वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’
    टेहळणी बुरूज—२००९ | जानेवारी १
    • बेथलेमचा प्रवास

      फक्‍त योसेफ आणि मरीयाच प्रवासाला निघाले होते असे नाही. सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्‍याची आज्ञा झाली. त्यामुळे देशातील सर्व लोकांना या नावनिशीसाठी आपापल्या गावी जावे लागणार होते. योसेफाने काय केले? “योसेफ हा दावीदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोहि गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दावीदाच्या बेथलेहेम गावी गेला.”—लूक २:१-४.

      कैसराने नावनिशी लिहिण्याचा हा जो हुकूम काढला होता तो योगायोग नव्हता. सुमारे ७०० वर्षांपूर्वी बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती, की मशिहाचा जन्म बेथलेहेमात होईल. आणि, नासरेथपासून फक्‍त अकरा किलोमीटर दूरवर एक गाव होते ज्याचे नाव बेथलेहेम होते. पण, बायबलमधल्या भविष्यवाणीत हे स्पष्टपणे सांगितले होते, की मशिहाचा जन्म “बेथलेहेम एफ्राथा” येथे होईल. (मीखा ५:२) आज नासरेथपासून दक्षिणेकडील या छोट्याशा गावाला जाण्याकरता १५० किलोमीटरचा डोंगराळ रस्ता पार करावा लागतो. याच बेथलेहेमेस जाण्यास योसेफाला आज्ञा देण्यात आली होती. हे बेथलेहेम राजा दावीदाच्या वाडवडिलांचे गाव होते आणि योसेफ व मरीया दोघेही याच घराण्यातले होते.

  • तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’
    टेहळणी बुरूज—२००९ | जानेवारी १
    • आणखी कोणत्या गोष्टीमुळे मरीया आज्ञाधारकता दाखवण्यास प्रवृत्त झाली असावी? मशिहाचा जन्म बेथलेहेमात होईल, अशी जी भविष्यवाणी करण्यात आली होती ती मरीयेला माहीत होती का? बायबलमध्ये याविषयी काही सांगण्यात आलेले नाही. पण तिला कदाचित ही भविष्यवाणी माहीत असावी, कारण, धार्मिक नेत्यांना आणि सामान्य लोकांनाही ही भविष्यवाणी माहीत होती. (मत्तय २:१-७; योहान ७:४०-४२) मरीयेला शास्त्रवचनांचे ज्ञान होते. (लूक १:४६-५५) मरीयेने आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करण्याकरता हा प्रवास करण्याचे ठरवले की राजाचा हुकूम पाळण्याकरता, की यहोवाने केलेल्या भविष्यवाणीनुसार वागण्याकरता किंवा यापैकीच्या सर्वच कारणांमुळे हे आपल्याला माहीत नाही. पण ती मात्र आपल्या सर्वांसाठी एक उल्लेखनीय उदाहरण आहे. नम्र व आज्ञाधारक मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या स्त्रीपुरुषांची यहोवा खूप कदर करतो. आज्ञाधारकता या गुणाला तुच्छ लेखल्या जाणाऱ्‍या या युगात, मरीयेचे उदाहरण मात्र विश्‍वासू लोकांकरता चटकन नजरेला दिसणाऱ्‍या दीपगृहासारखे आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा