वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे
    टेहळणी बुरूज—२००२ | मे १
    • ५, ६. (अ) याजक खासकरून दोषास्पद का होते? (ब) यहोवाने कोणत्या शब्दांत याजकांची निर्भर्त्सना केली?

      ५ हे याजक सर्वाधिक दोषास्पद का होते? ७ वे वचन याचे कारण काय असावे हे स्पष्टपणे दाखवते: “याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्‍वराचा निरोप्या आहे.” हजार वर्षांआधी देवाने मोशेच्याद्वारे इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांत असे सांगितले होते की ‘यहोवाने कळविलेले सर्व विधी इस्राएल लोकांना शिकवण्याचे’ याजकांचे कर्तव्य होते. (लेवीय १०:११) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, २ इतिहास १५:३ या वचनाच्या लेखकाला असे लिहावे लागले: “बहुत काळपर्यंत इस्राएलांस खऱ्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांस शिकवावयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते.”

      ६ मलाखीच्या काळात, म्हणजे सा.यु.पू. पाचव्या शतकात याजकगणाची अद्यापही हीच स्थिती होती. ते लोकांना देवाचे नियमशास्त्र शिकवत नव्हते. तेव्हा या याजकांकडून जाब मागणे रास्तच होते. यहोवाने त्यांच्याविरुद्ध वापरलेल्या जोरदार शब्दांकडे लक्ष द्या. मलाखी २:३ यात असे घोषित करण्यात आले: “मी . . . तुमच्या पर्वणींची यज्ञपशूंची विष्ठा तुमच्या मुखांस फाशीन.” (पं.र.भा.) किती ही लज्जास्पद शिक्षा! पर्वांतील यज्ञपशूंची विष्ठा छावणीच्या बाहेर नेऊन जाळली जायची. (लेवीय १६:२७) पण त्याऐवजी ती विष्ठा त्यांच्या तोंडावर फासली जाईल असे यहोवाने त्यांना सांगितले तेव्हा, त्याला त्यांच्या यज्ञांची आणि ती यज्ञे अर्पण करणाऱ्‍यांची किती घृणा वाटते हे स्पष्टपणे दिसून आले.

  • यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे
    टेहळणी बुरूज—२००२ | मे १
    • ११. खासकरून कोणाला सावध राहण्याची गरज आहे?

      ११ आज मंडळ्यांमध्ये शिकवण्याचा विशेषाधिकार ज्यांना मिळालेला आहे त्या सर्वांकरता मलाखी २:७ यात सावधगिरीचा इशारा आहे. यात असे म्हटले आहे की “याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे.” या शिक्षकांवर भारी जबाबदारी आहे कारण याकोब ३:१ सूचित करते त्याप्रमाणे त्यांना “अधिक दंड होईल.” त्यांनी उत्साहाने शिकवले पाहिजे हे खरे आहे पण त्यांची शिकवण सर्वस्वी देवाच्या लिखित वचनावर आणि यहोवाच्या संस्थेकरवी दिल्या जाणाऱ्‍या शिक्षणावर आधारित असली पाहिजे. अशाप्रकारे ते “इतरांना शिकविण्यास योग्य” ठरू शकतील. म्हणूनच त्यांना असा सल्ला देण्यात आला आहे: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:२, १५.

      १२. ज्यांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी कशाविषयी काळजी बाळगली पाहिजे?

      १२ आपण काळजी न घेतल्यास आपल्या शिकवणुकींत स्वतःच्या आवडीनिवडी आणि मते मिसळण्याचा मोह होण्याची शक्यता आहे. खासकरून, यहोवाच्या संस्थेच्या शिकवणुकींच्या विरोधात असूनही आपल्याच निष्कर्षांविषयी आत्मविश्‍वास बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीकरता हा एक पाश ठरू शकतो. पण मलाखीच्या दुसऱ्‍या अध्यायातून असे दिसून येते, की मेंढरांना अडखळण्याचे कारण बनू शकणाऱ्‍या वैयक्‍तिक विचारांना नव्हे तर देवाकडील ज्ञानाला जडून राहण्याची मंडळीच्या शिक्षकांकडून अपेक्षा केली पाहिजे. येशूने म्हटले: “माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्‍यात त्याचे हित आहे.”—मत्तय १८:६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा