वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १२/१ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • हजार वर्षीय राजवटीत बचावून जाण्यासाठी संघटीत राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • तारण—याचा खरा अर्थ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मोठ्या संकटातून जिवंत वाचवलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूमुळे तारण कसं मिळतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १२/१ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

तुम्ही अलिकडील टेहळणी बुरुज मासिकाचे अंक वाचलेत का? तर मग, तुम्हाला पुढील प्रश्‍नांची उत्तरे देता येतात का ते पहाः

◻ पवित्र शास्त्र लेखकांची लिखाणशैली भिन्‍न होती तरी त्या सर्वांनी देवाच्या कोणत्या उद्देशाकडे व मार्गदर्शनाकडे अंगुली दर्शविली?

या सर्वांनी हे दाखविले की, यहोवा देव मानवजातीला हर्षित बनविण्यासाठी काय करील व देवाची मर्जी संपादण्यास मानवाने काय केलेच पाहिजे.—२/१, पृष्ठ ७.

◻ खरे ख्रिस्ती आणि नामधारी ख्रिस्ती यांजमध्ये कोणते चार फरक ठळकपणे दाखविता येतील?

खरे ख्रिस्ती रक्‍तापासून दूर राहतात (प्रे. कृत्ये १५:२८, २९) ते उच्च नैतिक दर्जा पाळून आहेत. (१ करिंथकर ६:९, १०) अस्सल ख्रिस्तीजन राजकारण व राष्ट्रीय उलाढालीत तटस्थ राहतात. (योहान १७:१६) जे येशूचे अनुकरण करतात ते त्याच्या उदाहरणाचा कित्ता आपल्या घरगुती नातेसंबंधात वापरतात. (इफिसकर ५:२१-२५)—२/१, पृष्ठे ११-१३.

◻ प्रामाणिक राहण्यामुळे कोणते प्रतिफळ व फायदे मिळतात?

यामुळे भाव व आत्मविश्‍वास वाढीस लागतो आणि आपसातील मनोदय व संबंध सुदृढ बनतो. प्रामाणिकपणामुळे शुद्ध विवेकभाव उद्‌भवतो व तो मनःशांती देतो, यामुळे दुसऱ्‍यापुढे उभे राहण्यास कसलीही कुचंबणा वाटत नाही. (इब्रीयांस ९:१४; १ तीमथ्य १:१९)—३/१, पृष्ठ ७.

◻ प्रकटीकरण ९:१६ मध्ये सांगण्यात आलेले “घोडदळ” कशाचे प्रतिनिधित्व करते?

हे लाक्षणिक घोडे मावळत चाललेले अभिषिक्‍त जनांचेच केवळ नव्हे तर “दुसरी मेंढरे” वर्गाच्या “मोठा लोकसमुदाय” याचेही प्रतिनिधित्व करतात. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६)—४/१, पृष्ठ १९.

◻ नवयौवनातील गर्भधारणेच्या आजच्या समस्येला काय उत्तर आहे?

युवकांनी नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन घेतले पाहिजे. पवित्र शास्त्र दाखविते की हे मार्गदर्शन देण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. (इफिसकर ६:४)—५/१, पृष्ठ २७.

◻ साक्षीदारांच्या मिशनरी कार्याला गतकाळात तसेच सध्या कोणत्या तीन मूलभूत गोष्टीमुळे यश मिळाले आहे व मिळत आहे?

एक म्हणजे लोकांशी त्यांच्या घरी साधलेला थेट संपर्क. दुसरी, थेट व साध्या शब्दात दिला जाणारा पवित्र शास्त्र आधारीत संदेश; आणि तिसरी गोष्ट लोकांसोबत दळणवळण राखताना मिशनऱ्‍यांनी व्यक्‍त केलेले ख्रिस्तासारखे प्रेम.—६/१, पृष्ठ १४

◻ मुलांची वाढ करणे कशामुळे कठीण जाते?

पालक व मुले दोघेही अपूर्ण असून त्यांच्या हातून चुका होतात. (रोमकर ५:१२) याशिवाय, वाढत्या मुलांवर आधुनिक काळच्या समाजाचा प्रभाव पडत असतो व यामुळे त्याची मूल्ये व जीवनाचा दृष्टीकोन यावर परिणाम घडतो. (२ तीमथ्य ३:१-५)—८/१, पृष्ठ ४.

◻ सफन्या ३:९ मध्ये सांगण्यात आलेली “शुद्ध वाणी” काय आहे?

ही शास्त्रवचनीय सत्याची भाषा असून ती सर्व राष्ट्रे व वंशातील लोकांना यहोवाची सेवा खांद्याला खांदा लावून करण्यास समर्थ करते.—८/१, पृष्ठ ८.

◻ एखाद्याला देवाची मर्जी कशामुळे लाभते?

समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे अपूर्ण मानवाला सदिच्छाप्राप्त लोक किंवा देवाची मर्जी लाभलेले लोक असे बनता येते. (लूक २:१४)—८/१, पृष्ठ १४.

◻ कोणा लहान मुलाने चूक केल्यामुळे तो बाप्तिस्मा न झालेला प्रचारक राहिला नाही किंवा तो बहिष्कृत झाला असला तरी पालकांना त्याची मदत कशी करता येईल?

पालकांनी त्याला जसे अन्‍न, वस्त्र व आसरा देत राहणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे त्याला त्यांनी देवाच्या वचनाच्या अनुषंगाने सूचना देण्याची व शिस्त लावण्याची गरज आहे. ते त्याच्याशी एकटेपणात अभ्यास करु शकतात किंवा त्याला कौटुंबिक अभ्यासाच्या व्यवस्थेत सहभाग देऊ शकतील.—८/१, पृष्ठ २३.

◻ देवासोबत नातेसंबंध जोपासल्यामुळे कोणकोणती स्वतंत्रता लाभते?

माणसांची भीती तसेच खरे मोल व खरा अर्थ न देणाऱ्‍या जाचक रुढींपासूनची स्वतंत्रता. (नीतीसूत्रे २९:२५) तसेच, मरणाच्या भयापासूनची मुक्‍तता. (उपदेशक ९:५, १०; योहान ५:२८, २९)—९/१, पृष्ठे ५, ६.

◻ प्रकटीकरण ११:१ मध्ये उल्लेखिण्यात आलेले मंदिर कोणते व ते कधी अस्तित्वात आले?

हे थोर आध्यात्मिक मंदिर असून याचे परमपवित्र स्थान, यहोवा स्वर्गात जेथे वास्तव्यास आहे तेथे आहे. ते मंदिर इ.स. २९ मध्ये, येशूचा महायाजक म्हणून अभिषेक झाला त्यावेळी उदयास आले. (इब्रीयांस ३:१; १०:५)—९/१, पृष्ठ १२.

◻ “अज्ञेयवादी” हा शब्द कोणत्या संज्ञेपासून आला, व तो पवित्र शास्त्रात कसा वापरण्यात आला आहे?

“अज्ञेयवादी” हा शब्द ॲʹग्नो․स्टोस या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे व त्याचा अर्थ “अज्ञात” असा आहे. पौलाने या शब्दाचे विशेषण अथेनेशियन लोकांबरोबरील आपल्या भाषणात वापरले आणि त्याने दर्शविले की त्याला “अज्ञात देवाला” समर्पित असणारी विदेशी वेदी आढळली. (प्रे. कृत्ये १७:२३)—९/१, पृष्ठ २१.

◻ यहोवास कृतज्ञता प्रदर्शित करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

जेव्हा कृतज्ञता अधिक शक्‍तीशाली असते तेव्हा देवाची सेवा करण्याची उत्कट इच्छा रसिक अंतःकरणातून उफाळून बाहेर पडते. ही इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे उपाध्यपणात सहभागी होणे व जमल्यास पायनियर सेवा करणे. दुसरा मार्ग म्हणजे सबंध जगभरात ईश्‍वरशासित रुपाने जी इमारती उभारण्याची कामे केली जातात त्याला सहकार्य देणे.—१०/१, पृष्ठ २२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा