-
“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतोटेहळणी बुरूज—२०१२ | जून १५
-
-
९ यहोवाच्या सेवकांनी बऱ्याच काळापासून पुतळ्याच्या पावलांचा लाक्षणिक अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोखंड व मातीच्या मिश्रणाचे वर्णन दानीएल २:४१ मध्ये अनेक राज्ये असे नव्हे, तर एक “राज्य” असे केले आहे. त्यामुळे, माती हे अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या अशा घटकांना सूचित करते जे या साम्राज्याला लोखंडासमान असलेल्या रोमन साम्राज्यापेक्षा कमजोर बनवतात. माती हे लोकांना म्हणजे सर्वसामान्य जनतेला सूचित करते. (दानी. २:४३) अँग्लो-अमेरिकन साम्राज्यात नागरिक हक्कांच्या चळवळी, कामगार संघटना, आणि स्वातंत्र्यासाठी आंदोलने यांद्वारे लोकांनी आपल्या हक्कांची मागणी केली आहे. हे सर्वसामान्य लोक अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला लोखंडासमान शक्तीने कार्य करण्यापासून रोखतात. तसेच, राजकीय पुढाऱ्यांची विचारसरणी वेगवेगळी असल्यामुळे आणि निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमकुवत झाला आहे. परिणामस्वरूप, त्यांना त्यांची धोरणे प्रभावीपणे अंमलात आणणे शक्य होत नाही. दानीएलाने असे पूर्वभाकीत केले होते: “ते राज्य अंशतः बळकट व अंशतः भंगुर असे होईल.”—दानी. २:४२; २ तीम. ३:१-३.
-
-
“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतोटेहळणी बुरूज—२०१२ | जून १५
-
-
११ पुतळ्याच्या दृष्टान्तात पावलांच्या बोटांची संख्या काही खास अर्थ सूचित करते का? हे विचारात घ्या: दानीएलाने पाहिलेल्या इतर दृष्टान्तांत त्याने विशिष्ट संख्यांचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, त्याने विविध श्वापदांच्या डोक्यांवर किती शिंगे आहेत याचा उल्लेख केला. या संख्यांचा खास अर्थ आहे. पण, पुतळ्याचे वर्णन करताना दानीएल पावलांना किती बोटे आहेत याचा उल्लेख करत नाही. म्हणून, पुतळ्याचे बाहू, हात, हाताची बोटे, पाय आणि पावले यांच्या संख्येचा ज्याप्रमाणे काही विशिष्ट अर्थ नाही, त्याचप्रमाणे पावलांच्या बोटांच्या संख्येचाही या दृष्टान्तात काही विशिष्ट अर्थ असल्याचे दिसत नाही. अर्थात, पावलांची बोटे ही लोखंड व मातीच्या मिश्रणाने बनली आहेत या गोष्टीचा दानीएल खास उल्लेख करतो. दानीएलाच्या वर्णनावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो, की देवाच्या राज्याला सूचित करणारा “पाषाण” पुतळ्याच्या पावलांवर आदळेल तेव्हा अँग्लो-अमेरिकन महासत्ताच जगात वर्चस्व गाजवत असेल.—दानी. २:४५.
-