वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!
    टेहळणी बुरूज—२००१ | फेब्रुवारी १५
    • १७. सफन्या १:१४-१६ या वचनांनुसार यहोवाचा न्यायाचा दिवस किती जवळ आला आहे?

      १७ यहोवाचा न्यायाचा दिवस किती जवळ आला आहे? सफन्या १:१४-१६ या वचनांप्रमाणे यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो की “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे; ऐका! परमेश्‍वराचा दिवस! तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरूजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.”

  • यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!
    टेहळणी बुरूज—२००१ | फेब्रुवारी १५
    • १९, २०. (अ) यहुदा व जेरुसलेमवर यहोवाचा कोप भडकला तेव्हा कशी परिस्थिती होती? (ब) या दुष्ट व्यवस्थेतून दुष्टांचा नाश तर धार्मिकांचा बचाव होणार हे लक्षात घेता कोणते समर्पक प्रश्‍न उपस्थित होतात?

      १९ यहुदा व जेरुसलेमवर परमेश्‍वराचा कोप भडकला तो ‘दुःखाचा व क्लेशाचा दिवस’ होता. बॅबिलोनी सैन्याने यहुदाच्या रहिवाशांवर भयंकर जुलूम केले; मृत्यू आणि सर्वनाशाला तोंड देताना त्यांना किती मानसिक क्लेश झाले असतील हे आपण समजू शकतो. तो दिवस “विध्वंसाचा व उजाडीचा” अंधकाराचा, उदासीनतेचा, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा होता. हे वर्णन केवळ लाक्षणिकच नव्हे तर सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे आणि रक्‍तपातामुळे शाब्दिक अर्थानेही अशीच परिस्थिती होती. तो दिवस “रणशिंगाचा व रणशब्दाचा” होता, तरीसुद्धा या सर्व इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

      २० बॅबिलोनी सैन्यांनी मोठमोठ्या लोलगदायंत्र नामक शस्त्राच्या साहाय्याने ‘उंच बुरूज’ पाडले तेव्हा जेरुसलेमचे पहारेकरी काहीही करू शकले नाहीत. आजच्या या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचे आधारस्तंभ देखील परमेश्‍वराच्या स्वर्गीय सैन्याच्या शस्रास्रांपुढे टिकू शकणार नाही. दुष्टांचा वेचून वेचून नाश करण्यासाठी स्वर्गीय सैन्य सुसज्ज आहे. तुम्ही या नाशातून बचावण्याची आशा बाळगता का? “परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.” तेव्हा यहोवाच्या बाजूने असण्याचा पक्का निर्णय तुम्ही घेतला आहे का?—स्तोत्र १४५:२०.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा