-
‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’टेहळणी बुरूज—२०१० | मार्च १५
-
-
५. दृष्टान्तातील शत्रू कोण आहे आणि निदण कोणाला सूचित करते?
५ दृष्टान्तात सांगितलेला शत्रू कोण आहे, आणि निदण कोण आहेत? शत्रू हा “सैतान” आहे असे येशू आपल्याला सांगतो. निदण हे “त्या दुष्टाचे पुत्र आहेत.” (मत्त. १३:२५, ३८, ३९) येशूने सांगितलेले निदण हे शेतात उगवणारे एक विशिष्ट प्रकारचे रानगवत होते. हे विषारी गवत सुरुवातीला गव्हाच्या रोपासारखेच दिसते. राज्याचे पुत्र असण्याचा दावा करणाऱ्या, पण चांगले फळ उत्पन्न न करणाऱ्या नकली ख्रिश्चनांचे किती अचूक वर्णन! ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा दावा करणारे हे ढोंगी ख्रिश्चन खरेतर दियाबल सैतानाची “संतति” आहेत.—उत्प. ३:१५.
-
-
‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’टेहळणी बुरूज—२०१० | मार्च १५
-
-
७. गव्हापैकीच काही रोपांचे रूपांतर निदणात झाले होते का? स्पष्ट करा.
७ येशूने गव्हाचे रूपांतर निदणात होईल असे म्हटले नव्हते; तर, गव्हामध्ये निदण पेरण्यात आले असे त्याने म्हटले. त्यामुळे या दृष्टान्तात सत्याचा मार्ग सोडून देणाऱ्या खऱ्या ख्रिश्चनांबद्दल सांगण्यात आलेले नाही. तर, सैतानाने कशा प्रकारे जाणूनबुजून दुष्ट लोकांना ख्रिस्ती मंडळीत आणले आणि मंडळीला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला याकडे हा दृष्टान्त लक्ष वेधतो. सर्वात शेवटचा प्रेषित योहान वयोवृद्ध झाला तोपर्यंत हा धर्मत्याग स्पष्टपणे दिसू लागला होता.—२ पेत्र २:१-३; १ योहा. २:१८.
-
-
‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’टेहळणी बुरूज—२०१० | मार्च १५
-
-
दीर्घ काळ वाट पाहिलेला कापणीचा काळ
१०, ११. (क) कापणीची वेळ केव्हा येते? (ख) लाक्षणिक गहू कशा प्रकारे यहोवाच्या कोठारात आणला जात आहे?
१० येशू आपल्याला सांगतो: “कापणी ही युगाची समाप्ति आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.” (मत्त. १३:३९) या जगाच्या शेवटल्या दिवसांत गहू व निदण यांना वेगळे करण्याचे काम केले जाते. राज्याच्या पुत्रांना गोळा करून निदणासारख्या लोकांपासून वेगळे केले जाईल. याबाबतीत प्रेषित पेत्र आपल्याला असे सांगतो: “देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल?”—१ पेत्र ४:१७.
११ शेवटले दिवस किंवा “युगाची समाप्ति” सुरू झाल्यानंतर लवकरच, खरे ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्यांचा, मग ते “राज्याचे पुत्र” असोत किंवा “त्या दुष्टाचे पुत्र” असोत, न्यायनिवाडा सुरू झाला. “पहिल्याने,” मोठ्या बाबेलचे पतन झाले, आणि त्यानंतर कापणीच्या सुरुवातीला राज्याच्या पुत्रांना गोळा करण्यात आले. (मत्त. १३:३०) पण, आता लाक्षणिक गहू कशा प्रकारे यहोवाच्या कोठारात आणला जात आहे? हे गोळा केलेले लोक एकतर पुनःस्थापित ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले, जेथे ते देवाचा अनुग्रह व संरक्षण अनुभवतात, किंवा त्यांना आपले स्वर्गीय प्रतिफळ मिळाले.
१२. कापणी किती काळ सुरू राहते?
१२ न्यायनिवाडा किती काळ चालतो? येशूने कापणीची ‘वेळ’ असे म्हटले होते, यावरून असे दिसते की कापणी काही काळापर्यंत चालू राहते. (प्रकटी. १४:१५, १६) अभिषिक्त जनांपैकी प्रत्येक सदस्याचा न्यायनिवाडा शेवटल्या दिवसांदरम्यान सुरू राहतो. त्यांच्यावर अंतिम शिक्का मारून होईपर्यंत हा न्यायनिवाडा सुरू राहील.—प्रकटी. ७:१-४.
-