वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवाचा न्याय व त्याचे नाव उंचावले जाते
    टेहळणी बुरूज—१९८९ | एप्रिल १
    • आपल्या लोकात जबाबदारी घेऊन आहेत त्यांच्याकडून यहोवा न्यायाची वागणूक अपेक्षितो. इस्राएलाच्या निंद्य सरदारांना असे म्हटले आहेः “न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? तुम्ही बऱ्‍याचा द्वेष करता आणि वाईटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता आणि त्यांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडता.” मीखा “यहोवाच्या आत्म्याने, सामर्थ्याने व न्यायाने” या लोकांविरुद्ध यहोवाची दंडाज्ञा घोषित करतो. तो म्हणतो की, अन्यायी सरदार लाचेसाठी न्याय करतात, याजक पैसे मिळविण्यासाठी लोकांना शिक्षण देतात आणि संदेष्टेही आर्थिक लाभासाठी भविष्यकथन सांगतात. यासाठीच, यरुशलेम “नासधुशीचा ढीग होईल.”—३:१-१२.

  • यहोवाचा न्याय व त्याचे नाव उंचावले जाते
    टेहळणी बुरूज—१९८९ | एप्रिल १
    • ● ३:१-३—येथे यहोवा हा दयाळू मेंढपाळ आणि मीखाच्या काळातील देवाच्या प्राचीन लोकातील क्रुर सरदार यांची मोठी तफावत वर्णिली आहे. न्याय आचरुन ते कळपाचे रक्षण करण्याच्या कामात अपयशी ठरले. मेंढरांसमान असणाऱ्‍या लोकांची लुबाडणूक ते त्यांची लोकर काढून नव्हे तर क्रूर लांडग्याप्रमाणे त्यांचे कातडे सोलून करीत होते. दुष्ट मेंढपाळ लोकांना न्याय मिळवून देत नव्हते तर त्यांचा ‘रक्‍तपात घडवून’ आणीत होते. (३:१०) न्यायाचा विपर्यास करुन ते अजाणांकडून त्यांची घरे व त्यांची उपजिविका लुटीत.—२:२; पडताळा यहेज्केल ३४:१-५.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा