वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुम्हाला तुमच्या भावाला मिळवता येईल
    टेहळणी बुरूज—१९९९ | ऑक्टोबर १५
    • ५, ६. संदर्भाचा विचार करता मत्तय १८:१५ येथे कोणत्या प्रकारच्या अपराधांविषयी सांगण्यात आले आहे आणि त्यावरून काय दिसून येते?

      ५ खरे सांगायचे झाल्यास, येशूचा सल्ला अधिक गंभीर विषयांकरता लागू होतो. येशूने म्हटले: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर.” तसे पाहिल्यास “अपराध” ही कोणतीही चूक किंवा एखादा दोष असू शकतो. (ईयोब २:१०; नीतिसूत्रे २१:४; याकोब ४:१७) पण संदर्भ पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते, की येशू गंभीर विषयाच्या बाबतीत बोलत होता. हा अपराध इतका गंभीर होता, की शेवटी संबंधित भावाला “परराष्ट्रीय किंवा जकातदार” ह्‍यांच्यामध्ये गणण्यात येत होते. या वाक्यांशाचा काय अर्थ होतो?

      ६ येशूचे हे शब्द ऐकणाऱ्‍या त्याच्या शिष्यांना हे माहीत होते, की त्यांच्या देशवासीयांनी परराष्ट्रीयांसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेवायचा नव्हता. (योहान ४:९; १८:२८; प्रेषितांची कृत्ये १०:२८) आणि जकादारांशी तर ते खासकरून संबंध टाळायचे कारण हे लोक जन्माने यहुदी असले तरीही आपल्याच लोकांची पिळवणूक करण्यात माहीर होते. त्यामुळे स्पष्टपणे सांगायचे झाल्यास मत्तय १८:१५-१७ येथील संदर्भ हा गंभीर पातकांविषयी आहे; क्षमा करून विसरून जाता येतात अशा साधारण व्यक्‍तिगत समस्यांविषयी येशू तेथे बोलत नव्हता.—मत्तय १८:२१, २२.a

  • तुम्हाला तुमच्या भावाला मिळवता येईल
    टेहळणी बुरूज—१९९९ | ऑक्टोबर १५
    • a मॅक्लिनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपीडिया असे म्हणतो: “नवीन करारामध्ये ज्यांचा उल्लेख जकातदार असे करण्यात आले आहे त्यांना विश्‍वासघातकी किंवा धर्मत्यागी, अधार्मिक लोकांशी असलेल्या नेहमीच्या सहवासामुळे बाटलेले आणि जुलमी रोमी अधिकाऱ्‍यांचे हस्तक समजले जाई. पातक्यांमध्ये त्यांची गणना होत असे . . . त्यांना लोक चार हात दूरच ठेवत, सभ्य लोक त्यांच्याशी संबंध ठेवत नसत. या जकातदारांचे मित्र आणि सोबती कोण, तर त्यांच्याप्रमाणेच जातिभ्रष्ट झालेले लोक.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा