर्णता यशयाच्या काळात झाली असावी. ती कशी?

      ४ यशयाने ही लक्षवेधक भविष्यवाणी केल्यावर काही काळातच त्याची पत्नी गर्भवती होऊन तिने पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव “महेर-शालाल-हाश-बज” ठेवण्यात आले. यशयाने भविष्यवाणीत उल्लेखलेला “इम्मानुएल” कदाचित हाच असावा.a प्राचीन काळात, एखाद्या खास घटनेची आठवण ठेवण्यासाठी जन्माच्या वेळी बाळाला विशिष्ट नाव दिले जायचे; पण आईवडील व नातेवाईक त्याला वेगळ्या नावाने ओळखत. (२ शमु. १२:२४, २५) येशूला कधीही इम्मानुएल या नावाने संबोधण्यात आल्याचा कोठेही उल्लेख नाही.—यशया ७:१४; ८:३, ४ वाचा.

  • सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • a यशया ७:१४ यात “कुमारी” असे भाषांतर करण्यात आलेला मूळ इब्री शब्द, विवाहित स्त्रीच्या संदर्भातही वापरला जाऊ शकतो. त्यामुळे, तो शब्द यशयाच्या पत्नीला आणि यहुदी कुमारी असलेल्या मरीयेलाही लागू होऊ शकतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा