वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • द्राक्षमळ्यातील कामकरी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • शेवटी येशूच्या मृत्युच्या वेळी ती लाक्षणिक कामाची वेळ संपते व कामकऱ्‍यांना मजूरी देण्याची वेळ येते. खुलासा केल्याप्रमाणे शेवटल्यांना प्रथम मजूरी देण्याचा असाधारण नियम पाळला जातोः “मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्‍याला म्हणालाः ‘कामकऱ्‍यांना बोलाव आणि शेवटल्यांपासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजूरी दे.’ तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांना प्रत्येकी एक दिनार मिळाला. मग, जे पहिले आले त्यांना, आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांना एक दिनारच्या दरानेच मजूरी मिळाली. ती त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करीत ते म्हणालेः ‘ह्‍या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले. आणि आम्हास व त्यांस आपण सारखे लेखिले.’ तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिलेः ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर दिनाराचा ठराव केला की नाही? तू आपला दिनार घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्‍या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय?” शेवटी, समारोपात पूर्वी सांगितलेल्या मुद्याची पुनरावृत्ती करीत येशू म्हणतोः “ह्‍याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील.”

  • द्राक्षमळ्यातील कामकरी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • लवकरच, प्रथम कामावर घेतलेल्यांना दिसून येते की येशूच्या शिष्यांना मजूरी दिली गेली आहे, आणि ते त्यांना लाक्षणिक दिनार वापरताना पाहतात. पण त्यांना पवित्र आत्मा व त्यासोबतच्या राज्याच्या विशेषाधिकारापेक्षा अधिक हवे आहे. त्यांची कुरकुर व आक्षेप, ख्रिस्ताच्या शिष्यांच्या, द्राक्षमळ्यातील ‘शेवटच्या’ कामकऱ्‍यांच्या, छळाचे स्वरुप घेतात.

  • द्राक्षमळ्यातील कामकरी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • ती पहिल्या शतकातील पूर्णता, येशूच्या दाखल्यातील एकमेव पूर्णता आहे का? नाही. या २०व्या शतकात ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक, त्यांचे स्थान व जबाबदाऱ्‍या लक्षात घेता, देवाच्या लाक्षणिक मळ्यात कामावर घेतले जाण्यात “पहिले” आहेत. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीशी संलग्न असलेल्या समर्पित प्रचारकांना, देवाच्या सेवेत कोणतेही हक्काचे काम करण्यात, ते “शेवटले” समजत. पण वस्तुतः देवाच्या स्वर्गीय राज्याचे अभिषिक्‍त प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याचा मान म्हणजेच दिनार, पाळकांनी तुच्छ लेखलेल्या याच लोकांना मिळाला. मत्तय १९:३०–२०:१६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा