वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे
    टेहळणी बुरूज—२००४ | सप्टेंबर १
    • पण जे लोक नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले आहेत किंवा जे शोक करतात त्यांना सुखी कसे म्हणता येईल, असा कदाचित आपण विचार करू. पण खरे पाहता, अशा व्यक्‍तींचा जगातील परिस्थितीविषयी वास्तववादी दृष्टिकोन असतो. आपल्या या काळात ‘होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे ते उसासे टाकून विलाप करतात.’ (यहेज्केल ९:४) अर्थात, यामुळे त्यांना सुखी म्हणता येणार नाही. पण जेव्हा त्यांना या पृथ्वीवर नीतिमत्वाची परिस्थिती आणण्याच्या व दीनदुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या देवाच्या उद्देशाविषयी समजते तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो.—यशया ११:४.

  • सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे
    टेहळणी बुरूज—२००४ | सप्टेंबर १
    • जे लोक शोक करतात, जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले आहेत आणि जे आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक आहेत, ते निर्माणकर्त्यासोबत चांगला नातेसंबंध राखण्याचे महत्त्व जाणतात. इतर मानवांसोबत चांगले संबंध असल्यास आपल्या आनंदात भर पडते, पण देवासोबत उत्तम नातेसंबंध असल्यास माणूस यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुखी होऊ शकतो. होय, जे चांगले आहे त्याविषयी प्रेम बाळगणाऱ्‍या व देवाचे मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार असणाऱ्‍या विचारी लोकांना खरोखर सुखी म्हणता येईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा