वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
    टेहळणी बुरूज—२०१५ | मार्च १५
    • ४ टेहळणी बुरूजमध्ये १८८१ साली असं सांगण्यात आलं होतं की “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा” हा येशू आहे. त्यात असं स्पष्ट करण्यात आलं की राजाच्या बंधूंमध्ये फक्‍त येशूसोबत स्वर्गात राज्य करणाऱ्‍यांचाच नाही तर परिपूर्ण झाल्यावर पृथ्वीवर राहणाऱ्‍यांचाही समावेश होतो. त्यात असंही सांगण्यात आलं की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान लोकांना वेगळं केलं जाईल. आणि ज्यांनी आपल्या सर्व कार्यांत देवासारखं प्रेम दाखवलं त्यांना मेंढरांत मोजलं जाईल.

      ५. या दाखल्याबद्दल १९२३ साली देवाच्या लोकांची काय समज होती?

      ५ पुढे यहोवाने आपल्या लोकांना हा दाखला आणखी स्पष्टपणे समजून घ्यायला मदत केली. १५ ऑक्टोबर १९२३ च्या टेहळणी बुरूजमध्ये सांगण्यात आलं की “मनुष्याचा पुत्र” येशू आहे. पण, या अंकात इतर वचनांचा वापर करून हे सांगण्यात आलं की दाखल्यातील ‘बंधू’ केवळ येशूसोबत स्वर्गात राज्य करणारेच आहेत आणि हजार वर्षांच्या राज्यादरम्यान ते सर्व स्वर्गात असतील. त्यात असंही सांगण्यात आलं की मेंढरं अशा लोकांना सूचित करतात, जे येशू आणि त्याच्या बंधूंच्या शासनाखाली या पृथ्वीवर राहतील. ते राजाच्या बंधूंना मदत करतात असं दाखल्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे, शेरडांना व मेंढरांना वेगळं करण्याचं काम ख्रिस्ताचे बांधव पृथ्वीवर असतानाच, म्हणजे हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी केलं जाईल असं त्यात सांगण्यात आलं होतं. तसंच, या लेखात हेही सांगण्यात आलं होतं, की जे येशूवर विश्‍वास ठेवतात आणि त्याच्या राज्यामुळे एक चांगली परिस्थिती येईल असा भरवसा बाळगतात त्यांचा मेंढरांमध्ये समावेश केला जाईल.

  • ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
    टेहळणी बुरूज—२०१५ | मार्च १५
    • ७. शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा काय अर्थ आहे?

      ७ शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा अर्थ आता आपल्याला अगदी स्पष्टपणे समजला आहे. आपल्याला माहीत आहे की “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा” हा येशू आहे. ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं आहे ते राजाचे ‘बंधू’ आहेत आणि ते येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. (रोम. ८:१६, १७) ‘शेरडं आणि मेंढरं’ सर्व राष्ट्रांतील लोकांना सूचित करतात. लवकरच येणाऱ्‍या मोठ्या संकटाच्या शेवटास त्यांचा न्याय केला जाईल. तसंच, अजून पृथ्वीवर जिवंत असलेल्या अभिषिक्‍तांशी त्यांनी कशा प्रकारे व्यवहार केला याच्या आधारावर येशू त्यांचा न्याय करेल हेदेखील आपल्याला समजलं आहे. या दाखल्याचा आणि मत्तय २४ आणि २५ मधील इतर दाखल्यांचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला मदत केल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

  • ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
    टेहळणी बुरूज—२०१५ | मार्च १५
    • ९ उत्तरासाठी सर्वात आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की या ठिकाणी येशू एका दाखल्याच्या साहाय्याने शिकवत होता. तो खरोखरच्या शेरडांविषयी किंवा मेंढरांविषयी बोलत नव्हता. त्याचप्रमाणे, ज्यांना मेंढरांत मोजलं जाईल त्यांपैकी प्रत्येकाने खरोखरच अभिषिक्‍तांना अन्‍न आणि कपडे दिले पाहिजे किंवा आजारी असताना त्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा तुरुंगात असल्यास त्यांना भेटायला गेलं पाहिजे असं येशूला म्हणायचं नव्हतं. तर, त्याने मेंढरांसमान लोकांना “नीतिमान” म्हटलं, कारण अभिषिक्‍त जन येशूचे बंधू आहेत हे ते ओळखतात. तसंच, या शेवटल्या कठीण काळात ते अभिषिक्‍त जनांना एकनिष्ठपणे पाठिंबा देतात.—मत्त. १०:४०-४२; २५:४०, ४६; २ तीम. ३:१-५.

      १०. मेंढरं ख्रिस्ताच्या बंधूंना कोणत्या मार्गाने मदत करू शकतात?

      १० शेरडांचा आणि मेंढरांचा दाखला देण्याआधी, येशू शेवटल्या काळात जे घडेल त्याविषयी बोलत होता. (मत्त. २४:३) उदाहरणार्थ, तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल.” (मत्त. २४:१४) शेरडांचा व मेंढरांचा दाखला देण्याच्या थोड्याच वेळाआधी त्याने रुपयांचा दाखला दिला होता. या दाखल्याच्या साहाय्याने त्याने अभिषिक्‍त जनांना प्रचाराच्या कार्यात मेहनत घेण्याचा सल्ला दिला. पण, आता या अभिषिक्‍तांपैकी फार कमी लोक पृथ्वीवर उरले आहेत आणि अजून प्रचाराचं भरपूर काम बाकी आहे! अंत येण्यापूर्वी अभिषिक्‍तांना “सर्व राष्ट्रांस” सुवार्ता घोषित करण्यास सांगण्यात आलं आहे. शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्यात, “मेंढरे” येशूच्या बंधूंना मदत करतात असं सांगितलं आहे. आणि असं करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना प्रचाराच्या कार्यात साहाय्य करणं. पण, यात नेमकं काय गोवलेलं आहे? फक्‍त या कार्यासाठी आर्थिक मदत देणं किंवा अभिषिक्‍तांना प्रचार करण्याचं प्रोत्साहन देणं इतकंच पुरेसं आहे का?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा