-
यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हाटेहळणी बुरूज—१९८९ | फेब्रुवारी १
-
-
१५. खरा देव यहोवा याच्याविषयी बेलशस्सराने कसा तिटकारा दाखविला?
१५ यहोवाने धडा शिकवावा असा प्रसंग ज्याला आला तो आणखी एक बादशहा बेलशस्सर होता. हा नबुखद्नेस्सरचा मुलगा नबोनिडस राजाचा सहशासक व त्याचा वारस होता. एका भव्य मेजवानीप्रसंगी बेलशस्सरने आपल्या सन्माननीय पाहुण्यांना, बायकांना व उपपत्न्यांना मद्य प्राशन करता यावे म्हणून त्याच्या आजोबाने जी सोन्याची पात्रे यरुशलेमातील यहोवाच्या मंदिरातून आणली होती ती मोठ्या आडदांडपणे मागविली. अशा प्रकारे “त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.”—दानीएल ५:३, ४.
-
-
यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हाटेहळणी बुरूज—१९८९ | फेब्रुवारी १
-
-
१७ दानीएलाने पुढे बेलशस्सरास म्हटलेः “ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला [तू] मान दिला नाही.” (दानीएल ५:२३) या कारणास्तव भिंतीवरील लिखाणाने बाबेलोनी अधिपतीला ही नोटीस दिली की त्याच्या राजपदाचे दिवस आता संपले आहेत, त्याला तराजूत तोलण्यात येऊन तो उणा भरला आहे हे दिसले आणि त्याचे राज्य मेद व पारस यांच्या ताब्यात जाणार आहे. हा अत्यंत जरुरीचा धडा यहोवाने त्या घमेंडी बादशहाला शिकवल्यावर त्याच रात्री बेलशस्सर या खास्दी राजाचा वध झाला.—दानीएल ४:२३.
-