वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१ पृ. १७-२३
  • यहोवाचा राष्ट्रांविरुद्ध वादविवाद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा राष्ट्रांविरुद्ध वादविवाद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती धर्मजगताच्या परवानगी देणाऱ्‍या क्षेत्राविरूद्ध न्यायदंड
  • मोठ्या बाबेल विरुद्ध न्यायदंड
  • “सर्व राष्ट्रां”विरूद्ध न्यायदंड
  • मेंढपाळांचे हायहाय करणे व ओरडणे
  • यिर्मया देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवाचे न्यायदंड घोषित झालेच पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१ पृ. १७-२३

यहोवाचा राष्ट्रांविरुद्ध वादविवाद

‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोंहचेल, कारण यहोवा राष्ट्रांशी प्रतिवाद करत आहे.’ —यिर्मया २५:३१, न्यूव.

१, २. (अ) योशीया राजाच्या मृत्युनंतर यहूदाचे काय झाले? (ब) यहूदाचा शेवटला राजा कोण होता, व त्याच्या अविश्‍वासूपणामुळे त्याला काय सहन करावे लागले?

यहूदाच्या प्रदेशावर कठीण परिस्थिती ओढवली होती. योशीया या सत्प्रवृत्तीच्या राजाने, यहोवाचा क्रोध तात्पुरता थोपवून धरला होता. पण जेव्हा सामान्य युग पूर्व ६२९ मध्ये योशीयाला ठार मारण्यात आले तेव्हा काय घडले? त्याच्यानंतर आलेल्या राजांनी यहोवाचा अपमान केला.

२ योशीयाचा चवथा मुलगा व यहूदाचा शेवटला राजा सिदकीया याने, २ राजे २४:१९ म्हणते त्याप्रमाणे “[त्याचा थोरला भाऊ] यहोयाकीमाप्रमाणे परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव] दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.” याचा परिणाम काय घडला? नबुखद्‌नेस्सरने यरुशलेमेवर चढाई केली, सिदकीयाला पकडले, त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला, त्याला अंधळे केले व बाबेलास नेले. शिवाय, बाबेली लोकांनी यहोवाच्या मंदिरात वापरण्यात येणारी पात्रे लूट म्हणून नेली, ते मंदिर व शहर अग्नीने भस्मसात केले. बचावलेल्यांना बाबेलात बंदिवान करून नेले.

३. यरूशलेमेचा सामान्य युग पूर्व ६०७ मधील नाशासोबत कोणत्या काळाची सुरवात झाली, व त्या काळाच्या समाप्तीला काय होणार होते?

३ त्या सामान्य युग पूर्व ६०७ या वर्षाने, केवळ यरुशलेमेच्या अंतिम निर्जनावस्थेला सूचित केले नाही तर, त्याने लूक २१:२४ मध्ये सांगण्यात आलेल्या “परराष्ट्रीयांच्या सद्दी”ची सुरवात केली. हा २,५२० वर्षांचा काळ आमच्या शतकात १९१४ या वर्षी संपला. त्या वेळी यहोवाने नबुखद्‌नेस्सरापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्‍या आपल्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला, या भ्रष्ट जगावर न्यायदंड घोषित करण्यासाठी व त्याची पूर्ती करण्यासाठी सिंहासनावर बसवले. हा न्याय यहूदाचा आधुनिक नमुना यापासून सुरु झाला, देव व ख्रिस्त यांचे पृथ्वीवरील प्रतिनिधी असल्याचे हा नमुना स्वतःच्या बाबतीत दाव्याने सांगतो.

४. यिर्मयाच्या भविष्यवाणीसंबंधी कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

४ यहूदाच्या राजांच्या शेवटल्या वर्षात घडलेल्या गोंधळाच्या घटना आणि आज ख्रिस्ती धर्मजगतात जो गोंधळ व याचा सभोवतालच्या राष्ट्रांवर जो विनाशी परिणाम दिसत आहे, त्यामध्ये आम्हाला काही समांतरता दिसून येते का? होय, निश्‍चितपणे! तर मग, यहोवा ह्‍या गोष्टींना आज कसा हाताळणार आहे, याविषयी यिर्मयाची भविष्यवाणी कशारितीने दर्शविते? आपण ते पाहू या.

५, ६. (अ) ख्रिस्ती धर्मजगताची परिस्थिती यहूदाचा नाश होण्याआधीच्या परिस्थितीसारखीच १९१४ पासून कशी आहे? (ब) आधुनिक यिर्मयाने ख्रिस्ती धर्मजगतासाठी कोणता संदेश आणला आहे?

५ ब्रिटीश गणितकार व तत्त्ववेत्ते बरट्रांड रसेल यांनी साधारण ४० वर्षांआधी असे विवेचन केले होतेः “जगाचा कल लक्षात असणाऱ्‍या प्रत्येकाला, १९१४ पासून विधिलिखिताप्रमाणे व पूर्वानुमानाप्रमाणे मोठ्या त्रासाकडे वाटचाल होत असल्याचे बघून मोठे विचलित वाटायला लागले आहे.” याचप्रमाणे कोनराड ॲडन्युर या जर्मन मुत्सद्यांनी असे म्हटलेः “१९१४ पासून लोकांच्या जीवनातून सुरक्षितता व शांती ही पार नाहीशी झाली आहे.”

६ यिर्मयाच्या काळी होते तसेच आजही या व्यवस्थीकरणाचा शेवट अजाण लोकांच्या रक्‍ताचे पाट वाहण्याने चिन्हांकित होत आहे. विशेषतः तो रक्‍तपात मोठ्या प्रमाणावर या शतकाच्या दोन महायुद्धात घडला. ही युद्धे बहुतांशी, पवित्र शास्त्राच्या देवाची भक्‍ती करण्याचा दावा करीत असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताच्या राष्ट्रांनी लढविली. केवढा हा दांभिकपणा! या कारणामुळे, यहोवाने आपल्या साक्षीदारांना त्यांच्याकडे पाठवून त्यांना यिर्मया २५:५, ६ मधील शब्दांप्रमाणे सांगावयास लावले यात काही नवलाईच नाही, जेथे म्हटले आहेः “तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा. . . . अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजनपूजन करण्यास त्यांच्यामागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही.”

७. ख्रिस्ती धर्मजगताने यहोवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष केल्याचा कोणता पुरावा आहे?

७ तथापि, ख्रिस्ती धर्मजगतातील रा मागे फिरण्यात अपयशी ठरली. हे, त्यांनी कोरिया व व्हिएतनाम येथे युद्ध दैवताला जे आणखी बळी दिले त्याद्वारे सिद्ध झाले. शिवाय त्यांनी मृत्युचे व्यापारी, शस्त्रास्त्रे उत्पादन करणाऱ्‍यांना आपले आर्थिक साहाय्य देण्याचे चालूच ठेवले. ख्रिस्ती धर्मजगतातील देशांनी १९८० च्या दशकातील प्रत्येक वर्षी शस्त्रांवर जवळजवळ शंभर अब्ज डॉलर्स इतका खर्च पुरवला आहे. १९५१ पासून १९९१ पर्यंत केवळ अमेरिकेत लष्करावरील खर्च, सर्व अमेरिकन महापालिकेच्या एकंदर निव्वळ नफ्याच्याही पुढे गेला. शीतयुद्ध संपल्याच्या जाहीर घोषणेपासून, टाकाऊ अण्वस्त्रांवरील खर्चात कपात झाली असली तरी, अधिक घातकी स्वरुपाचे मोठमोठे दारुगोळे व शस्त्रास्त्रे यांची निर्मिती चालूच आहे. याचा कधीतरी कदाचित वापर केला जाईल.

ख्रिस्ती धर्मजगताच्या परवानगी देणाऱ्‍या क्षेत्राविरूद्ध न्यायदंड

८. यिर्मया २५:८, ९ चे शब्द ख्रिस्ती धर्मजगताच्या संबंधाने कसे पूर्ण होतील?

८ आता, यहोवाने यिर्मया २५:८, ९ मध्ये उद्‌गारलेले पुढील शब्द ख्रिस्ती धर्मजगताला, ते ख्रिस्ती नीतीमत्तेच्या दर्जानुरुप राहण्यात उणे पडले म्हणून खासपणे लागू होतात. तेथे म्हटले आहेः “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतोः ‘तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत, म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला बोलावून आणितो,’ असे परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतो, ‘त्यास या देशावर, त्यातील रहिवाश्‍यांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर आणितो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.’” अशाप्रकारे, देवाचे लोक असल्याचा दावा करणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगतापासून सुरवात करून मोठे संकट शेवटी पृथ्वीव्याप्तपणे ‘आसपासच्या सर्व राष्ट्रां’पर्यंत पोंहचेल.

९. आमच्या काळात ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिक परिस्थिती कोणत्या मार्गाने अधिक बिकट झाली आहे?

९ ख्रिस्ती धर्मजगतात एकेकाळी पवित्र शास्त्राबद्दल खराच आदर दाखवण्यात येत होता, तसेच विवाह व कौटुंबिक जीवन या गोष्टी सौख्यानंदाचा उगम आहेत हे सार्वत्रिकपणे मानण्यात येत होते, लोक सकाळी उठत व आपल्या कामाचा पुरेपुर आनंद घेत. संध्याकाळी दिव्याच्या प्रकाशात देवाच्या वचनाचे वाचन व त्याचा अभ्यास करण्यात कित्येकांना मोठा तजेला मिळत होता. पण आजची वस्तुस्थिती बघता लैंगिक स्वैराचार, घटस्फोट, मादक औषधांचे सेवन, मद्यप्राशन, गुन्हेगारी, लोभ, आळशीपणा, दूरदर्शनवरील कार्यक्रम बघत बसण्याचे व्यसन, या व इतर अनेक गोष्टी धोकादायक प्रमाणात जीवन भ्रष्ट करीत आहेत. हे सर्व, यहोवा देव, ख्रिस्ती धर्मजगताच्या स्वैराचारी साम्राज्यावर जो विध्वंस आणणार आहे त्याची प्राथमिकता आहे.

१०. यहोवाच्या न्यायदंडांनंतर ख्रिस्ती धर्मजगताच्या अवस्थेचे वर्णन करा.

१० यिर्मयाच्या २५ व्या अध्यायात १० व ११ वचनात आपण वाचतो, त्याप्रमाणे यहोवा हे जाहीर करतोः “त्यामधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवऱ्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन; हा सगळा देश वैराण व विस्मयाला कारण होईल.” ख्रिस्ती धर्मजगताची मोठमोठी मंदिरे व विलासी राजवाडे कोलमडून विध्वंस पावतील तेव्हा तो मोठा आश्‍चर्याचा विषय होईल. हा विनाश केवढा प्रचंड असेल? यिर्मयाच्या काळी यहूदा व त्या सभोवतालच्या राष्ट्रांचा विध्वंस ७० वर्षे टिकला, म्हणजे तो स्तोत्रसंहिता ९०:१० मध्ये उल्लेखल्यानुसार एका जीवनमानाचा होता. याचप्रमाणे, यहोवा आज जो दंड बजावील तो पूर्ण व कायमचा असेल.

मोठ्या बाबेल विरुद्ध न्यायदंड

११. ख्रिस्ती धर्मजगताचा नाश करण्यात कोण साधन असेल? का?

११ प्रकटीकरण १७:१२-१७ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, अशी एक वेळ येईल जेव्हा यहोवा, “दहा शिंगे,” म्हणजे संयुक्‍त राष्ट्रामध्ये लष्कराने सुसज्जित असलेल्या सभासद राष्ट्रांच्या अंतःकरणात खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याला उद्‌ध्वस्त करण्याचे ‘आपले विचार घालील.’ पण हे कसे घडून येणार? प्रकटीकरण १७ व्या अध्यायातील १६ व्या वचनात म्हटल्याप्रमाणे ती “दहा शिंगे” विविध प्रकाराने “कलावंतीणीचा द्वेष करतील . . . व तिला अग्नीत जाळून टाकतील.” हे खरे की, अण्वस्त्रे ही वाढतच आहेत व ती पृथ्वीवरील धोक्याच्या ठिकाणीही वाढत आहेत. पण आपण थांबून, यहोवा आपला सूड घेण्याचे राजकीय नेत्यांच्या अंतःकरणात कसे घालील हे पाहिले पाहिजे.

१२. (अ) यरूशलेमेचा नाश केल्यावर बाबेलचे काय झाले? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशानंतर राष्ट्रांचे काय होईल?

१२ प्राचीन काळी यहोवाचा पेटलेला क्रोध बाबेलने अनुभवण्याची वेळ आली. या कारणामुळे यिर्मयाच्या २५ व्या अध्यायातील १२ व्या वचनापासून पुढे, तो भविष्यवाद, बदललेल्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून सर्वकाही बघतो. आता नबुखद्‌नेस्सर व बाबेल हे यहोवाकडील दंडाधिकारी राहिले नाहीत, तर त्यांचा समावेश जगातील इतर सर्व राष्ट्रात करण्यात आला आहे. ही आजच्या सारखीच स्थिती आहे. प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायातील ती “दहा शिंगे” खोट्या धर्माला उद्‌ध्वस्त करतील, पण नंतर तीच स्वतः, प्रकटीकरणाच्या १९ व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे पृथ्वीच्या इतर सर्व “राजां”बरोबर विनाश पावतील. यिर्मया २५:१३, १४ वचने दाखवतात की, यहोवाच्या लोकांची पिळवणूक करणाऱ्‍या “इतर सर्व राष्ट्रां”बरोबर बाबेलदेखील कसा न्यायदंडाखाली येईल. यहूदास शिक्षा देण्यासाठी यहोवाने नबुखद्‌नेस्सरचा उपयोग केला. पण नंतर, त्याने व बाबेलच्या इतर राजांनी स्वतःला मोठ्या गर्वाने यहोवापेक्षा अधिक उच्च मानले. ही गोष्ट, त्यांनी यहोवाच्या मंदिराची पात्रे वाईट रीतीने वापरून अपवित्र केली त्याद्वारे सूचित होते. (दानीएल ५:२२, २३) बाबेलोन्यांनी यरुशलेमेचा नाश केला त्यावेळी मवाब, अम्मोन, सोर, एदोम, व इतर शेजारील राष्ट्रांनी देवाच्या लोकांची थट्टा केली व त्याबद्दल आपला आनंद व्यक्‍त केला. त्यांना याबद्दल यहोवाकडून बदला मिळण्यास हवा.

“सर्व राष्ट्रां”विरूद्ध न्यायदंड

१३. “संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला,” याचा काय अर्थ आहे, व त्यास पिणाऱ्‍यांना काय होते?

१३ या कारणामुळे, यिर्मया त्याच्या पुस्तकातील २५ व्या अध्यायाच्या १५ व १६ वचनात जाहीर करतोः “परमेश्‍वर [यहोवा, न्यूव], इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, ‘माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवितो त्यांस तो पाज; म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तरवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.’” तो ‘यहोवाचा संतापरूप द्राक्षारसाचा पेला’ का आहे? येशूने मत्तय २६:३९, ४२ व योहान १८:११ येथे त्याच्या संबंधाने असलेल्या देवाच्या इच्छेला ‘पेला’ असे संबोधले आहे. याचप्रमाणे, येथे असणाऱ्‍या पेल्याचा उल्लेख, सर्व राष्ट्रांनी ईश्‍वरी सूडाचे प्राशन करण्याच्या यहोवाच्या इच्छेला सूचित करणारा आहे. यिर्मयाच्या २५ व्या अध्यायात १७-२६ वचनापर्यंत देण्यात आलेले राष्ट्रीय गट सध्याच्या राष्ट्रांच्या पडछाया आहेत.

१४. यिर्मयाच्या भविष्यवाणीनुसार, यहोवाचा संतापरूप द्राक्षारसाचा प्याला कोण पितात, व हे आमच्या दिवसांसाठी काय चित्रित करते?

१४ यहूदाप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताला देखील “उद्‌ध्वस्त, विस्मय, उपहास व शाप” मिळाल्यावर खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यापुढे विनाश उभा असेल. त्यानंतर, मिसरद्वारे चित्रित होणाऱ्‍या सबंध जगाला यहोवाचा क्रोधरुपी द्राक्षारस प्यावा लागेल! होय, “परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये” यांनी तो प्राशन केलाच पाहिजे. सर्वात शेवटी, “शेशखचा राजाही तो पिईल.” हा कोण “शेशखचा राजा”? शेशख हे बाबेलचे लाक्षणिक नाव किंवा गुप्त लिपित लिहिलेला लेख वा संदर्भ आहे. बाबेलवर जसा सैतान हा अदृश्‍य राजा होता, तसेच येशूने म्हटल्याप्रमाणे तो आज “जगाचा अधिकारी” आहे. (योहान १४:३०) अशाप्रकारे, यिर्मयाच्या २५:१७-२६ वचने प्रकटीकरणाच्या १८ ते २० अध्यायापर्यंत संमातरीत जातात व ते, यहोवाच्या क्रोधाचा प्याला सर्वत्र नेला जात असताना, कोणकोणत्या घटना घडतील त्याची स्पष्टता देतात. प्रथम, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य लयास गेले पाहिजे व नंतर राजकीय सत्ता व मग स्वतः सैतानाला अगाधकूपात टाकण्यात येईल.—प्रकटीकरण १८:८; १९:१९-२१; २०:१-३.

१५. “शांती आणि निर्भय”तेची घोषणा ऐकू आल्यावर काय होईल?

१५ शीत युद्ध थांबले आहे आणि एकच प्रबळ सत्ता उरली आहे असे म्हणण्यापासून, शांती व निर्भयतेबद्दलची बोलणी अधिक होत आहे. प्रकटीकरण १७:१० मध्ये सांगितल्याप्रमाणे ती प्रबळ सत्ता, श्‍वापदाचे सातवे डोके याला “थोडा वेळ राहावे लागेल.” पण तो “थोडा वेळ” आता संपण्याच्या बेतात आहे. लवकरच, “शांती आहे, निर्भय आहे,” या घोषणेचे सर्व प्रकार “अकस्मात नाश” येऊ देण्याला वाट मोकळी करतील. हेच प्रेषित पौल सांगतो.—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.

१६, १७. (अ) जर कोणी यहोवाच्या न्यायदंडापासून पळ काढू इच्छितो तर त्याचा काय परिणाम होईल? (ब) यहोवाची इच्छा कोणत्या नाशकारक मार्गाने ह्‍या पृथ्वीवर लवकरच संपुष्टात येईल?

१६ ख्रिस्ती धर्मजगतापासून आरंभ होऊन सैतानाच्या सबंध जागतिक व्यवस्थेने यहोवाच्या सूडाचा पेला प्राशन केला पाहिजे. यहोवाने यिर्मयाला २५ व्या अध्यायात २७ ते २९ वचनात दिलेली पुढची आज्ञा याचे समर्थन करतेः “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] इस्राएलाचा देव म्हणतोः ‘तू त्यांस सांगः “मी तुम्हामध्ये तरवार पाठवितो म्हणून प्या. मस्त व्हा, वांती करा, पडा, पुनः उठू नका.”’ जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांस सांगः ‘सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतोः “तुम्हाला तो प्यावा लागेलच. कारण पाहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणितो; तर तुम्ही अगदी शिक्षेवाचून राहाल काय?”’ ‘तुम्हांस शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाश्‍यांस मारण्यासाठी मी तरवार बोलावीत आहे,’ असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतो.”

१७ ते खरेच जोरदार, भय उत्पन्‍न करणारे कडक शब्द आहेत, कारण ते स्वतः सबंध विश्‍वाचा सेनाधीश प्रभू यहोवा देवाने उच्चारले आहेत. त्याच्या पवित्र नावावर लोकांनी जी निंदा, अपमान व द्वेष दाखवला त्याला तो हजारो वर्षांपासून सहन करीत आला आहे. पण आता, त्याचा प्रिय पुत्र, येशू ख्रिस्त याने पृथ्वीवर असताना आपल्या अनुयायांना जी प्रार्थना शिकवली तिचे उत्तर देण्याची वेळ सरतेशेवटी आली आहे. येशूने म्हटलेः “तुम्ही या प्रकारे प्रार्थना कराः ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’” (मत्तय ६:९, १०) यहोवाची इच्छा आहे की, येशूने त्याची तरवार बनून सूड उगवावा.

१८, १९. (अ) विजय मिळवण्यासाठी यहोवाच्या नावाने कोण दौड करत आहे, आणि त्याचा विजय पूर्ण करण्याआधी तो कशासाठी थांबून राहतो? (ब) यहोवाच्या क्रोधाचे वादळी वारे देवदूत मोकळे करतात तेव्हा, पृथ्वीवर कोणत्या भयजनक घटना घडतील?

१८ प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायात आपण येशूबद्दल, पांढऱ्‍या घोड्यावर बसलेले आणि तो “विजयावर विजय मिळवीत आपली दौड पूर्ण करीत आहे” असे वाचतो. (वचन २) हे त्याला १९१४ मध्ये स्वर्गीय राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ केल्यानंतर घडले. त्याच्यानंतर इतर दुसरे घोडे व घोडेस्वार येतात; हे पृथ्वीला त्यानंतर ग्रासून टाकणाऱ्‍या युद्ध, दुष्काळ, मऱ्‍या यांचे प्रतिक आहेत. पण हा सर्व गोंधळ केव्हा संपुष्टात येणार? प्रकटीकरणाचा ७ वा अध्याय, आध्यात्मिक इस्राएल व सर्व राष्ट्रातील मोठा लोकसमुदाय यांना तारणासाठी एकत्र करीपर्यंत चार देवदूत “पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत” असल्याची माहिती देतो. (वचन १) मग काय?

१९ यिर्मयाच्या २५ व्या अध्यायातील ३० व ३१ वचने पुढे कळवतातः “‘परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] उच्च स्थलावरून गर्जना करील; द्राक्षे तुडवणाऱ्‍यांप्रमाणे तो पृथ्वीच्या रहिवाश्‍यांविरुद्ध आरोळी करील. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पसरलेला आहे; कारण . . . परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे; तो सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे; व दुष्टांस तरवारीच्या स्वाधीन करीत आहे,’ असे परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतो.” यहोवाच्या क्रोधाचा पेला पिण्यापासून कोणत्याही राष्ट्राला पळता येणार नाही. या कारणास्तव, सर्व योग्य मनोदयाच्या लोकांनी, ते चार देवदूत यहोवाच्या क्रोधाचे वादळी वारे मोकळे करण्याआधी, राष्ट्रांच्या दुष्कर्मांपासून वेगळे होण्याची ही तातडीची वेळ आहे. ते वारे खरेच वादळी आहेत, कारण यिर्मयाचा भविष्यवाद पुढे ३२ व ३३ वचनात असे म्हणतोः

२०. कोणत्या दृश्‍याला यहोवाच्या न्यायदंडाची तीव्रता अधोरेखीत करते, पण हे कृत्य होणे जरूरीचे का आहे?

२० “सेनाधीश यहोवा म्हणतोः ‘पाहा, राष्ट्राराष्ट्रातून अनिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अती दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्‌भवेल. त्या दिवशी परमेश्‍वराने [यहोवा, न्यूव] संहारिलेले पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्याकरिता कोणी शोक करणार नाहीत; त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.’” खरेच किती भीतीदायक दृश्‍य, पण या पृथ्वीवरून सर्व वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यासाठी आणि देवाने वचन दिलेले नंदनवन आणण्यासाठी हे जरुरीचे आहे.

मेंढपाळांचे हायहाय करणे व ओरडणे

२१, २२. (अ) यिर्मया २५:३४-३६ मध्ये, इस्त्राएलाचे “मेंढपाळ” कोण आहेत, व त्यांना हायहाय करण्यास का गळ घातली? (ब) कोणते आधुनिक मेंढपाळ यहोवाच्या क्रोधास पात्र आहेत, व ते पूर्णपणे त्याच्या योग्यतेचे का आहेत?

२१ पुढे ३४ पासून ३६ वचने यहोवाच्या न्यायदंडाबद्दल आणखी अशी माहिती देतातः “मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत; मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन. मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] त्यांचे कुरण उद्‌ध्वस्त करीत आहे.”

२२ हे कोण मेंढपाळ आहेत? ज्यांना यहोवाच्या क्रोधाचा प्याला आधीच प्यावयास मिळाला आहे ते हे धार्मिक पुढारी नव्हेत. तर ते लष्करी मेंढपाळ आहेत, ज्यांचा यिर्मया ६:३ मध्ये उल्लेख आला असून ते यहोवाविरुद्ध आपल्या सैन्याला जमवीत आहेत. ते राजकीय सत्ताधीश आहेत, जे, ज्यांच्यावर ते अधिपत्य करीत आहेत त्यांच्या खर्चानेच श्रीमंत बनले आहेत. ते खूपच युक्‍तिबाज, भ्रष्टतेत निपूण आहेत. प्रतिकूल परिस्थितीतील देशात, दुष्काळामुळे ग्रस्त झालेल्या लोकांच्या बाबतीत ते कमी संवेदना दाखवतात. ते “कळपातील पुष्ट जनावर” जसे की, हत्यारे बनविणाऱ्‍या व्यावसायिकांसोबत आणि वातावरणास लोभीपणे नष्ट करणाऱ्‍यांद्वारे स्वतःला समृद्ध करतात; पण मरणाऱ्‍या लाखो बालकांना थोड्या किंमतीत का होईना, मिळू शकणारा पौष्टीक आहार व वैद्यकीय मदत पुरविण्याचे टाळतात.

२३. यहोवाच्या नाशकारक कृत्यानंतर सैतानाच्या राज्याचे वर्णन करा.

२३ तेव्हा यिर्मयाचा २५ वा अध्याय ३७ व ३८ वचनांत स्वतःपुरती स्वार्थी आकांक्षा धरणाऱ्‍या लोकांबद्दलचा असा समारोप करताना जे म्हणते, त्यात इतके आश्‍चर्याचे नाही कीः “परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव] संतप्त क्रोधामुळे शांतीमय कुरणे उद्‌ध्वस्त झाली आहेत. तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडिली आहे; क्लेश देणाऱ्‍या तरवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.” खरेच आश्‍चर्य! तरीसुद्धा यहोवाचा संतप्त क्रोध, प्रकटीकरण १९:१५, १६ वचनात ज्याला “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” असे म्हटले आहे, व जो लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर अधिपत्य करतो त्याच्याद्वारे व्यक्‍त करण्यात येईल. मग, यानंतर काय?

२४. खोट्या धर्माचा तसेच सैतानाच्या उरलेल्या जगाचा नाश, धार्मिक मानवजातीवर कोणते आशीर्वाद आणील?

२४ तुम्ही कोणा वादळातून किंवा तुफानातून वाचला होता का? तो केवढा भयंकर अनुभव असतो. पण दुसऱ्‍या दिवशी सकाळी तुम्ही सर्वत्र नष्ट झालेल्या गोष्टींचे अवशेष बघता आणि तुम्हाला स्वच्छ हवा व शांत वातावरण दिसते तेव्हा त्या मनोरम दिवसाबद्दल तुम्ही निश्‍चितपणे यहोवाचे आभार मानाल. याचप्रमाणे, मोठ्या संकटाचे वादळी वारे शांत झाल्यावर तुम्हाला स्वतःला पृथ्वीवर जिवंत असल्याचे आढळल्यावर केवढी धन्यता वाटेल. आता तुम्ही या पृथ्वीला शुद्ध करून तिला वैभवी नंदनवनात परावर्तित करण्याच्या दृष्टीने पुढे पाहाल. यहोवाचा राष्ट्रांशी असलेला वाद संपूर्णपणे संपुष्टात आलेला असेल; त्याच्या नावाचे पवित्रीकरण झालेले असेल आणि मशीही राज्याच्या हजार वर्षाच्या कारकिर्दीत देवाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला असेल. खरेच, ते राज्य लवकर येवो!

ह्‍या लेखाच्या ५-२४ परिच्छेदांची उजळणी करणे

▫ ख्रिस्ती धर्मजगताचे कोणते दांभिक मार्ग न्यायदंडासाठी पात्र आहेत?

▫ यिर्मया २५:१२-३८ मध्ये न्यायदंडाचे कोणते विस्तारित स्वरूप दाखविण्यात आले आहे?

▫ सर्व राष्ट्रांना कोणता संतापरूपी प्याला प्यावयाचा आहे?

▫ हायहाय करणारे व ओरडणारे मेंढपाळ कोण आहेत, व ते चलबिचल का झाले आहेत?

[१८ पानांवरील चित्रं]

यहोवाने ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशाचे साधन निवडून ठेवले आहे

[२३ पानांवरील चित्रं]

मोठ्या संकटाच्या वादळी वाऱ्‍यानंतर, स्वच्छ पृथ्वी प्रकट होईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा